शहरं
Join us  
Trending Stories
1
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
2
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
3
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
4
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
5
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
6
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
7
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
8
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
9
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
10
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
11
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
12
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
13
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला पदार्पणाची संधी मिळणार?
14
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
15
Shocking: बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; पाहा अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
16
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
17
डोसा प्रकरणात नवा ट्विस्ट, आजी-आजोबांवर संशय; २ मुलींच्या वडिलांनी पोलिसांना काय सांगितलं?
18
Video: फक्त २ वर्षातच मुलीने फेडलं ३० लाखांचं शैक्षणिक कर्ज; सांगितल्या ४ सोप्या ट्रीक
19
“शालेय वाहतूक अधिक सुरक्षित, पारदर्शक, उत्तरदायी करण्यास सरकार कटिबद्ध”: प्रताप सरनाईक
20
धक्कादायक! कोणीही मुली देईना, मच्छरांच्या त्रासामुळे 'या' गावातील मुलांचं लग्नच जमेना
Daily Top 2Weekly Top 5

आमदार, नगराध्यक्ष बसले उपोषणाला : श्रीरामपूर तालुका दुष्काळी जाहीर करण्याची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 5, 2019 19:03 IST

श्रीरामपूर तालुक्यात दुष्काळ जाहीर करून, दुष्काळाच्या सवलती तातडीने सुरु करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण करण्यात आले.

अहमदनगर : श्रीरामपूर तालुक्यात दुष्काळ जाहीर करून, दुष्काळाच्या सवलती तातडीने सुरु करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण करण्यात आले. यामध्ये आमदार भाऊसाहेब कांबळे, श्रीरामपूरच्या नगराध्यक्षा अनुराधा आदिक, सभापती दीपकराव पटारे, शरद नवले, संगीता गांगुर्डे, कल्याणी कानडे, वैशाली मोरे, गिरीधर आसने, गणेश मुद्गुले, रामभाऊ लीपटे, भाऊसाहेब बांद्रे, राधाकृष्ण आहेर, संतोष कानडे, संजय बाहुले, रज्जाक पठाण, संचित गिरमे, नितीन थोरात, शिवाजी शेजूळ, संदीप शेलार, अनिल थोरात, कलीम कुरेशी, राजेश अलघ, रवींद्र गुलाटी, शामलिंग शिंदे, अंजुमभाई शेख आदिंसह पदाधिकारी सहभागी झाले.श्रीरामपूर तालुक्यात सरासरीपेक्षा अत्यल्प पाऊस झालेला असून, सध्या पाणीप्रश्न गंभीर बनला आहे. शेती व्यवसाय प्रचंड अडचणीत आलेला आहे. श्रीरामपूर महसूल अंतर्गत चार महसूल मंडळे आहेत. यापैकी बेलापूर महसूल मंडळात शासनाने दुष्काळ जाहीर केलेला आहे. बेलापूर महसूल मंडळापेक्षा गंभीर परिस्थिती इतर तिन्ही महसूल मंडळात असतानाही ते दुष्काळाच्या सवलतीपासून अद्यापर्यंत वंचित आहे. या तिन्ही मंडळात खरिपाच्या पेरण्या झालेल्या नाहीत. श्रीरामपूर तालुका कृषी अधिकारी यांच्या अहवालात ज्वारीचे पीक नसल्याबाबत कळवलेले आहे. तसेच रब्बी हंगामातील सूर्यफूल, करडई, जिरायत गहू या पिकांची पेरणी देखील झालेली नसल्याचे जिल्हा कृषी अधिक्षक यांनी संयुक्त अहवाल सादर केलेला आहे. उसासारखे एकमेव शाश्वत उत्पादन देणारे पीकही हुमनी आळीमुळे बाधित झाल्याने त्याचे उत्पन्न मोठ्या प्रमाणात घटले आहे. कपाशीला बोंड अळीचा प्रादुर्भाव झाल्याने तसेच सोयाबीन सारख्या पिकाचे विम्याचे पैसे मिळालेले नाही. त्यामुळे शेतकरी प्रचंड आर्थिक अडचणीत असून मानसिक तणावाचे जीवन जगत आहे. जिल्ह्यात सर्वत्र दुष्काळ जाहीर होऊनही श्रीरामपूर तालुक्यावर अन्याय करण्यात आल्याचे निवेदनात म्हटले आहे.श्रीरामपूर तालुक्यातील अनेक गावांमध्ये पिण्याच्या पाण्याची व जनावरांच्या चा-याची परिस्थिती अतिशय गंभीर झालेली आहे. निळवंडे धरणातून सध्या सोडलेल्या पाण्यातून पिण्याच्या पाण्याबरोबर शेती सिंचनाचे आवर्तन सोडण्याची मागणी करण्यात आली आहे. अन्यथा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे.

टॅग्स :Ahmednagarअहमदनगर