शहरं
Join us  
Trending Stories
1
आता ट्रम्प यांचा खरा थयथयाट होणार...! देत बसले टॅरिफची धमकी, इकडे भारत-रशियानं मिळवला हात, केले अनेक करार! बघा लिस्ट
2
'नमस्ते सदा वत्सले मातृभूमे...', विधानसभेत काँग्रेसच्या उपमुख्यमंत्र्यांनी गायले RSS चे प्रार्थना गीत
3
"चावण्याचं कारण केवळ..."; नसबंदीनंतर कुत्र्यांना सोडून देण्याच्या सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशावर नेमकं काय म्हणाल्या मनेका गांधी?
4
“फडणवीसांचा फोन आला होता, पण आम्ही रेड्डी यांना पाठिंबा दिला आहे”; संजय राऊतांनी केले स्पष्ट
5
Asia Cup 2025 : MS धोनीनं करुन दाखवलं ते सूर्याला जमणार का? रोहितही ठरलाय फेल! जाणून घ्या खास रेकॉर्ड
6
Video : युद्धाच्या १२ दिवसांनंतर इराणचा 'पॉवर शो', एका मिनिटात ११ मिसाईल डागून जगाला दिली 'ही' वॉर्निंग!
7
Dream11, एमपीएल, झूपीसह अनेक कंपन्यांकडून 'रियल मनी गेम्स' बंद; तुमच्या पैशांचं काय होणार?
8
२८ कोटी युझर्स, ९६०० कोटींचा महसूल; Dream 11 चा 'गेम' झाला, गेमिंग विधेयकानंतर बंद करण्याची तयारी?
9
बाई हा काय प्रकार? 'पुढचं पाऊल' फेम अभिनेत्रीचा प्रताप, नवऱ्याचं फक्त धड चेहरा गायब
10
मुंबई मनपा निवडणुकीसाठी DCM एकनाथ शिंदे तयारीला लागले; आनंदराज आंबेडकरांसोबत बैठक, काय ठरले?
11
तुमचा ITR रिफंड अडकला आहे? कधीपर्यंत मिळणार? प्राप्तीकर विभागाकडून मोठी अपडेट
12
Shravan Shukravar 2025: शेवटच्या श्रावण शुक्रवारनिमित्त देवीचे 'असे' करा कुंकुमार्चन; होईल शीघ्रकृपा!
13
१०००, २०००, ३०००, ४०००...स्मार्टफोनच्या विक्रीतून दुकानदार किती कमाई करतात? जाणून घ्या
14
माय-लेकीने मिळून घरच्या कर्त्या पुरुषाला संपवलं अन् पोलिसांसमोर रचला बनाव! कसा उघड झाला गुन्हा?
15
मराठी, इंग्रजी, गणितात किती मार्क, विश्वास नांगरे पाटलांची आठवीतील गुणपत्रिका बघितली का?
16
'माझ्या बॉयफ्रेंडशी लई गुलूगुलू बोलते' रागातून होमगार्ड महिलेची हत्या, मृतदेह नाल्यात फेकला
17
'ट्रेडिंग गुरू' अवधूत साठे सेबीच्या रडारवर; कर्जतच्या क्लासवर मोठी कारवाई; काय आहे प्रकरण?
18
"मी वेगळा रस्ता निवडतोय...", टीव्ही अभिनेत्याने शेअर केला व्हिडिओ, घटस्फोट की आणखी काही?
19
Matthew Breetzke World Record : हा भाऊ काय ऐकत नाय! फिफ्टी प्लसचा 'चौकार' अन् आणखी एक विश्व विक्रमी डाव
20
"हा ट्रम्प यांच्या नोबेल पुरस्कार जिंकण्याच्या प्रयत्नाचा एक भाग," अमेरिकेच्या माजी NSA नं भारतावरील टॅरिफवरुन केली जोरदार टीका

जिल्ह्यात मातृवंदना योजना घराघरांत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 10, 2021 04:22 IST

लोकमत न्यूज नेटवर्क अहमदनगर : प्रधानमंत्री मातृवंदना योजनेंतर्गत गरोदरपणापासून ते बाळाच्या जन्मापर्यंत तीन टप्प्यांत पाच हजार रुपये दिले जातात. ...

लोकमत न्यूज नेटवर्क

अहमदनगर : प्रधानमंत्री मातृवंदना योजनेंतर्गत गरोदरपणापासून ते बाळाच्या जन्मापर्यंत तीन टप्प्यांत पाच हजार रुपये दिले जातात. या योजनेचे जिल्ह्यात समाधानकारक काम झाले असून, गेल्या पाच वर्षांत १ लाख २८८ मातांना तब्बल ४२ कोटी ५३ हजार रुपयांचे अनुदान देण्यात आले आहे. यासाठी गेल्या पाच वर्षांत ९६ हजार ४०५ लाभार्थ्यांचे उद्दिष्ट आरोग्य विभागाला होते. विभागाने १०४ टक्के उद्दिष्ट पूर्ण केले आहे.

दारिद्र्यरेषेखालील व दारिद्र्यरेषेवरील अनेक गर्भवती महिलांना गरोदरपणाच्या शेवटच्या टप्प्यापर्यंत तसेच प्रसूतीनंतर शारीर‍िक क्षमता नसतानाही मजुरीसाठी काम करावे लागते. यामुळे अशा गर्भवती महिला व माता कुपोषित राहून त्यांच्या व त्यांच्या नवजात बालकांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होतो. त्यामुळे माता व बालकांचे आरोग्य सुधारण्याच्या दृष्टीने गर्भवती महिला व स्तनदा मातेला सकस आहार घेण्यास प्रोत्साहित करून त्यांच्या आरोग्यात सुधारणा व्हावी व जन्माला येणाऱ्या नवजात बालकाचेही आरोग्य सुधारावे, माता मृत्यू व बालमृत्युदरात घट होऊन ती नियंत्रित राहावी, यासाठी केंद्र शासनाच्या महिला व बालविकास मंत्रालयाने प्रधानमंत्री मातृवंदना योजना संपूर्ण देशात लागू केली. महाराष्ट्रात नोव्हेंबर २०१७ पासून ही योजना लागू करण्यात आली.

या योजनेनुसार पहिल्या अपत्यासाठी मातेला पाच हजार रुपयांचे शासकीय अनुदान मिळते. नगर जिल्ह्यात गेल्या पाच वर्षांत आरोग्य विभागाला ९६ हजार ४०५ लाभार्थ्यांचे उद्दिष्ट देण्यात आले होते. आरोग्य विभागाने उत्कृष्ट काम करीत उद्दिष्टापेक्षाही जास्त म्हणजे १ लाख २८८ मातांना तब्बल ४२ कोटी ५३ लाख २५ हजार रुपयांचा लाभ दिला.

---------

वर्षनिहाय लाभ घेतलेल्या महिला

२०१६-१७ - २०५६

२०१७-१८ - १७९१३

२०१८-१९ - ३०१९८

२०१९-२० - ३१२६२

२०२०-२१ - १८८५९

एकूण - १००२८८

------------

शासनाची ही उपयुक्त योजना आहे. गरजू मातांनी आपल्या जवळच्या आरोग्य केंद्रात याची नोंद करून लाभ घ्यावा. गेल्या पाच वर्षांचे उद्दिष्ट आरोग्य विभागाने यशस्वीरीत्या पूर्ण केले आहे.

- डाॅ. संदीप सांगळे, जिल्हा आरोग्याधिकारी

-------------

आवश्यक कागदपत्रे

लाभार्थी व तिच्या पतीचे आधार कार्ड, लाभार्थ्याचे आधार संलग्न बँक खाते, गरोदरपणाची शासकीय आरोग्य संस्थेत १५० दिवसांच्या आत नोंद, शासकीय संस्थेत गरोदरकाळात तपासणी, बाळाचा जन्मनोंदणी दाखला व प्राथमिक लसीकरण. उपरोक्त अटींची पूर्तता केल्यानंतर ३० दिवसांच्या आत लाभाची रक्कम अदा केली जाते.

पहिला टप्पा - एक हजार रुपये

दुसरा टप्पा -दोन हजार रुपये

तिसरा टप्पा - दोन हजार रुपये

--------

लाभासाठी यांच्याशी साधा संपर्क

आशा स्वयंसेविका, अंगणवाडी सेविका, आरोग्यसेविका, आरोग्य उपकेंद्र, आरोग्य केंद्र, उपजिल्हा रुग्णालय, ग्रामीण रुग्णालय, वैद्यकीय अधीक्षक, तालुका आरोग्याधिकारी यांच्या कार्यालयात संपर्क साधून लाभ घेता येतो.

---------

फोटो - ०९मातृवंदना डमी १,२,३