शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
6
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
7
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
8
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
9
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
10
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
11
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
12
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
13
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
14
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
15
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
16
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
17
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
18
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
19
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
20
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  

नगर जिल्ह्याचा दहावीचा निकाल ७९.५० टक्के

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 9, 2019 12:28 IST

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शालांत परीक्षा मंडळाच्या वतीने मार्चमध्ये घेण्यात आलेल्या दहावीच्या परीक्षेत पुणे विभागात नगर जिल्ह्याचा निकाल ७९.५० टक्के लागला.

अहमदनगर : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शालांत परीक्षा मंडळाच्या वतीने मार्चमध्ये घेण्यात आलेल्या दहावीच्या परीक्षेत पुणे विभागात नगर जिल्ह्याचा निकाल ७९.५० टक्के लागला. गेल्या तीन वर्षांपासून नगरचा निकाल घसरत असून, यंदाही तिच परंपरा कायम राहिली. नगर जिल्हा पुणे विभागात थेट तिसऱ्या स्थानी फेकला गेला. बारावीच्या निकालाप्रमाणे दहावीच्या निकालातही मुलींनीच बाजी मारली. गेल्या वर्षीचा निकाल ९०.३० टक्के होता.यंदा दहावीच्या परीक्षेसाठी जिल्ह्यातून ७४ हजार १७३ विद्यार्थ्यांची नावनोंदणी झाली होती. यापैकी ७३ हजार ३७६ विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष परीक्षा दिली. यामध्ये ४१ हजार १८० मुले व ३२ हजार १९६ मुलींचा समावेश होता. यापैकी ५८ हजार ३३६ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून, यामध्ये ३० हजार ७४९ मुले व २७ हजार ५८७ मुलींचा समावेश आहे. मुलांचे उत्तीर्ण होण्याचे प्रमाण ७४.६७, तर मुलींचे उत्तीर्ण प्रमाण ८५.६८ टक्के आहे. जिल्ह्यात सर्वांत जास्त निकाल (८३.७३ टक्के) पारनेर तालुक्याचा, तर सर्वांत कमी निकाल (७०.८४ टक्के) नेवासा तालुक्याचा लागला. एकूण ९७२ पैकी ५० शाळांचे निकाल १०० टक्के लागले.१४ हजार २०२ विद्यार्थी प्रावीण्य श्रेणीतनगर जिल्ह्यातील एकूण ७३ हजार ३७६ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. त्यात १४ हजार २०२ विद्यार्थी विशेष प्रावीण्य श्रेणीत उत्तीर्ण झाले. याशिवाय २३ हजार ६४१ जण प्रथम श्रेणीत, १७ हजार २९६ द्वितीय श्रेणीत, तर ३ हजार १९७ विद्यार्थ्यांचा उत्तीर्ण श्रेणीत समावेश आहे.३ रिपिटर प्रावीण्य श्रेणीत४जिल्ह्यात दहावीच्या परीक्षेतील पुनर्परिक्षार्थींचा (रिपिटर) निकाल ३२.५५ टक्के लागला. जिल्ह्यातील २०१६ विद्यार्थ्यांनी पुनर्परिक्षार्थी म्हणून नोंदणी केली. यापैकी २ हजार विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष परीक्षा दिली. यापैकी ३ विद्यार्थी विशेष श्रेणीत उत्तीर्ण झाले. १८ जणांना प्रथम श्रेणी, १६ जण द्वितीय श्रेणीत, तर ६१४ जणांचा उत्तीर्ण श्रेणीत समावेश आहे.

टॅग्स :Ahmednagarअहमदनगर