शहरं
Join us  
Trending Stories
1
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
2
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
3
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
4
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; या खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
5
Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
6
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
7
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
8
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
9
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
10
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
11
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
12
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
13
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
14
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
15
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
16
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
17
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
18
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
19
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
20
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
Daily Top 2Weekly Top 5

औषधांच्या दुकानावर मास्क विक्री वाढली!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 26, 2021 04:28 IST

अहमदनगर : महापालिकेच्या पथकांची आणि पोलिसांची कारवाई सुरू असल्याने नगर शहरात मास्कची विक्री वाढली आहे. शहरातील औषधांच्या दुकानावर आठ ...

अहमदनगर : महापालिकेच्या पथकांची आणि पोलिसांची कारवाई सुरू असल्याने नगर शहरात मास्कची विक्री वाढली आहे. शहरातील औषधांच्या दुकानावर आठ दिवसांपूर्वी १० ते १५ मास्क विकले जात होते. आता एका औषध दुकानातून २०० ते ३०० मास्क विकले जात आहेत. सॉनिटायझरला मात्र सध्या तरी कोणीच विचारत नसल्याची स्थिती आहे.

गत आठवड्यात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यात कोरोनाचे रुग्ण वाढत असून, लोकांनी नियमांचे पालन करावे, असे आवाहन केले. दुसऱ्या दिवशी जिल्हाधिकाऱ्यांनी यंत्रणेचा आढावा घेऊन नियमांची अंमलबजावणी करण्याचा आदेश दिला. २३ फेब्रुवारीपासून रात्रीच्या संचारबंदीची अंमलबजावणी सुरू झाली. त्यानंतर मास्क न वापरणाऱ्याविरुद्ध कारवाईचा आदेश दिला.

सध्या नगर शहरात महापालिकेची पथके फिरत आहेत. प्रत्येक दुकानात, कार्यालयात मास्क वापरला जात आहे का, याची तपासणी केली जात आहे. तसेच रस्त्यावर फिरणाऱ्या नागरिकांवर पोलिसांकडून दंडात्मक कारवाई केली जात आहे. त्यामुळे मास्क वापर वाढला आहे. शहरातील औषध दुकानांवर त्यामुळेच मास्क खरेदीसाठी ग्राहक वाढले आहेत.

---------

दुकान आधीची विक्री सध्याची विक्री

जुने शहर दुकान १० ते १५ मास्क १०० मास्क

बालिकाश्रम रोड दुकान १० मास्क १०० ते १५० मास्क

सावेडीतील दुकान १० ते १५ मास्क २५० ते ३०० मास्क

------------

मास्कची किंमत

कापडी मास्क- १० ते २० रुपये

एन-९५ मास्क- २० ते २५ रुपये

डिस्पोजल मास्क- २ ते ३ रुपये

-----------------

कोरोनाचा प्रादुर्भाव ओसरल्यानंतर दररोज दुकानामधून १० ते १५ मास्कची विक्री होत होती. ती आता १०० ते २०० पर्यंत गेली आहे. आधी कोणी फारसे मास्क विचारत नव्हते. शहरात कारवाई सुरू झाल्यानंतर मास्कला मागणी वाढली आहे.

-रिनुल गवळी, औषध विक्रेते

----------------

कारवाई सुरू असल्याने मास्कला मागणी वाढली आहे; मात्र सॉनिटायझरबाबत अद्याप मागणी कमीच आहे. सरकारी, खासगी कार्यालयांमध्ये सॅनिटायझरचा वापर वाढला आहे. कार्यालयांसाठी किंवा कुटुंबासाठी डिस्पोजल मास्कला जास्त मागणी आहे. एन-९५ मास्कचीही किंमत आवाक्यात आहे.

-दत्ता गाडळकर, अध्यक्ष, केमिस्ट असोसिएशन

----------------

फोटो-२५ मास्क

नगर शहरात मास्क घेण्यासाठी नागरिक सरसावले आहेत.