शहरं
Join us  
Trending Stories
1
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
2
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
3
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
4
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
5
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
6
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
7
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
8
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
9
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
10
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
11
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
12
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
13
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
14
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
15
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
16
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
17
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
18
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
19
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
20
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
Daily Top 2Weekly Top 5

राष्ट्रवादीच्या पक्षप्रवेशाला नगरसेवकांचा चकवा?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 23, 2021 04:23 IST

श्रीरामपूर : नगरपालिकेत राष्ट्रवादीच्या नगराध्यक्षा अनुराधा आदिक यांची साथ करणाऱ्या काँग्रेस व भाजप नगरसेवकांनी अद्यापही आपली राजकीय भूमिका गुलदस्त्यात ...

श्रीरामपूर : नगरपालिकेत राष्ट्रवादीच्या नगराध्यक्षा अनुराधा आदिक यांची साथ करणाऱ्या काँग्रेस व भाजप नगरसेवकांनी अद्यापही आपली राजकीय भूमिका गुलदस्त्यात ठेवली आहे. विशेष म्हणजे राष्ट्रवादीच्या पक्षप्रवेश सोहळ्याच्या मुहूर्ताला या नगरसेवकांनी हुलकावणी दिली आहे. त्यामुळे पालिकेच्या राजकीय वर्तुळात तो चर्चेचा विषय ठरला आहे.

शहरातील काँग्रेस भवन येथे नगराध्यक्षा आदिक यांच्या नेतृत्वाखाली मागील आठवड्यात राष्ट्रवादीचा पक्षप्रवेश सोहळा पार पडला. काँग्रेसचे मुक्तार शाह, प्रकाश ढोकणे, नगरसेविका चंद्रकला डोळस यांचे पती भाऊसाहेब यांची सोहळ्याला उपस्थिती होती. मात्र, त्यांचा यावेळी प्रवेश झाला नाही. नगराध्यक्षा आदिक यांच्या मुंबई दौऱ्यात सहभागी झालेल्या भाजप नगरसेवकांनी सोहळ्याला मात्र पाठ फिरविली.

पालिकेत नगराध्यक्षा आदिक यांनी विरोधी करण ससाणे यांच्या गटाला शह देण्यात मोठे यश मिळविले होते. काँग्रेसच्या एका गटाला आपल्या बाजूने त्यांनी खेचले. मात्र, या नगरसेवकांनी अद्यापही त्यांचा पक्ष सोडलेला नाही. भारतीय जनता पक्षाच्या नगरसेवकांनाही आदिक यांनी गळाला लावले. मात्र, तेदेखील त्यांच्याच पक्षात कायम राहिले आहेत.

पक्षाच्या प्रवेश सोहळ्यात यातील काही नगरसेवक राष्ट्रवादीचे उपरणे गळ्यात टाकतील, अशी चर्चा होती. त्यातून राष्ट्रवादीला व पर्यायाने अनुराधा आदिक यांना बळ मिळेल अशी शक्यता होती. मात्र, तसे काहीही घडले नाही.

शहरातील दुसऱ्या फळीतील काही कार्यकर्ते व खानापूर तसेच ग्रामीण भागातील कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला. श्रीरामपूर मतदारसंघातील राहुरीतील ३२ गावांतील काही कार्यकर्त्यांनीही यावेळी घड्याळ हाती घेतले. मात्र, इतर पक्षांतील नगरसेवकांचा पक्ष प्रवेश करण्यात यश आले नाही. याउलट राष्ट्रवादीचेच दोन नगरसेवक मात्र यावेळी गैरहजर राहिले.

याचाच अर्थ अद्यापही अनेक नगरसेवक ‘वेट ॲण्ड वॉच’च्या मनस्थितीत आहेत. पालिकेचा कार्यकाळ २८ डिसेंबरला संपत आहे. निवडणुका मुदतीत होणार याबाबत अद्याप संभ्रम आहे. त्यामुळे ऐनवेळीच नगरसेवक आपले पत्ते उघडतील, अशी शक्यता आहे.

---------

यांची भूमिका गुलदस्त्यात

दीपक चव्हाण

वैशाली चव्हाण

रवी पाटील

(सर्व भाजप)

चंद्रकला डोळस

मुक्तार शाह

प्रकाश ढोकणे

(काँग्रेस)

------

राष्ट्रवादीचे गैरहजर नगरसेवक

शीतल गवारे

स्नेहल खोरे

--------

भूमिकेकडे लक्ष

संतोष कांबळे

(काँग्रेस)

---------

नगराध्यक्षा आदिक यांनी माझ्या भागामध्ये मोठी विकासकामे केली आहेत. आजवर कधीही झाली नाहीत अशी कामे त्यांनी केली. त्यामुळे मी निश्चितच राष्ट्रवादीत प्रवेश करणार आहे. तो पक्ष प्रवेश अधिक मोठा राहील.

- प्रकाश ढोकणे, काँग्रेस नगरसेवक.

--------