शहरं
Join us  
Trending Stories
1
"हे खूप क्रूर असेल, जवळ आले की नष्ट करू", नाकेबंदी सुरू होताच ड्रोनाल्ड ट्रम्प यांची इराणला नवी धमकी
2
SRH चा 'प्रफुल्लित' विजय! सनरायझर्सच्या दोन रायझिंग स्टार्संसमोर RR च्या 'धुरंधरां'नी टेकले गुडघे
3
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीमुळे भारताच्या अडचणी वाढणार, होर्मुझ बंद झाली तर आता काय होईल?
4
शॉम्पूच्या बॉटलमध्ये ४.२६ कोटींचे कोकेन, नागपुरात राजधानी एक्सप्रेसमध्ये सिनेस्टाईल कारवाई
5
Praful Hinge : विदर्भकराचा पदार्पणात महारेकॉर्ड! पहिल्या षटकात वैभव सूर्यवंशीसह तिघांची विकेट घेत रचला इतिहास
6
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
7
व्हॅटिकन VS व्हाईट हाऊस: "मी घाबरत नाही...!" ट्रम्प यांच्या विधानावर पोप लियो XIV यांचा थेट पलटवार; प्रकरण काय?
8
IPL 2026, SRH vs RR : ईशानचा 'शानदार' शो! वैभव सूर्यवंशीला केलं ओव्हरटेक; काव्या मारनने अशी दिली दाद
9
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार, १५ एप्रिल रोजी बिहारला नवा मुख्यमंत्री मिळणार...
10
होर्मुझमधून जाणाऱ्या भारतीय जहाजांकडून कोणताही टोल घेतला नाही; इराणची स्पष्टोक्ती...
11
SRH vs RR : जोफ्राचा कहर! अभिषेक शर्मावर 'गोल्डन डक'ची नामुष्की; नको तिथं रोहित-संजूला टाकलं मागे
12
'पतसंस्थेतील बँक खाती बनावट, सह्या सुद्धा खोट्या'; प्रतिभा चाकणकर पहिल्यांदाच अशोक खरात प्रकरणावर बोलल्या
13
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
14
अमेरिकेच्या नाकेबंदीमुळे १५ भारतीय जहाजे होर्मुझमध्ये अडकली; मदतीसाठी नौदलाची धाव...
15
बहिणीला शिवीगाळ, बोअरवेल कामगार विजय पानसेची धारदार शस्त्राने वार करत हत्या, सांगली जिल्ह्यातील घटना 
16
Latest Marathi News LIVE: नागपुरात ४.२६ कोटींचे कोकेन जप्त, राजधानी एक्स्प्रेसमध्ये मोठी कारवाई
17
आशा भोसलेंचे कधीच न पाहिलेले दुर्मिळ फोटो; आर.डी. बर्मन ते लता दीदींसोबतचे खास क्षण, प्रत्येक फोटोमागे भन्नाट किस्सा
18
मुंबई इंडियन्सनं 'टाईमपास' केला; Hardik Pandya ला १२ लाखांचा फटका; Tim David लाही शिक्षा
19
Asha Bhosale: सूरसम्राज्ञी आशा भोसले अनंतात विलीन, दिग्गज गायकांनी गाणं गाऊन दिली अखेरची स्वरांजली
20
होर्मुझ सामुद्रधुनीवर ब्रिटन-फ्रान्सचा 'बिग प्लॅन'; ४० देशांना एकत्र आणणार, ट्रम्प यांना डच्चू
Daily Top 2Weekly Top 5

मांस घेऊन जाणारा ट्रक पेटवला

By admin | Updated: March 20, 2024 16:12 IST

राहाता (जि. अहमदनगर) : नगर-मनमाड रस्त्यावरून कोपरगावकडे मांस घेऊन जाणारा मालट्रक राहाता येथे तरूणांनी अडवून पेटवून दिला.

राहाता (जि. अहमदनगर) : नगर-मनमाड रस्त्यावरून कोपरगावकडे मांस घेऊन जाणारा मालट्रक राहाता येथे तरूणांनी अडवून पेटवून दिला. तसेच संतप्त जमावाने गाडीवर दगडफेक केली. अर्ध्या तासाने आलेल्या पोलिसांनी जमावाला पांगवले. या बाबत माहिती अशी की, रविवारी दुपारी नगर-मनमाड महामार्गावरून एक ट्रक (जीजे ०९-एव्ही ०४६४) कोपरगावकडे जात असताना राहाता येथे ट्रकमधून मांस गळत असून दुर्गंधी सुटल्याचे काही तरूणांच्या लक्षात आले. त्यामुळे संतप्त झालेल्या तरूणांनी ट्रक अडवून चालकाला याबाबत जाब विचारला. हळूहळू लोकांची गर्दी होऊ लागली. जमावाला पाहताच चालक व किन्नर पळून गेले. त्यामुळे काही तरूणांनी गाडीला आग लावली. बघता बघता चारशे-पाचशे लोकांचा जमाव जमा झाला. माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळाकडे धाव घेतली. पोलिसांनी जमावाला पांगविण्याचा प्रयत्न केला. दरम्यान, शिर्डी व राहाता नगरपरिषदेच्या अग्निशमन गाड्यांना पाचारण करण्यात आले. संतप्त जमावाने या गाड्यांवरच दगडफेक केल्याने त्यांना आग विझवण्यास काही काळ व्यत्यय आला. पोलिसांनी हस्तक्षेप करून जमाव पांगविल्यानंतर अग्निशामक दलाच्या कर्मचाऱ्यांनी गाडी विझवली. यावेळी नगर-मनमाड रस्त्यावर मोठा जमाव जमल्याने तणाव निर्माण झाला होता. दरम्यान, याबाबत राहाता पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरू होते. (वार्ताहर)