शहरं
Join us  
Trending Stories
1
"अमेरिकेचे जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
2
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
3
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
4
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
5
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
6
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
7
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
8
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
9
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
10
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
11
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
12
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
13
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
14
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
15
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
16
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
17
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
18
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
19
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
20
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
Daily Top 2Weekly Top 5

तलवार बाळगणारी टोळी नगरमध्ये जेरबंद

By admin | Updated: August 30, 2014 23:20 IST

अहमदनगर: एका कारमधून आठ तलवारी आणि चाकू घेऊन नगरकडून मनमाड रोडकडे जाणाऱ्या पाच जणांच्या टोळीला एम.आय.डी. सी. पोलिसांनी शनिवारी अटक केली.

अहमदनगर: एका कारमधून आठ तलवारी आणि चाकू घेऊन नगरकडून मनमाड रोडकडे जाणाऱ्या पाच जणांच्या टोळीला एम.आय.डी. सी. पोलिसांनी शनिवारी अटक केली. त्यांच्याकडून आठ तलवारी आणि एक चाकू जप्त केला.नगर-मनमाड रोडवरून तलवारी घेऊन जाणारी एक टोळी मनमाड मार्गावरून एका स्कॉर्पिओ गाडीतून जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार एम. आय.डी. सी. पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक किरणकुमार बकाले यांनी एका खासगी गाडीतून पोलीस पथकासह मनमाड रोडवर सापळा रचला आणि माहितीमध्ये मिळालेल्या वर्णनानुसारच्या स्कॉर्पिओ गाडीवर नजर ठेवली. दुपारी साडेबाराच्या सुमारास वर्णनानुसारची गाडी भरधाव वेगात जात होती. अशावेळी तिचा पाठलाग करून स्कॉर्पिओ गाडीला पोलिसांनी त्यांची खासगी गाडी आडवी लावली. त्यांच्याकडे चौकशी केली असता ते घाबरले. कारची झडती घेतली असता कारच्या मागील सीटखाली मोठ्या सात तलवारी आढळून आल्या. तसेच एक लहान तलवार आणि एक चाकू आढळून आला.पोलिसांनी शस्त्रांसह पाच जणांना अटक करून त्यांच्याविरुद्ध अवैध शस्त्रे बाळगल्याप्रकरणी कारमधील विशाल विलास सगळगिळे, कदीर वजीरभाई इनामदार, गजाजन गणपत चव्हाण, सतीश चंद्रकांत दाभाडे आणि कुणाल सुरेश सोनवणे (सर्व रा. टाकळीमियॉ, ता. राहुरी) यांच्याविरुद्ध एम.आय.डी.सी. पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (प्रतिनिधी)