शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election : महापालिका, जिल्हा परिषदांच्या निवडणुका कधी होणार? समोर आली मोठी अपडेट
2
Iran Israel War : 'पुतिन आमची मदत करा...', इस्रायलने बॉम्ब टाकल्यावर खामेनींना रशियाची आठवण झाली, परराष्ट्रमंत्र्यांना दूत म्हणून पाठवले
3
पतीचा तिनदा जीव घेण्याचा केला प्रयत्न; चौथ्यांदा चिकन भात खायला देत कायमचा संपवला
4
डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वतःच मारली अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेवर कुऱ्हाड, आता 'चावी' इराणकडे! 
5
अर्धशतकासह KL राहुलनं ८ वर्षांनी साधला हा डाव; शतकी दुष्काळ संपवण्याचीही संधी
6
Nag Panchami 2025: यंदा नागपंचमी कधी? कालसर्प दोष निवारणासाठी 'हा' दिवस राखीव ठेवाच!
7
युद्ध आणि मंदीचं सावट! दिग्गज IT शेअर्स कोसळले, पण 'या' सेक्टर्सने वाचवला बाजार; आज काय घडलं?
8
डबल लॉटरी...! आपने पंजाब पोटनिवडणूक जिंकली अन् राज्यसभेची एक जागा रिक्त झाली
9
स्वामींच्या मठात गेल्यावर तुम्हालाही ‘या’ २ गोष्टींचा अनुभव आला आहे का? उत्तर हो असेल तर...
10
रशियाने इराणला का मदत केली नाही? राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी सांगितले कारण! म्हणाले...
11
Samudra Shastra: व्यक्तीच्या नाकाची ठेवण सांगते, तिला 'राजयोग' मिळणार की 'संसार भोग'!
12
१०६ मुलांचा बाप आहे 'हा' व्यवसायिक, प्रत्येकाला दिले ११०० कोटी; परंतु ठेवलीये एक अट
13
पृथ्वी शॉ मुंबई संघ सोडण्याच्या तयारीत! कारण...
14
युद्धाच्या मैदानात आता 'मच्छर' उतरवणार चीन?; असं तंत्रज्ञान ज्याचा अमेरिकेने विचारही केला नसेल
15
IND vs ENG: भारत- इंग्लंड कसोटी मालिकेला 'अँडरसन- तेंडुलकर ट्रॉफी' नाव दिल्यानं गावस्कर भडकले, म्हणाले...
16
ना पाकिस्तान, ना अफगाणिस्तान, मग इराणपर्यंत कसे पोहोचले B-2 बॉम्बर? खुद्द अमेरिकेनेच केला खुलासा
17
हे काय चाललंय? गोविंदाने लहान मुलीच्या खांद्यावर ठेवलं डोकं; नेटकरी म्हणाले, 'विचित्र माणूस...'
18
तुमच्या आधार कार्डवरुन कोणी कर्ज घेतलंय का? लगेच तपासा; ही आहे प्रोसेस
19
निवृत्तीनंतरही जगा 'राजासारखं'! 'या' ५ सरकारी पेन्शन योजना तुम्हाला आयुष्यभर देतील पैसाच पैसा!
20
पाणलोट क्षेत्रात जोर'धार'; गंगापुर धरणाचा विसर्ग झाला दुप्पट, गोदावरीला पुरसदृश्य स्थिती

मोबाईल कॉल दर होणार ३ पटीने कमी

By admin | Updated: June 11, 2014 00:17 IST

लोकमत व टेलिकॉम आॅपरेटर कंपनीने आणली अभिनव योजना

अहमदनगर : प्रत्येकाच्या जीवनाचा एक अविभाज्य घटक बनलेल्या मोबाईललाही महागाईच्या झळा बसत आहेत. त्यामुळे मोबाईलचे कॉल दर दिवसेंदिवस वाढत असून ते आता सामान्यांच्या अवाक्याबाहेर जावू लागले आहेत. या कॉल दराच्या महागाईला ‘लोकमत’ आळा घालणार आहे टेलिकॉम आॅपरेटरच्या साथीने! तळागाळातील नागरिकालाही परवडेल अशी एक खास योजना लवकरच नगरकरांच्या भेटीला येत आहे. ‘लोकमत’चा अंक घेऊन या योजनेत नागरिकांना भाग घेता येणार असून, त्यांना सध्याच्या कॉलरेटपेक्षा तब्बल ३ पटींने कमी दर असलेले टेलिकॉम आॅपरेटर कंपनीचे सिमकार्ड मिळणार आहे. मोबाईल आज प्रत्येकाच्या गरजेची वस्तू झाली आहे. त्यामुळे टेलिकॉमची सेवा अनेक कंपन्यांकडून दिली जात आहे. मात्र महागाईमुळे आज या कंपन्या कॉलचे दर दिवसेंदिवस वाढवत आहे. साधारणत: सेकंद आणि एका मिनिटासाठी सुमारे १ रूपयापर्यंत दर काही कंपन्यांकडून आकारला जात आहे. एवढेच नव्हे तर काही कंपन्या प्रत्येक सेकंदालाही पैसे आकारतात. यात एसटीडी कॉलचे दर, इतर कंपन्यांच्या मोबाईलवर केलेल्या फोनचे दर तर खूपच जास्त असतात. यामुळे मोबाईलचे बील देणे किंवा रिचार्ज करणे अनेकांना जिकीरीचे झाले आहे. आणि सामान्यांचे खिसे खाली होत आहेत.हा त्रास ओळखून ‘लोकमत’ आणि एका टेलिकॉम आॅपरेटर कंपनीने वाढत असलेल्या दरांना छेद देत सध्या बाजारात असलेल्या दरांपेक्षा तब्बल ३ पटींने कमी कॉल दर असलेली एक योजना आणली आहे. विशेष म्हणजे, या योजनेअंतर्गत देशभरात कोठेही फोन केला तरी कॉल दर एकच राहणार आहे. लोकल कॉल असो किंवा एसटीडी कॉल दर एकच आणि सर्वात कमी असल्याने मोबाईल ग्राहकांसाठी ही एक आनंदाची पर्वणीच असणार आहे. या योजनेअंतर्गत ‘लोकमत’च्या अंकाबरोबर वाचकांना सिमकार्ड व कनेक्शन पूर्णपणे मोफत मिळणार आहेत.‘लोकमत’मध्ये या योजनेची जाहिरात दि. १२ जून रोजी येणार असून ती घेऊन सिमकार्ड मिळणाऱ्या कोणत्याही दुकानात गेल्यानंतर कमी कॉलरेटची आॅफर दिलेल्या टेलिकॉम आॅपरेटर कंपनीचे सिमकार्ड आणि त्याचे कनेक्शन पूर्णपणे मोफत मिळणार आहे. गेल्यावर्षी गणेशोत्सवाच्या काळातही अशी एक अभिनव योजना ‘लोकमत’च्या वाचकांसाठी आणण्यात आली होती. ज्याला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला होता आणि अनेक ग्राहकांना त्याचा फायदा झाला होता. (प्रतिनिधी)अशी आहे योजना...कॉल रेट सर्वांपेक्षा कमीएसटीडी कॉल रेटही लोकल दराप्रमाणेचसिमकार्ड मिळणार पूर्णपणे मोफतकनेक्शनसाठी एक रूपयाही द्यावा लागणार नाही