विद्यार्थी विकास मंडळ, राष्ट्रीय सेवा योजना आणि राष्ट्रीय छात्रसेना यांच्या संयुक्त विद्यमाने प्राचार्य आर. जे. बार्नबस यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम झाला. या प्रसंगी बोलताना महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा. बी. एम. गायकर म्हणाले की, १८५७ च्या विद्रोहाचे मंगल पांडे, तात्या टोपे, ब्रिटिश सैन्यासमोर निर्भयपणे गर्जना करणाऱ्या राणी लक्ष्मीबाई, कित्तूरच्या राणी चेन्नमा, राणी गाइडिनलू, चंद्रशेखर आझाद, रामप्रसाद बिस्मिल, भगतसिंग, सुखदेव, राजगुरू, पंडित नेहरू, सरदार पटेल, बाबासाहेब आंबेडकर, सुभाषचंद्र बोस, मौलाना आझाद, खान अब्दुल गफ्फर खान या सारखे असंख्य जननायक आहेत की, जे स्वातंत्र्य चळवळीचे मार्गदर्शक आहेत. आज त्यांच्या स्वप्नांचा भारत बनवण्यासाठी आम्ही सामूहिक संकल्प घेत आहोत.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन एनएसएसचे कार्यक्रमाधिकारी प्रा. अशोक घोरपडे, प्रास्ताविक विद्यार्थी विकास अधिकारी डॉ. भागवत परकाळ यांनी केले. आभार उन्नत भारत अभियानचे समन्वयक प्रा. विलास नाबदे यांनी मानले.
कार्यक्रमास महाविद्यालतील उपप्राचार्य सय्यद रझाक, सर्व विभागाचे प्रमुख, समन्वयक, राष्ट्रीय सेवा योजना आणि राष्ट्रीय छात्र सेनाचे स्वयंसेवक उपस्थित होते. कार्यक्रमाचे तांत्रिक सहाय्य साई सुरम यांनी केले.
-------
फोटो - १४नगर काॅलेज
‘स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव’ कार्यक्रमांतर्गत अहमदनगर कॉलेजमध्ये सामूहिक राष्ट्रगीत गायन कार्यक्रम साजरा करण्यात आला.