शहरं
Join us  
Trending Stories
1
आता स्टील आणि सेमीकंडक्टरवरही टॅरिफ दावणार ट्रम्प? अमेरिकन राष्ट्राध्यक्षांचं उत्तर ऐकूण वाढेल संपूर्ण जगाचं टेन्शन!
2
'वाळवा तालुका स्वाभिमानी, सहजासहजी वाकत नाही, लढाई शेवटपर्यंत...', जयंत पाटलांचा अजितदादांसमोर टोला
3
NCERT: भारताच्या फाळणीला तीन नेते जबाबदार; एनसीआरटीच्या पुस्तकात कुणाची नावे?
4
HDFC Bank च्या ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी; कॅश पासून फ्री चेकबुकपर्यंतचे नियम बदलले, जाणून घ्या
5
दहीहंडी २०२५: पहिला १० थरांचा विश्वविक्रम; जोगेश्वरीच्या कोकण नगर गोविंदा पथकाचा पराक्रम
6
पंतप्रधान नरेंद्र मोदींचा GST रिफॉर्म; दूध, दही, टीव्ही, सायकल सर्वकाही स्वस्त होणार?
7
“गुजरातींकडे नाही, मुंबई मराठी माणसाकडेच राहिली पाहिजे, हे ठाकरे बंधूंचे टार्गेट”: संजय राऊत
8
तुम्हाला माहित्येय? बाइक अथवा कारमागे का धावतात कुत्रे? जाणून घ्या, होईल फायदा...!
9
प्रेमात पडले, लग्न केलं, पण आता गायब झाली पत्नी, प्रेमविवाह ठरला रहस्य, नेमका प्रकार काय?  
10
५० टक्के ट्रम्प टॅरिफवर RSS नेते थेट बोलले; म्हणाले, “राष्ट्रहित समोर ठेवून भारताचे निर्णय”
11
"देशाचे स्वातंत्र्य हे असंख्य क्रांतिकारकांच्या त्यागाचे, बलिदानाचे आणि संघर्षाचे फळ"; CM योगींनी आपल्या निवासस्थानी फडकावला तिरंगा
12
Asia Cup 2025 : संजू अन् रिंकू आउट! आशिया कपसाठी भज्जीनं दिली केएल राहुलसह रियानला पसंती
13
Gopal Kala 2025: देवकीने जन्म दिला, तरी मातृसौख्य यशोदेला; कोणत्या हिशोबाची कृष्णाने केली परतफेड?
14
काँग्रेसकडून भाजपाला मोठा धक्का, माजी मंत्र्याने केली घरवापसी, पद्माकर वळवी यांचा पक्षप्रवेश
15
Jolly LLB 3: अ‍ॅडव्होकेट जगदीश त्यागी बनून पुन्हा एकदा अरशद वारसी येतोय भेटीला, चाहत्यांची उत्सुकता शिगेला
16
Health: हाताच्या दोन बोटांवरून लक्षात येतं, शरीरात वाढलेलं कोलेस्ट्रॉल; त्वरित करा 'हे' उपाय 
17
ठाकरे बंधूंना निवडणूक ‘बेस्ट’ ठरणार नाही? उमेदवारीवरून शिवसैनिकांत नाराजी; ‘समृद्धी’चे आव्हान
18
SBI चा ग्राहकांना दिलासा, कर्जाचा हप्ता होणार कमी; होमलोन, कार लोन स्वस्तात मिळणार
19
'या' दिवशी ७ तासांसाठी बंद राहणार HDFC च्या बँकिंग सुविधा; पाहा कोणत्या सेवांचा लाभ घेता येणार नाही?
20
सकाळी बँकर, नंतर रॅपिडो रायडर! महिला प्रवाशाला आला थक्क करणारा अनुभव; म्हणाली, “प्रेरणादायी”

किल्ल्याचा आराखडा पंधरा दिवसात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 20, 2017 12:48 IST

जयकुमार रावल यांची किल्ल्याला भेट : चार प्रकल्पांचा प्रस्ताव करणार

अहमदनगर : ऐतिहासिक भुईकोट किल्ल्याचे पर्यटनदृष्ट्या सुशोभिकरण व विकास करण्यासाठी संरक्षण खाते, राज्याचा पर्यटन विभाग आणि जिल्हा प्रशासन यांनी संयुक्तपणे प्रस्ताव तयार करावा. चार प्रकल्पांचा समावेश असलेला आराखडा पंधरा दिवसात सादर करण्याचा आदेश पर्यटन व रोजगार हमी मंत्री जयकुमार रावल यांनी जिल्हाधिकाºयांना दिले. साईशताब्दी आराखड्यात नगरच्या विकासालाही स्थान देण्याचे संकेत रावल यांनी दिले.पर्यटनमंत्री रावल यांनी रविवारी सकाळी ऐतिहासिक भुईकोट किल्ल्याला भेट दिली. जोराचा पाऊस असुनही मंत्री रावल यांनी किल्ल्याची व नेत्यांच्या कक्षाची पाहणी केली. यावेळी खासदार दिलीप गांधी, जिल्हाधिकारी अभय महाजन, पोलीस अधीक्षक रंजनकुमार शर्मा, जिल्हा परिषदेचे सीईओ विश्वजित माने, महापालिका आयुक्त घनश्याम मंगळे, भाजपचे जिल्हाध्यक्ष प्रा. भानुदास बेरड, उपमहापौर श्रीपाद छिंदम, नगरसेवक सुवेंद्र गांधी आदींची उपस्थिती होती. अनंत देसाई, अभिजित लुणिया यांनीही किल्ल्याच्या सुशोभिकरणाची मागणी असलेले निवेदन मंत्री रावल यांना दिले. मंत्री रावल व खा. गांधी यांनी थेट केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री सुभाष भामरे यांच्याशी मोबाईलवरून संपर्क साधला. त्यावेळी लवकरच किल्ल्याची पाहणी करून केंद्राचा निधी उपलब्ध करून देव, असे भामरे यांनी आश्वासन दिल्याचे रावल यांनी सांगितले.यावेळी नेता कक्षात पत्रकारांशी बोलताना रावल म्हणाले, नगर जिल्ह्यात पर्यटनदृष्ट्या विकास करण्याची मोठी संधी आहे. पर्यटनाला प्राधान्य देणारे मोदी सरकार पहिले सरकार आहे. इनक्रेडिबल इंडियाच्या धर्तीतर अनलिमिटेड महाराष्ट्र या संकल्पेवर आधारीत पर्यटन विकास करण्यात येत आहे. बर्फ सोडून जगातल्या सर्व गोष्टी महाराष्ट्रात आहेत. योगापासून ते आयुर्वेदापर्यंत सर्व वैद्यकीय थेरपींद्वारे एकाच छताखाली उपचार करणारे मेडिकल टुरिझम विकसित केले जाईल. ही केंद्र लोणावळ््याजवळ शिलिम आणि इगतपुरी येथे विकसित केले जाणार आहेत. परदेशातून येणारी ८० टक्के जहाज मुंबईला उतरतील, अशी रचना करण्यात येत असून त्याद्वारे पर्यटन विकासाला चालना मिळणार आहे. शिर्डी-शिंगणापूर-त्र्यंबकेश्वर दर्शनासाठी येणारे भाविक-पर्यटक नगरला येतील,यासाठी पहिल्या टप्प्यात किमान चार प्रस्ताव द्यावेत. साईशताब्दी महोत्सवांतर्गत परिसर विकासातून नगरच्या किल्ल्याच्या सुशोभिकरणालाही प्राधान्य दिले जाईल. महामार्गावर मदतकक्ष स्थापन करण्याचा आराखडा अंतिम टप्प्यात आहे. बस शेड, माहिती केंद्र, टॅक्सी व्यवस्था आदी बाबींचा या मदत कक्षांतर्गत समावेश असेल.------------