शहरं
Join us  
Trending Stories
1
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
2
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
3
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
4
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
5
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
6
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
7
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
8
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
9
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
10
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
11
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
12
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
13
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला पदार्पणाची संधी मिळणार?
14
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
15
Shocking: बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; पाहा अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
16
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
17
डोसा प्रकरणात नवा ट्विस्ट, आजी-आजोबांवर संशय; २ मुलींच्या वडिलांनी पोलिसांना काय सांगितलं?
18
Video: फक्त २ वर्षातच मुलीने फेडलं ३० लाखांचं शैक्षणिक कर्ज; सांगितल्या ४ सोप्या ट्रीक
19
“शालेय वाहतूक अधिक सुरक्षित, पारदर्शक, उत्तरदायी करण्यास सरकार कटिबद्ध”: प्रताप सरनाईक
20
धक्कादायक! कोणीही मुली देईना, मच्छरांच्या त्रासामुळे 'या' गावातील मुलांचं लग्नच जमेना
Daily Top 2Weekly Top 5

आयआयटी मुंबईच्या विद्यार्थ्यांना लाखोंचे पॅकेज

By | Updated: December 5, 2020 04:34 IST

लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : आयआयटीमधील विद्यार्थ्यांना प्लेसमेंटच्या विविध कंपन्यांकडून पहिल्याच दिवशी भरघोस पॅकेजेस मिळाले आहेत. यावर्षी स्थानिक कंपन्यांकडून ...

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : आयआयटीमधील विद्यार्थ्यांना प्लेसमेंटच्या विविध कंपन्यांकडून पहिल्याच दिवशी भरघोस पॅकेजेस मिळाले आहेत. यावर्षी स्थानिक कंपन्यांकडून पहिल्याच दिवशी ४६.४१ लाखांची ऑफर, तर आंतरराष्ट्रीय कंपनीकडून १.५७ लाख युरोची ऑफर मिळाल्याची माहिती आयआयटी मुंबईकडून देण्यात आली.

प्री-प्लेसमेंट ऑर्समध्येही जास्त पॅकेज मिळवणाऱ्या आणि त्या ऑफर्स मान्य करणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या मागच्या वर्षीच्या तुलनेत जास्त असल्याची माहिती मिळाली आहे.

आयआयटी मुंबई प्लेसमेंटच्या सिझनला सुरुवात झाली असून पहिल्या दिवशी सर्वात जास्त पॅकेज देणाऱ्या कंपन्यांमध्ये मायक्रोसॉफ्ट, गुगल, टेक्सास इन्स्ट्रूमेंट, क्वॉलकम, बोस्टन कन्सल्टिंग ग्रुप, ॲपल, बेन अँड कंपनी अशा कंपन्यांचा समावेश होता. पहिल्या दिवशी १८ कंपन्यांनी प्लेसमेंट ऑर्समध्ये आपला सहभाग दर्शविला. आतापर्यंत विद्यार्थ्यांकडून १५३ प्री-प्लेसमेंट्स ऑफर्स स्वीकारण्यात आल्याची माहिती प्लेसमेंट सेलकडून देण्यात आली. क्वॉलकमकडून स्थानिक ऑफर्समध्ये सर्वात जास्त म्हणजे, ४६.४१ लाखांचे पॅकेज देण्यात आले. त्यानंतर वर्ल्डक्वांटकडून ३९.७० लाखांचे, तर मॉर्गन स्टॅनली ३७.२५ लाखांचे आणि उबेरकडून ३५.३८ लाखांचे पॅकेज विद्यार्थ्यांना देण्यात आले. आंतरराष्ट्रीय ऑफर्समध्ये ऑप्टिव्हर कंपनीकडून दिल्याची माहिती प्लेसमेंट सेलने दिली. रिक्रुटर्स कंपन्यांकडून आयटी, सॉफ्टवेअर, कोअर इंजिनिअरिंग या क्षेत्रातील ऑफर्समध्ये प्राधान्य दिले आहे. अंदाजे ५५० कंपन्यांनी आयआयटीच्या प्लेसमेंटसाठी सहभाग नोंदविला असून पहिल्या दिवशी १८ कंपन्यांकडून विद्यार्थ्यांची प्लेसमेंट झाली आहे. पुढील दिवसांत आणखी काही कंपन्यांकडून ऑफर्स येणार असल्याचे आयआयटी मुंबई प्लेसमेंट सेलकडून सांगण्यात आले आहे.