शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
2
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; ६ जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
3
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
4
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
5
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
6
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
7
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
8
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
9
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
10
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
11
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
12
बेरोजगार तरुणांना दरमहा ३०००, महिलांसाठीही मोठ्या घोषणा; भाजपच्या जाहीरनाम्यात आणखी काय?
13
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
14
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
15
८ रुपयांना खरेदी, ३० रुपयांना विक्री...! हा झुमकेवाला तरुण कमावतोय वर्षाला २७ लाख...
16
सोन्याने पुन्हा पार केला ₹१.५० लाखांचा टप्पा; चांदीतही मोठी उसळी, जाणून घ्या आजचा भाव...
17
चिमुरडींच्या मृत्यूचे गूढ वाढले! आईच्या डायरीत 'पुत्रप्राप्ती'ची ओढ; डोसा थिअरी फेल? आता वेगळाच संशय
18
पाकिस्तानच्या या आलिशान सेरेना हॉटेलमध्ये थांबणार अमेरिका-इराण डेलीगेशन, एका रात्रीचं भाडं किती? जाणून थक्क व्हाल
19
अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला लागलं इराण युद्धाचं ग्रहण! महासत्ता हतबल, भारतासाठी मात्र सातत्यानं 'अच्छे दिन'
20
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
Daily Top 2Weekly Top 5

नगराध्यक्षांच्या पतीचा नगरसेवकावर जीवघेणा हल्ला

By admin | Updated: March 31, 2017 18:39 IST

नगराध्यक्षांच्या पतींसह इतर सहा जणांनी नगरसेवक गणेश आजबे यांच्यावर जीवघेणा हल्ला केल्याचा प्रकार शुक्रवारी उघडकीस आला

ऑनलाइन लोकमतजामखेड, दि. 31 - जामखेड नगरपरिषदेच्या नगराध्यक्षा प्रीती राळेभात यांच्यावर अविश्वास ठराव आणण्यासाठी सत्ताधारी गटासह काही विरोधी नगरसेवकांच्या हालचाली सुरू होत्या. परंतु आवश्यक संख्याबळ न झाल्यामुळे हा अविश्वास ठराव बारगळला. मात्र यामुळे चिडलेल्या नगराध्यक्षांच्या पतींसह इतर सहा जणांनी नगरसेवक गणेश आजबे यांच्यावर जीवघेणा हल्ला केल्याचा प्रकार शुक्रवारी उघडकीस आला आहे. या हल्ल्यात आजबे हे गंभीर जखमी झाले आहेत. या प्रकरणी नगराध्यक्षांच्या पतीसह एकूण सहा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.जामखेड नगरपरिषदेच्या नगराध्यक्षा प्रीती राळेभात यांच्यावर अविश्वास ठराव आणण्यासाठी 16 नगरसेवक आठ दिवसांपासून अज्ञातस्थळी गेले होते. यामध्ये सत्ताधारी गटातील नऊ जणांचा सहभाग होता. मात्र अविश्वास ठरावासाठी यातील काही नगरसेवकांचे एकमत झाले नसल्याने अखेर हा अविश्वास ठराव बारगळला. त्यामुळे यातील काही नगरसेवक पुन्हा जामखेड येथे दाखल झाले. 29 मार्च रोजी रात्री सव्वा दहा वाजण्याच्या सुमारास नगरसेवक गणेश उत्तमराव आजबे (वय 35, रा. जमादरवाडी, ता. जामखेड) हे शहरातील मेन रोड येथील आजबे वाडा या ठिकाणी होते. यावेळी नगराध्यक्षा प्रिती राळेभात यांचे पती विकास भगवंत राळेभात, प्रशांत जालिंदर राळेभात, पप्पू भगवंत राळेभात, मनोज जालिंदर राळेभात, विकास राळेभात (पूर्ण नाव माहीत नाही) व प्रतिक उर्फ टिल्लू राळेभात (पूर्ण नाव माहीत नाही) सर्व रा. जामखेड, असे सहाजण आजबे वाड्यावर आले. तेथे नगराध्यक्षांचे पती विकास भगवंत राळेभात यांनी नगरसेवक गणेश आजबे यांच्यावर रिव्हॉल्ववर रोखून आमच्यावर अविश्वास आणतो काय, असे म्हणत ठार मारण्याची धमकी दिली.तसेच प्रशांत जालिंदर राळेभात याने लोखंडी रॉडने आजबे यांना मारहाण केली़ तसेच इतर दोघांनी आजबे यांच्यावर तलवार रोखून मारण्याची धमकी दिली़ एकाजणाने आजबे यांच्या गळ्यातील तीन तोळे सोन्याची चैन, हातातील पाच ग्रॅमच्या सोन्याच्या आंगठ्या व खिशातील सहा हजार रुपये काढून घेतले, असे फिर्यादीत म्हटले आहे. या मारहाणीत नगरसेवक गणेश आजबे हे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर जामखेड येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. सध्या सर्व आरोपी फरार असून अधिक तपास पोलीस निरीक्षक दिपककुमार वाघमारे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक विलास कुलकर्णी हे करत आहेत.