शहरं
Join us  
Trending Stories
1
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
2
Latest Marathi News LIVE Updates: "गेल्या एक-दीड वर्षांपासून अशा...; ठाकरेंच्या खासदारांसोबतच्या बैठकीवर एकनाथ शिंदेंचे स्पष्टीकरण
3
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
4
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
5
महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
6
रिश्ते मायने रखते हैं! सुप्रिया सुळे आता सुनेत्रा पवारांचा प्रचार करायला जाणार? म्हणाल्या...
7
Weekend Tips: स्मार्ट लोकांचे 'स्मार्ट' वीकेंड! यशस्वी लोक सुट्टीच्या दिवशीही कसे राहतात प्रोडक्टिव्ह? जाणून घ्या
8
मालेगाव स्फोटातून मुक्तता झाल्यानंतर कर्नल पुरोहित यांचे मोठे प्रमोशन; आता ब्रिगेडियर पदावर होणार पदोन्नती
9
"माझे कॉल रेकॉर्ड तपासा, हिंमत असेल तर फोटो दाखवा; अरविंद सावंतांनी लिहून दिला निष्ठेचा पुरावा
10
'अमेरिकेने मूर्खपणा करू नये, नेतान्याहूंच्या जाळ्यात अडकू नये...'; इराणचा थेट इशारा!
11
Mukul Choudhary: मुकुल चौधरीच्या शेवटच्या षटकाराची का होतेय चर्चा? मालक संजीव गोएंका बघतच राहिले!
12
बीएसएनएल पुन्हा मार्केटमध्ये परतली...! Jio आणि Airtel ला टाकलं मागे; ठरली देशातील नंबर-१ कंपनी
13
“फडणवीसांकडून शिंदेंच्या पक्षाचे ऑपरेशन सुरू, आमचे सर्व खासदार एकत्र”; संजय राऊतांचा दावा
14
डोशाच्या पिठात विष कुणी कालवले? सख्ख्या पित्यावर पोलिसांचा संशय; घरामध्ये सापडल्या सल्फासच्या गोळ्या!
15
इस्रायलचा एक इशारा अन् पाकिस्तानचे संरक्षण मंत्री घाबरले! कॅन्सरची पोस्ट डिलीट केली
16
Stress Management: तणावमुक्त जगण्यासाठी थेरपीशिवाय मन प्रसन्न ठेवण्याचे काही सोपे आणि घरगुती उपाय
17
सोने, चांदी, फ्लॅट, गाड्या... सरकारी अधिकाऱ्याकडे कोट्यवधींचं घबाड; कमाईपेक्षा संपत्ती जास्त
18
Gold-Silver च्या दरात आजही मोठी घसरण; पाहा तुमच्या शहरात किती स्वस्त झालं सोनं? पाहा नवी किंमत
19
"रणवीर सिंहने पोटात स्टेपलर...", अनुराग कश्यपने अभिनेत्याचा किस्सा; 'धुरंधर'चा सीनही विसराल
20
इस्लामाबाद ठरणार 'शांतीदूत'? इराण-अमेरिका संघर्षात पाकिस्तानची मोठी मध्यस्थी; जगभराचे लक्ष!
Daily Top 2Weekly Top 5

नगराध्यक्षांच्या पतीचा नगरसेवकावर जीवघेणा हल्ला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 31, 2017 17:07 IST

जामखेड नगरपरिषद नगराध्यक्षांच्या पतींसह इतर सहा जणांनी नगरसेवक गणेश आजबे यांच्यावर जीवघेणा हल्ला केला

जामखेड : जामखेड नगरपरिषदेच्या नगराध्यक्षा प्रिती राळेभात यांच्यावर अविश्वास ठराव आणण्यासाठी सत्ताधारी गटासह काही विरोधी नगरसेवकांच्या हालचाली सुरु होत्या़ परंतु आवश्यक संख्याबळ न झाल्यामुळे हा अविश्वास ठराव बारगळला़ मात्र यामुळे चिडलेल्या नगराध्यक्षांच्या पतींसह इतर सहा जणांनी नगरसेवक गणेश आजबे यांच्यावर जीवघेणा हल्ला केल्याचा प्रकार शुक्रवारी उघडकीस आला आहे़ या हल्ल्यात आजबे हे गंभीर जखमी झाले आहेत. या प्रकरणी नगराध्यक्षांच्या पतीसह एकूण सहा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.जामखेड नगरपरिषदेच्या नगराध्यक्षा प्रिती राळेभात यांच्यावर अविश्वास ठराव आणण्यासाठी १६ नगरसेवक आठ दिवसांपासून अज्ञातस्थळी गेले होते. यामध्ये सत्ताधारी गटातील नऊजणांचा सहभाग होता़ मात्र अविश्वास ठरावासाठी यातील काही नगरसेवकांचे एकमत झाले नसल्याने अखेर हा अविश्वास ठराव बारगळला़ त्यामुळे यातील काही नगरसेवक पुन्हा जामखेड येथे दाखल झाले. २९ मार्च रोजी रात्री सव्वा दहा वाजण्याच्या सुमारास नगरसेवक गणेश उत्तमराव आजबे (वय ३५, रा. जमादरवाडी, ता. जामखेड) हे शहरातील मेन रोड येथील आजबे वाडा या ठिकाणी होते. यावेळी नगराध्यक्षा प्रिती राळेभात यांचे पती विकास भगवंत राळेभात, प्रशांत जालिंदर राळेभात, पप्पू भगवंत राळेभात, मनोज जालिंदर राळेभात, विकास राळेभात (पूर्ण नाव माहीत नाही) व प्रतिक उर्फ टिल्लू राळेभात (पूर्ण नाव माहीत नाही) सर्व रा. जामखेड, असे सहाजण आजबे वाड्यावर आले़ तेथे नगराध्यक्षांचे पती विकास भगवंत राळेभात यांनी नगरसेवक गणेश आजबे यांच्यावर रिव्हॉल्वर रोखून आमच्यावर अविश्वास आणतो काय, असे म्हणत ठार मारण्याची धमकी दिली़ तसेच प्रशांत जालिंदर राळेभात याने लोखंडी रॉडने आजबे यांना मारहाण केली़ तसेच इतर दोघांनी आजबे यांच्यावर तलवार रोखून मारण्याची धमकी दिली़ एकाजणाने आजबे यांच्या गळ्यातील तीन तोळे सोन्याची चैन, हातातील पाच ग्रॅमच्या सोन्याच्या आंगठ्या व खिशातील सहा हजार रुपये काढून घेतले, असे फिर्यादीत म्हटले आहे. या मारहाणीत नगरसेवक गणेश आजबे हे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर जामखेड येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. सध्या सर्व आरोपी फरार असून अधिक तपास पोलीस निरीक्षक दिपककुमार वाघमारे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक विलास कुलकर्णी हे करत आहेत.