पाथर्डी : तालुक्यातील मोहटा येथील मोहटादेवी गडावर गुरुवारी सकाळी मंत्रोच्चारात जय अंबे, जय मातादी अशा घोषणांच्या निनादात घटस्थापना करण्यात आली़ देवस्थान समितीच्या अध्यक्षा तथा जिल्हा न्यायाधीश सुवर्णा केवले यांच्या हस्ते विधीवत महापूजा करण्यात आली़सकाळी गावातून देवीचा मुखवटा, सुवर्ण अलंकाराची सवाद्य मिरवणूक काढण्यात आली़ मिरवणुकीत रेणुका विद्यालयाच्या विद्यार्थ्यांचे लेझीम पथकाने पारंपरिक वेषात सहभागी होत लक्षवेधून घेतले़ महिलांनी भर पावसात पायी मोहटागडावर येत देवीचे दर्शन घेतले़ श्री क्षेत्र निळकंठेश्वर संस्थान पिंपरखेडाचे स्वामी कृष्णचैतन्य पुरी यांच्या संगीतमय श्रीमद भागवत कथेस प्रारंभ झाला़ पाथर्डीपासून तीन किलोमीटर अंतरावरील धामणगाव देवी, शहरातील तुळजाभवानी मंदिर, चौंडेश्वरी मंदिर, तिळवण तेली समाज मंदिर, कालिका माता मंदिर, तसेच तिसगाव, करंजी, चिचोंडी, टाकळीमानूर आदी ठिकाणी घटस्थापना उत्साहात करण्यात आली़
मोहटादेवी गडावर नवरात्रौत्सवास प्रारंभ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 21, 2017 17:37 IST