शहरं
Join us  
Trending Stories
1
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
2
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
3
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
4
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
5
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
6
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
7
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
8
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
9
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
10
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
11
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
12
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
13
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला पदार्पणाची संधी मिळणार?
14
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
15
Shocking: बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; पाहा अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
16
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
17
डोसा प्रकरणात नवा ट्विस्ट, आजी-आजोबांवर संशय; २ मुलींच्या वडिलांनी पोलिसांना काय सांगितलं?
18
Video: फक्त २ वर्षातच मुलीने फेडलं ३० लाखांचं शैक्षणिक कर्ज; सांगितल्या ४ सोप्या ट्रीक
19
“शालेय वाहतूक अधिक सुरक्षित, पारदर्शक, उत्तरदायी करण्यास सरकार कटिबद्ध”: प्रताप सरनाईक
20
धक्कादायक! कोणीही मुली देईना, मच्छरांच्या त्रासामुळे 'या' गावातील मुलांचं लग्नच जमेना
Daily Top 2Weekly Top 5

बुरूडगावला मिळणार महापालिकेचे पाणी!

By admin | Updated: September 3, 2014 23:58 IST

अहमदनगर: गत तीन वर्षापासून पिण्याच्या पाण्यासाठी सुरू असलेली बुरूडगावकरांची भटकंती आता थांबणार आहे.

अहमदनगर: गत तीन वर्षापासून पिण्याच्या पाण्यासाठी सुरू असलेली बुरूडगावकरांची भटकंती आता थांबणार आहे. महासभेत बुरूडगावचा पाणी पुरवठा पूर्ववत करण्याचा निर्णय घेण्यात आला. मागील थकबाकी व आकारण्यात येणाऱ्या पाणी पट्टीविषयी गावकऱ्यांशी चर्चा करून तसेच शासनाचे मार्गदर्शन मागवून निर्णय घेण्यास सभेने मान्यता दिली. सप्टेंबर २०११ मध्ये महापालिका हद्दीतून बुरूडगाव वगळण्यात आल्यानंतर पालिकेने गावचा पाणी पुरवठा बंद केला. तेव्हापासून गावकऱ्यांची पाण्यासाठी भटकंती सुरू होती. गावकऱ्यांकडे १२ लाख रुपयांची थकबाकी असल्याने ती वसुली करण्याबरोबरच हद्दीत नसल्याने पाणी पुरवठा करण्याचा विषय महासभेसमोर होता. नगरसेवक गणेश भोसले, अनिल शिंदे यांनी पाणी पुरवठा पूर्ववत सुरू करण्याची मागणी केली. कैलास गिरवले यांनी तर पाणी पुरवठा पूर्ववत करण्याबरोबरच मागील थकबाकी माफ करून यापुढील काळात बुरूडगावकरांना मोफत पाणी पुरवठा करावा अशी मागणी केली. शहरातील कचरा बुरूडगाव हद्दीत जमा केला जातो. त्याचा त्रास ते नागरिक सहन करतात. त्यामुळे मोफत पाणी दिले तर बिघडले कुठे असा सवाल त्यांनी केला. बाळासाहेब बोराटे यांनी फुकटात पाणी देण्यास विरोध दर्शविला. आगामी विधानसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेऊन छान-छान निर्णय घेऊ नये असे बोराटे म्हणाले. आगरकर यांनीही त्यास आक्षेप घेत शासनाचे मार्गदर्शन मागविण्याची सूचना केली. महापौर जगताप यांनी बुरूडगावचा पाणी पुरवठा पूर्ववत करण्यात येईल. गावकऱ्यांशी चर्चा करून मागील थकबाकी-पाणी पट्टी दर आकारणी, शासनाचेही मार्गदर्शन मागविण्याचा ठराव संमत केला.ा्रतिनिधी)