राहाता तालुक्यातील पिंपळस हद्दीतील दिगंबर तांबे याच्या शेताजवळ गेल्या दहा ते बारा दिवसांपासून एक नर जातीचे अंदाजे नऊ ते दहा महिल्यांचे पाडस कळप चुकून आले आहे.
कळप सापडत नसल्याने ते तांबे यांच्या शेळ्यांच्या कळपाचा दिवसा सहारा घेत आहे. सकाळी सात वाजता तांबे यांनी शेळ्या बाहेर सोडताच हे पाडस शेळ्यांच्या कळपात दाखल होते. दुपारी शेळ्या बांधल्यानंतर ते तांबे याच्या वस्तीभोवती हिंडते. दुपारी शेळ्या सोडल्यावर ते पुन्हा शेळ्यांच्या कळपात दाखल होते. संध्याकाळी शेळ्या बांधल्यावर रात्री शेतात गायब होते, असा या पाडसाचा दिनक्रम ठरला आहे. वन विभागाने पाडसाला घेऊन जावे, अशी मागणी दिगंबर तांबे यांनी केली आहे.