शहरं
Join us  
Trending Stories
1
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
2
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
3
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
4
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
5
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
6
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
7
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
8
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
9
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
10
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
11
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
12
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
13
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ
14
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
15
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...
16
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
17
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
18
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
19
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
20
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...

इंग्रजी माध्यमाच्या गठ्ठ्यात मराठीची प्रश्नपत्रिका : झेरॉक्स करुन वाटल्या प्रश्नपत्रिका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 5, 2019 19:10 IST

इंग्रजी माध्यमाच्या प्रश्नपत्रिकांच्या गठ्यात चक्क मराठी माध्यमाच्या प्रश्नपत्रिका पाठविल्यामुळे दहावीच्या बोर्ड परीक्षेत एकच गोंधळ निर्माण झाला़

अहमदनगर : इंग्रजी माध्यमाच्या प्रश्नपत्रिकांच्या गठ्यात चक्क मराठी माध्यमाच्या प्रश्नपत्रिका पाठविल्यामुळे दहावीच्या बोर्ड परीक्षेत एकच गोंधळ निर्माण झाला़ शेवटी शाळेतच इंग्रजी माध्यमाच्या इंग्रजी या विषयाच्या प्रश्नपत्रिकेच्या झेरॉक्स काढून विद्यार्थ्यांना वाटण्यात आल्या अन् अखेर ५० मिनिटे उशीराने परीक्षा सुरु झाली़ हा प्रकार शहरातील रुपीबाई बोरा शाळेत मंगळवारी घडला़शहरातील रुपीबाई बोरा शाळेत मराठी व इंग्रजी माध्यमाच्या दहावीच्या बोर्ड परीक्षा सुरु आहेत़ दोन्ही पेपरची वेळ एकच आहे़ मंगळवारी मराठी व इंग्रजी माध्यमाचा दहावीचा इंग्रजी विषयाचा पेपर होता़ सकाळी ११ वाजता परीक्षा सुरु झाली़ मराठी माध्यमाच्या सर्व विद्यार्थ्यांना प्रश्नपत्रिका वेळेत पोहोचल्या़ त्यांची परीक्षाही सुरु झाली़ मात्र, इंग्रजी माध्यमाच्या काही वर्गांमध्ये विद्यार्थ्यांना प्रश्नपत्रिका वाटप करण्यासाठी पर्यवेक्षकांनी प्रश्नपत्रिकांचे सीलबंद पॉकेट फोडले असता आतमध्ये इंग्रजी माध्यमाऐवजी मराठी माध्यमाच्या प्रश्नपत्रिका असल्याचे लक्षात आले़ पर्यवेक्षकांनी तात्काळी ही बाब केंद्र प्रमुखांच्या लक्षात आणून दिली़ केंद्र प्रमुखांनी माध्यमिक शिक्षण विभागाचे शिक्षणाधिकारी लक्ष्मण पोले यांना कळविले़ त्यानंतर पोले पथकासह शाळेत दाखल झाले़ पोले यांनी इंग्रजी माध्यमाच्या विद्यार्थ्यांना मराठी माध्यमाची इंग्रजी या विषयाची प्रश्नपत्रिका गेल्याची खात्री केली़ त्यानंतर त्यांनी शाळेतच इंग्रजी माध्यमाच्या इंग्रजी या विषयाच्या प्रश्नपत्रिकांची झेरॉक्स काढून विद्यार्थ्यांना वाटण्यात आली़ तोपर्यंत ५० मिनिटे वेळ वाया गेला होता़ त्यामुळे शिक्षणाधिकारी पोले यांनी इंग्रजी माध्यमांच्या विद्यार्थ्यांना ५० मिनिटांचा वेळ वाढून देण्याचा निर्णय घेतला़इंग्रजी माध्यमाच्या गठ्यात मराठी माध्यमाची प्रश्नपत्रिका निघाल्यामुळे दहावीची परीक्षा ५० मिनिटे उशीराने सुरु झाली़ त्यामुळे विद्यार्थ्यांना वेळ वाढून देण्यात आला होता़ नंतर परीक्षा सुरळीत पार पडली़ घटनेची माहिती मिळताच आम्ही पथकासह रुपीबाई बोरा शाळेत पोहोचलो़-लक्ष्मण पोले, शिक्षणाधिकारी, माध्यमिक शिक्षण विभाग

 

टॅग्स :Ahmednagarअहमदनगर