शहरं
Join us  
Trending Stories
1
गुजरातमध्ये निनावी पक्षांना ₹४३०० कोटींची देणगी..; राहुल गांधींचा निवडणूक आयोगावर हल्लाबोल
2
"हिंदू राष्ट्र म्हणजे केवळ हिंदू नाही, तर..."; समाजातील दुहीवर मोहन भागवतांचं स्पष्ट भाष्य
3
धक्कादायक! भटक्या कुत्र्यांची दहशत, चावल्यामुळे नववीच्या विद्यार्थ्याचा तडफडून मृत्यू
4
अचानक राजीनामा दिल्यानंतर, काय करतायत जगदीप धनखड? पत्नी वारंवार का जात आहे राजस्थानला?
5
हृदयद्रावक! "भाऊ, सर्वनाश झाला, आपला मुन्नू गेला..."; ढसाढसा रडत मोठ्या भावाला फोन
6
पंजाबमध्ये पुरामुळे कहर, नवोदय विद्यालयात ४०० मुले आणि शाळेतील कर्मचारी अडकले; पालक प्रशासनावर संतापले
7
"खू्प कर्ज झालंय..."; सचिन-शिवानीने आधी चार वर्षाच्या मुलाला विष दिलं अन् स्वतःला संपवलं; चिठ्ठीत काय?
8
युतीचा श्रीगणेशा! उद्धव ठाकरे सहकुटुंब राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपतीचं घेतले दर्शन
9
भारतावर 50% टॅरिफ लावून ट्रम्प यांनी स्वतःच्याच पायावर कुऱ्हाड मारली, आता लागणार अमेरिकेची 'लंका'! आला असा अहवाल
10
R Ashwin: आर. अश्विन आयपीएलमधून निवृत्त, फक्त विदेशी क्रिकेट लीगमध्ये खेळणार!
11
ऑनलाईन App वरुन ऑर्डर केलं जेवण अन् डिलिव्हरी बॉयच्याच पडली प्रेमात, आता केलं लग्न
12
अष्टविनायक चित्रपटातील साधीभोळी गणेशभक्त वीणा आता दिसते अशी, अनेक वर्षे होती चित्रपटांपासून दूर
13
"सूनेने गोळी मारून हत्या केली, माझा मुलगा रक्ताच्या थारोळ्यात पडलेला होता"; तीन महिन्यातच पतीची हत्या
14
अर्चनानंतर आता श्रद्धा तिवारी गायब...; कुटुंबानं मुलीचा उलटा फोटो दरवाजाच्या चौकटीला लावला
15
खळबळजनक! कॉन्स्टेबलने कुटुंबीयांच्या मदतीने पत्नीला जिवंत जाळलं, प्रकृती गंभीर
16
ChatGPT ने मुलाला आयुष्य संपवण्याचे ट्यूशन दिले, पालकांनी न्यायालयात सगळीच माहिती सांगितली
17
"लोक ओरडत होते, मी दगड पडताना पाहिले, मला..."; वैष्णोदेवी मार्गावर नेमकं काय घडलं?
18
३६ दिवस डिजिटल अरेस्ट; सायबर ठगांनी निवृत्त एअरफोर्स अधिकाऱ्याकडून ३.२२ कोटी लुटले...
19
बाप्पाला आणताना, नेताना, पूजा करताना मूर्तीचा भाग 'दुभंगला' तर अशुभ? धर्मशास्त्र सांगते... 
20
गणेशोत्सवानिमित्त सांस्कृतिक कार्य विभागाच्या वतीने रील स्पर्धेचे आयोजन, प्रथम क्रमांकाला एक लाखांचे बक्षीस

अश्लील साईटच्या आहारी अल्पवयीन मुले

By admin | Updated: June 27, 2014 00:20 IST

अहमदनगर : आपली अल्पवयीन मुले-मुली स्मार्टफोनचा वापर करीत असतील, तर सावधानता बाळगा.

अहमदनगर : आपली अल्पवयीन मुले-मुली स्मार्टफोनचा वापर करीत असतील, तर सावधानता बाळगा. कारण, ते पोर्न वेबसाईटस्च्या आहारी तर गेले नाहीत ना, याची खात्री करून घ्या. १० ते १८ वयोगटातील ६६ टक्के मुला-मुलींनी अश्लील वेबसाईटस् पाहत असल्याचे कबूल केले. एवढेच नव्हे तर अन्य मित्र- मैत्रिणींनाही ते व्हिडिओ, फोटो शेयर करीत असल्याचेही सांगितले. ही धक्कादायक माहिती, मुंबईतील कम्युनिटी डेव्हलपमेंट ट्रस्टने राज्यातील अहमदनगरसह ६ जिल्ह्यांत केलेल्या सर्वेक्षणातून उजेडात आली आहे. इंटरनेटच्या मायाजालात अल्पवयीनांचे बाल्यमन हरवत असल्याचे सिद्ध झाले आहे. ‘मोबाईल आणि इंटरनेटचा वापर आणि किशोरवयीन बालके’ हा सर्वेक्षणाचा विषय होता. यात राज्यातील मुंबई, कल्याण, अहमदनगर, औरंगाबाद, अकोला व बुलढाणा या सहा जिल्ह्यांत १० ते १९ वर्षांपर्यंतच्या अल्पवयीनांचा सर्व्हे करण्यात आला. यात १० ते १४ वर्षे वयोगटातील १५२, तर १५ ते १९ वर्षे वयोगटातील ३३६ व १९ वर्षांवरील १२ जणांचा समावेश होता. यात १९२ मुली व ३०८ मुलांना सहभागी करण्यात आले. १९८ मुला- मुलींनी वयाच्या १० वर्षांपासून, तर ३०२ जणांनी वयाच्या १५ व्या वर्षांपासून मोबाईल, इंटरनेट वापरण्यास सुरुवात केली. ६७ टक्के मुला- मुलींनी सांगितले की, त्यांना ओळखीच्या व काहीवेळा अनोळखी व्यक्तीकडून अश्लील एसएमएस, एमएमएस प्राप्त झाले आहेत. ७४ टक्के जण इंटरनेटचा वापर गाणे, गेम, व्हिडिओ डाऊनलोड करण्यासाठी करीत आहेत. ५५ टक्के म्हणाले की, शाळेचा प्रोजेक्ट तयार करण्यासाठी इंटरनेटचा वापर करीत आहेत, तर ६० टक्के जण चॅटिंग करण्यासाठी इंटरनेटचा वापर करतात. त्यातही ७७.६ टक्के मुले- मुली सोशल नेटवर्किंग साईटचा वापर करीत आहेत. धक्कादायक बाब म्हणजे यातील ६६.२ टक्के मुला-मुलींना अश्लील फोटो, व्हिडिओ क्लिप प्राप्त झाले ते त्यांनी आपल्या मित्र- मैत्रिणींनाही पाठविले. एवढेच नव्हे तर त्यांनी पोर्न वेबसाईट पाहिल्याची कबुली दिली. ४२.२ टक्के अल्पवयीन दररोज नियमितपणे इंटरनेटचा वापर करीत आहेत. बहुतांश जण आपल्या पालकांच्या अनुपस्थितीत इंटरनेटचा वापर करीत असल्याचेही सर्वेक्षणातून समोर आले.सर्वेक्षणातून अशी माहिती मिळाली की, गंमत म्हणून अनेकांच्या हातात आपल्या आई-वडिलांनी मोबाईल दिला. काही मुले तर पोर्न फिल्मच्या आहारी गेले आहेत. एवढेच नव्हे तर दिवसातून एकदातरी नवीन फिल्म बघितल्याशिवाय या मुलांची बेचैनी थांबत नाही. पालकांनी आपल्या मुलांच्या हातात मोबाईल द्यावा; पण आपल्यासमोर तो हाताळावा, अशी सक्ती करा, असे तज्ज्ञांनी मत व्यक्त केले आहे. इंटरनेट आॅडिक्शनजिज्ञासा आणि व्यसन यात फरक आहे. काही मुले जिज्ञासेपोटी हे व्हिडिओ पाहतात. काहींना मात्र, त्याचे व्यसन लागले आहे. पूर्वी पिवळे साहित्य वाचले जायचे. आज मोबाईलमुळे व्हिडिओ, साईट सहजी उपलब्ध होत असल्याने मुलीही त्यात ओढल्या आहेत. पौगंडावस्थेतील मुली रोमँटिक असतात, तर मुलांना सेक्सची ओढ असते. मानसिक पातळीवर हा व्यवहार चालतो. आपल्याकडे लैंगिक शिक्षणाची सोय नसल्याने मुलांना अशा व्हिडिओची जिज्ञासा वाटते. मुलांना शास्त्रीयदृष्ट्या लैंगिक शिक्षण शाळांमधून दिल्यास असे प्रकार कमी होतील. अन्यथा असे व्हिडिओ पाहून वाममार्गाला लागण्याची शक्यता जास्त असते. पालकांनी मुलांवर लक्ष द्यायला हवे. -डॉ. वसंत देसले, मानसशास्त्राचे प्राध्यापकसामाजिक दुष्परिणामस्मार्ट फोनमुळे मुलांचे भावविश्वच बदलून गेले आहे. याचे दुष्परिणाम समाजात दिसून येतात. यापुढे व्यसन असेच जडत गेले तर फार मोठ्या परिणामांना समाजाला सामोरे जावे लागेल. भविष्यात ते कोणत्या पातळीपर्यंत जातील, याची कल्पनाही करवत नाही. अश्लिल व्हिडिओ पाहण्याचे हे लोण खेड्यातही पोहोचले आहे. ते व्यसन दारूपेक्षाही वाईट आहे. पालकांचे आपल्या पाल्याकडे दुर्लक्षच यास कारणीभूत आहे. पालकांसोबत शिक्षकांनीही विद्यार्थ्यांना हातात कोणत्या वयात स्मार्ट फोन द्यावा, हे ठरवावे. परदेशात फोनच्या व्यसनामुळे घटस्फोट होतात. मुलांना दूध पाजायलाही त्यांच्याकडे वेळ नाही. ही वेळ आपल्याकडे येऊ नये.-डॉ. शरद कोलते, समाजशास्त्रज्ञ, नगरसर्वेक्षण कसे केलेकम्युनिटी डेव्हलपमेंट ट्रस्टचे कार्यकारी विश्वस्त सुरेश शेळके, सामाजिक कार्य महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. हेमलता कुलकर्णी, प्रा. युसूफ बेन्नुर व प्रा. नंदकुमार गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली हा सर्व्हे एप्रिल-मे २०१४ दरम्यान राज्यातील ६ जिल्ह्यांत करण्यात आला. रेणुका कड, मयुरी मालवी, करुणा महंतारे, सरिता तिवारी, कविता सरविय्या यांनी सर्व्हे केला. सहा जिल्ह्यांतील १० ते १९ वर्षे वयोगटातील ५०० मुला-मुलींशी संपर्क साधून त्यांच्याकडून प्रश्नपत्रिका भरून घेण्यात आली. त्यातून रँडम सॅम्पलिंग पद्धतीने सारणी, विश्लेषण, शोध आणि शेवटी निष्कर्ष काढण्यात आले.