जवळे : पारनेर तालुक्यातील जवळे येथे शिवजयंती महोत्सव समितीच्या वतीने शिवसृष्टी वृक्ष लागवड अभियानांतर्गत ग्रामस्थांना वृक्ष वाटप अभियान सुरू करण्यात आले आहे.
दिवसेंदिवस पर्यावरणाचा समतोल ढासळत असून हे सर्वस्वी मनुष्याने केलेल्या वृक्षतोडीने व अविचाराने झाले आहे. भविष्यात पर्यावरणाचा समतोल राखायचा असेल तर वृक्षारोपण करणे हाच एकमेव पर्याय आहे, असे आवाहन पंचायत समिती सदस्य श्रीकांत पठारे यांनी केले.
शिवजयंती महोत्सव समितीचे मार्गदर्शक डॉ. रायचंद आढाव म्हणाले, शिवसृष्टी या वृक्ष लागवड अभियानातून पर्यावरणपूरक असे एक फळाचे झाड, इतर दोन झाडांचे वाटप केले जात आहे. ग्रामस्थांनी वृक्षारोपण करून त्याचे संवर्धन करावे. झाडे जगविणाऱ्यांचा पुढील वर्षी प्रोत्साहनपर बक्षीस, वृक्षमित्र पुरस्कार देऊन सन्मान करण्यात येणार आहे.
यावेळी स्वप्निल पठारे, ऋषीकेश दंडवते, ओंकार थोरात, ज्ञानेश्वर पोटघन, अक्षय शेलार, अजय पठारे, सरपंच अनिता आढाव, माजी पंचायत समिती सदस्य किसनराव रासकर, विविध कार्यकारी सेवा संस्थेचे अध्यक्ष शिवाजीराव सालके, उपाध्यक्ष प्रदीप सोमवंशी, संतोष पठारे, नवनाथ पागिरे, डॉ. रायचंद आढाव, गोरख सालके, पोपट पिसाळ, भाऊसाहेब आढाव, नवनाथ तिकोणे, नवनाथ शेळके, प्रकाश बडवे आदी उपस्थित होते.
---
१९ जवळे
जवळे येथे सरपंच अनिता आढाव, पंचायत समिती सदस्य श्रीकांत पठारे, किसनराव रासकर आदींच्या हस्ते वृक्ष वाटप करण्यात आले.