शहरं
Join us  
Trending Stories
1
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
2
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
3
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
4
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
5
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
6
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
7
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
8
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
9
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
10
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
11
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
12
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
13
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
14
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
15
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
16
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
17
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
18
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
19
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
20
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
Daily Top 2Weekly Top 5

नगर, शेवगाव,नेवासा, कर्जत उपांत्य फेरीत

By admin | Updated: August 30, 2014 23:20 IST

शेवगाव : मुलींच्या शालेय जिल्हास्तरीय खो-खो स्पर्धेत \नगर, शेवगाव तालुका संघाने, १७ वर्षे वयोगटातून नेवासा, कर्जत व १९ वर्षे वयोगटातून नगर व कर्जत तालुका संघाने उपांत्य फेरीत प्रवेश केला.

शेवगाव : मुलींच्या शालेय जिल्हास्तरीय खो-खो स्पर्धेत १४ वर्षे वयोगटात नगर, शेवगाव तालुका संघाने, १७ वर्षे वयोगटातून नेवासा, कर्जत व १९ वर्षे वयोगटातून नगर व कर्जत तालुका संघाने उपांत्य फेरीत प्रवेश केला.शेवगाव स्पोर्टस् क्लब व विखे फाऊंडेशन इंग्लिश मेडीयम स्कूल यांच्या संयुक्त विद्यमाने आयुर्वेद महाविद्यालयाच्या क्रीडांगणावर दोन दिवस चालणाऱ्या या स्पर्धेचा शुभारंभ शनिवारी शासकीय क्रीडा मार्गदर्शक सुधीर चपळगावकर यांच्या हस्ते व शेवगाव स्पोर्टस् क्लबचे अध्यक्ष अरुण वावरे, डॉ. किरण वाघ, निलेश झिरपे, विनायक वाघमोडे, प्राचार्य अनिल दारकुंडे, क्रीडा शिक्षक योगेश जाधव आदींच्या उपस्थितीत झाला. या स्पर्धेत १४, १७ व १९ वयोगटातील प्रत्येक तालुक्यातील एक याप्रमाणे एकूण ४५ मुलींचे संघ सहभागी झाले आहेत.उपांत्य पूर्व फेरीत १९ वर्षे वयोगटातील नगर व कर्जत तालुका संघात रंगलेल्या अटीतटीच्या लढतीत नगर संघाने कर्जत संघावर दोन गुणांनी मात केली. नगर संघाकडून ऋतुजा भोसले, मयुरी गोरे तर कर्जत संघाकडून निकीता भुजबळ, उर्मिला उघडे यांनी बहारदार खेळ केला तर १७ वर्षे वयोगटातील नेवासा विरुद्ध कर्जत तालुका संघातील रोमहर्षक सामन्यात ज्ञानेश्वर नगर येथील जिजामाता संघाच्या किरण गव्हाणे, प्रतीक्षा काळे, गौरी भगत यांनी चमकदार खेळी करून उपस्थित क्रीडा रसिकांची वाहवा मिळविली. शेवगाव व परिसरात झालेल्या जोरदार पावसामुळे शनिवारी दुपारी ३ नंतर हे सामने थांबविण्यात आले. रविवारी समारोपाच्या दिवशी तीनही गटातील उपांत्य व अंतिम फेरीतील सामने खेळविले जाणार असल्याची माहिती तालुका क्रीडा अधिकारी अरुण वावरे यांनी ‘लोकमत’ला दिली. शनिवारच्या सामन्यात संतोष ढोले, सचिन वाल्हेकर, रमेश लव्हाट यांनी पंच म्हणून काम पाहिले.(तालुका प्रतिनिधी)