शहरं
Join us  
Trending Stories
1
"अमेरिकेचे जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
2
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
3
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
4
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
5
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
6
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
7
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
8
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
9
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
10
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
11
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
12
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
13
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
14
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
15
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
16
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
17
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
18
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
19
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
20
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
Daily Top 2Weekly Top 5

शेवगाव हत्याकांडातील मास्टारमाइंड रमेश भोसले गजाआड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 30, 2017 17:53 IST

जिल्ह्यात खळबळ उडविणाऱ्या हरवणे कुटुंबाचे हत्याकांड भोसले याच्यासह पाच जणांनी केल्याचे समोर आले आहे़

अहमदनगर : शेवगाव येथील चौघांचे हत्याकांड करणारा मुख्य सूत्रधार व कुख्यात गुंड रमेश छगन भोसले (वय २६) याला स्थानिक गुन्हे शाखेने गुरुवारी नेवासा परिसरातून ताब्यात घेतले़ जिल्ह्यात खळबळ उडविणाऱ्या हरवणे कुटुंबाचे हत्याकांड भोसले याच्यासह पाच जणांनी केल्याचे समोर आले आहे़ या गुन्ह्यातील आणखी दोन आरोपी अद्यापपर्यंत फरार आहेत़ शेवगाव शहरातील विद्यानगर परिसरात राहणारे सेवानिवृत्त सैनिक अप्पासाहेब गोविंद हरवणे व त्यांची पत्नी सुनंदा हरवणे, मुलगा मकरंद हरवणे, मुलगी स्रेहल हरवणे यांची १८ जून रोजी त्यांच्याच घरात निघृर्ण हत्या झाली होती़ घटनेनंतर सातव्या दिवशी पोलिसांनी नेवासा परिसरातून दोन आरोपींना अटक करून या हत्याकांडाचा पदार्फाश केला़ या हत्याकांडातील मुख्य आरोपी रमेश भोसले मात्र फरार होता़ स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक दिलीप पवार यांना भोसले हा नेवासा परिसरात येणार असल्याची माहिती मिळाली होती़ पवार यांच्यासह सहायक निरीक्षक शरद गोर्डे, संदीप पाटील, कॉन्स्टेबल योगेश गोसावी, मन्सूर सय्यद, सुनील चव्हाण, उमेश खेडकर, संदीप पवार, रवी कर्डिले यांच्या पथकाने नेवासा तालुक्यातील नागफणी परिसरात सापळा रचला होता़ पथकाला पाहताच भोसले शेजारच्या शेतात पळून गेला़ पथकातील कर्मचाऱ्यांनी पाठलाग करून त्याला ताब्यात घेतले़ यावेळी आरोपीकडे गावठी कट्टा व तीन जिवंत काडतुसे मिळून आले़ भोसले याने शेवगाव येथे चौघांचे हत्याकांड केल्याची कबुली दिली असल्याची माहिती पोलीस अधिकाऱ्यांनी दिली आहे़                 चार जिल्ह्यांतील पोलीस भोसलेच्या मागावर रमेश भोसले हा कुख्यात दरोडेखोर असून, त्याने २०१५ मध्ये चाळीसगाव येथे दरोडा टाकून तिघांची हत्या केली होती़ त्यानंतर औरंगाबाद जिल्ह्यातील वाळुंज परिसरात गोळी घालून एका व्यक्तीचा खून केला होता़ त्याच्यावर नगरसह चाळीसगाव, जळगाव औरंगाबाद, नाशिक आदी ठिकाणी, चोरी, दरोडा, खून, आदी प्रकारचे गुन्हे दाखल आहेत़ पोलीस गेल्या अनेक दिवसांपासून त्याच्या मागावर होते़ शेवगावचे हत्याकांड केल्यापासून भोसले फरार होता़ नेवासा तालुक्यातील बाभूळखेडा परिसरात पोलीस आरोपीस पकडण्यास गेले, तेव्हा याच रमेश भोसले याने पोलिसांवर गावठी पिस्तुलातून गोळीबार करत फरार झाला होता़ पोलीस तपासात भोसले याने केलेले आणखी गुन्हे उघडकीस येणार आहेत़