शहरं
Join us  
Trending Stories
1
तुमच्या आकांसमोर झुकू नका, सॅलरी कापणार नाहीत; सुप्रीम कोर्टाने केली IPS अधिकाऱ्याची कानउघडणी
2
चुकीचा निवडणूक डेटा पोस्ट करणं संजय कुमारांना भोवलं; महाराष्ट्र निवडणूक आयोगाची मोठी कारवाई
3
वासनांध भोंदूबाबाचा प्रताप, महिलेसोबत अश्लील कृत्य; तंत्रमंत्राने कुटुंबियांना भस्म करण्याची धमकी
4
पाकिस्तानची झोप उडणार! ५ हजार किमी रेंज असणाऱ्या 'अग्नी ५' मिसाइलची भारतानं केली यशस्वी चाचणी
5
राजधानी दिल्ली तिहेरी हत्याकांडानं हादरली; एकाच घरात ३ मृतदेह सापडले, कारण समजताच पोलीस हैराण
6
ODI Rankings मध्ये गडबड घोटाळा! ICC चा रिव्ह्यू अन् टॉप ५ मध्ये पुन्हा झळकलं रोहित-विराटचं नाव
7
अमेरिकेत ५ तास थांबणे व्लादिमीर पुतिन यांना महागात पडले! डोनाल्ड ट्रम्प यांनी २.२ कोटी आकारले; नेमके प्रकरण काय?
8
खराब अन् खड्डेमय रस्त्यांसाठी टोल घेणे योग्य नाही; सुप्रीम कोर्टाचा ऐतिहासिक निर्णय
9
रुग्णालयाने भरती करण्यास दिला नकार, 12 वर्षाच्या मुलाने बापाच्या खांद्यावरच सोडला जीव
10
जिओ वापरकर्त्यांसाठी वाईट बातमी! दररोज १.५ जीबी डेटासह ८४ दिवसांचा प्लॅन बंद
11
'मी अटक होण्यापूर्वीच राजीनामा दिला होता', अमित शाहांनी सोडलं मौन; वादाचा मुद्दा काय?
12
थयथयाट होणार! रशियाने भारताला कच्च्या तेलावर ५ टक्के सूट सुरुच ठेवली; पुतीन ट्रम्पना भेटून येताच...
13
एरिया मॅनेजरचा पराक्रम! टारगेट पूर्ण करण्यासाठी रेव्ह पार्टी दिली, ३७ जणांना अडकवलं अन्...
14
'ऑनलाइन गेमिंग विधेयक' लोकसभेत मंजूर; Online Games खेळणाऱ्यांसाठी काय आहे शिक्षेची तरतूद?
15
'मोठा धक्का बसला, पण आता...', हल्ल्यानंतर मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांची पहिली प्रतिक्रिया
16
'रॅपिडो'ला जबर झटका! १० लाखांचा दंड, ग्राहकांना पैसे करण्याचे कंपनीला आदेश; प्रकरण काय?
17
महाराष्ट्रातील कोणकोणत्या टोल नाक्यांवर चालणार ३ हजार रूपयांचा वार्षिक FASTag पास? वाचा यादी
18
लोकसभेत मोठा गोंधळ, विरोधकांनी फाडले विधेयक; कागद अमित शाहांच्या दिशेने भिरकावले, काय घडलं?
19
ऑनलाईन दरोडा! दरवर्षी ४५ कोटी भारतीय गमावताहेत २० हजार कोटी रुपये
20
धाडसाला सलाम; पती आणि मुलाचा जीव वाचवण्यासाठी मगरीशी लढल्या, गावातून कौतुकाचा वर्षाव

मोहटा देवस्थानच्या अतिक्रमणाविरोधात ग्रामस्थांचे उपोषण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 11, 2017 22:35 IST

पाथर्डी : मोहटा देवस्थानने वनविभागाकडे तक्रारी करून पूजा साहित्य विक्री करणाºया ग्रामस्थांचे अतिक्रमण हटविले. मात्र, देवस्थानने स्वत:च अतिक्रमण केले असताना ते हटविले जात नाही, असा आरोप करत मोहटा ग्रामस्थांनी सोमवारी तहसील कार्यालयासमोर उपोषण सुरु केले होते. याप्रश्नी १५ सप्टेंबरला बैठक बोलविण्याचे आश्वासन तहसीलदार व वनविभागाने दिल्यानंतर उपोषण स्थगित करण्यात आले.

लोकमत न्यूज नेटवर्कपाथर्डी : मोहटा देवस्थानने वनविभागाकडे तक्रारी करून पूजा साहित्य विक्री करणाºया ग्रामस्थांचे अतिक्रमण हटविले. मात्र, देवस्थानने स्वत:च अतिक्रमण केले असताना ते हटविले जात नाही, असा आरोप करत मोहटा ग्रामस्थांनी सोमवारी तहसील कार्यालयासमोर उपोषण सुरु केले होते. याप्रश्नी १५ सप्टेंबरला बैठक बोलविण्याचे आश्वासन तहसीलदार व वनविभागाने दिल्यानंतर उपोषण स्थगित करण्यात आले. याबाबत ग्रामस्थांनी ३० आॅगस्टला तहसीलदारांना निवेदन दिले होते. त्यात म्हटले आहे, आम्ही सर्व छोटे व्यावसायिक गत ५० वर्षांपासून मोहटा गडावर पूजासाहित्य, स्टेशनरी विक्री करून उदरनिर्वाह चालवत होतो. परंतु देवस्थानचे विश्वस्त व मुख्य कार्यकारी अधिकाºयांनी वन विभागाकडे तक्रारी करुन आमची अतिक्रमणे हटविण्यास भाग पाडले. मात्र याच विश्वस्त मंडळाने बेकायदेशीर उत्खनन करून झाडे तोडून वन विभागाच्या क्षेत्रावर अतिक्रमण केलेले असताना प्रशासन त्यांच्यावर कारवाई करत नाही. याप्रकरणात देवस्थानने न्यायालयाच्या आदेशाचाही अवमान केलेला आहे. आमची वाहने वनजमिनीत आढळली की कारवाई होते, मात्र देवस्थानला येणाºया शेकडो वाहनांची पार्किंग वनविभागाच्या जागेत असताना हा विभाग काहीच कारवाई करत नाही. आम्ही संघटनेच्या वतीने २०१२-१३ मध्ये वनजमीन मागणीसाठी आंदोलने केली होती. त्यावेळेस केंद्र शासनाच्या पूर्व परवानगीशिवाय वनजमीन देता येत नाही, असे वनविभागाने कळविले होते. त्यानुसार राज्य शासनाने केंद्राकडे प्रस्ताव पाठविण्याची शिफारस केली होती. तत्कालीन वनमंत्री बबनराव पाचपुते यांनी अतिक्रमणे न काढता प्रस्ताव दाखल करा, अशा सूचना केल्या होत्या. मात्र, वनविभागाने देवस्थानचे विश्वस्त व कार्यकारी अधिकाºयांच्या दबावापोटी आमची अतिक्रमणे हटवली. सरपंच हर्षवर्धन पालवे हेही ग्रामपंचायतची दिशाभूल करत आहेत. आम्ही मंदिर पाडायला निघालो आहोत, अशा अफवा पसरवून देवस्थानच्या अतिक्रमणाला अभय दिले जात आहे. गुंडांकरवी आम्हाला धमक्याही दिल्या जात आहेत.निवेदनावर सुनील जाधव, सोपान भिंगारे, अशोक कुºहाडे, अंबादास डोंगरे, आजिनाथ दहिफळे, आसाराम दहिफळे, बंडू बन, नवनाथ चिंतामणी, विजय डोंगरे, गणेश घुले, देविदास लोखंडे, सचिन आव्हाड, रावसाहेब पालवे, रमेश डोंगरे यांच्या स्वाक्षºया आहेत. निवेदनावर काहीच कार्यवाही न झाल्याने ग्रामस्थांनी सोमवारी भर पावसात उपोषण केले. त्यांना प्रा. किसन चव्हाण यांनीही पाठिंबा दिला. सायंकाळी उपोषणकर्ते ग्रामस्थ, तहसीलदार नामदेव पाटील तसेच वनपरिक्षेत्रपाल शिरीष निर्भवणे यांच्यात चर्चा झाली. येत्या पंधरा तारखेला ४ वाजता याबाबत मार्ग काढण्यासाठी तहसीलदारांच्या दालनात विश्वस्त- मुख्याधिकाºयांची बैठक बोलावण्यात येईल, असे आश्वासन तहसीलदारांनी दिले. त्यानंतर उपोषण स्थगित करण्यात आले. तहसीलदार पाटील यांनी ‘लोकमत’शी बोलताना यास दुजोरा दिला.