शिर्डी : केदारनाथ, पशुपतीनाथ मंदिरानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी आता साईदरबारी हजेरी लावणार आहेत़ तशी इच्छाही त्यांनी प्रदर्शित केली असून शिर्डीचे खासदार सदाशिव लोखंडे यांनी यास दुजोरा दिला आहे़महाराष्ट्राच्या खासदारांनी नुकतीच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची दिल्लीत भेट घेतली़ यावेळी खासदार लोखंडे यांनी साईसमाधी शताब्दीला निधीची आवश्यकता असल्याची बाब त्यांच्या निदर्शनास आणून दिली होती़ याशिवाय त्यांनी मोदींना शिर्डी भेटीचे निमंत्रणही दिले़ त्यावेळी मोदी यांनी आपणही साईदर्शनासाठी इच्छुक असून अधिवेशन संपल्यानंतर किंवा पुढील महिन्यात त्यासाठी प्रयत्न करु, अशी ग्वाही दिली आहे़ सहा वर्षापूर्वी १५ जून २००८ रोजी मोदी यांनी साईदरबारी हजेरी लावली होती.
मोदी साईदरबारी ?
By admin | Updated: August 8, 2014 00:07 IST