शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
4
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
5
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
6
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
7
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
8
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
9
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
10
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
11
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
12
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
13
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
14
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
15
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
16
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
17
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
18
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
19
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
20
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
Daily Top 2Weekly Top 5

प्रत्येक गावाला एक माणूस

By admin | Updated: April 20, 2016 23:43 IST

अहमदनगर : पीक विमा योजनेतील निकष आता बदलले असून, शेतकऱ्यांचा हिस्सा कमी करण्यात आला आहे़

अहमदनगर : पीक विमा योजनेतील निकष आता बदलले असून, शेतकऱ्यांचा हिस्सा कमी करण्यात आला आहे़ यापूर्वी नगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा सहभाग ४८ टक्क्यांपर्यंत होता़ तो ७५ टक्क्यांपर्यंत वाढविण्याचे उद्दिष्ट आहे़ पीक विमा योजनेत जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी सहभाग घ्यावा, यासाठी प्रत्येक गावासाठी एक कर्मचारी नेमण्याचे नियोजन आहे, असे प्रभारी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी भाऊसाहेब बऱ्हाटे यांनी सांगितले़‘प्रशासन-जनता संवाद’ या ‘लोकमत’च्या उपक्रमात बुधवारी बऱ्हाटे यांनी ‘लोकमत’च्या संपादकीय टीमशी संवाद साधला. बऱ्हाटे म्हणाले, सरकारने जुन्या पीक योजनेत बदल केले आहेत़ हे बदल सर्व शेतकऱ्यांपर्यंत पोहोचावेत, जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी पीक विमा योजनेत सहभाग घ्यावा, यासाठी तलाठी, ग्रामसेवक, कृषी सहायक या कर्मचाऱ्यांना प्रत्येकी एका गावात विमा योजनेच्या काळात नेमण्यात येणार आहे़ त्यांनी संबंधीत गावात जाऊन योजनेतील बदल सांगून शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ घेण्यासाठी प्रवृत्त करण्याची जबाबदारी देण्यात येणार आहे़ नवीन योजनेत शेतकऱ्यांचा हिस्सा कमी करण्यात आला आहे़ त्यामुळे पूर्वी असलेला ४८ टक्के सहभाग वाढवून तो ७५ टक्क्यांपर्यंत पोहोचविण्याचा आमचा प्रयत्न राहणार आहे़ हे करताना ज्या मंडळातून पीक विमा योजनेत आतापर्यंत कमी शेतकऱ्यांनी सहभाग नोंदविला आहे, त्या मंडळावर विशेष लक्ष केंद्रित करण्यात येणार आहे़ त्यामुळे विमा योजनेतील सहभाग वाढू शकतो़(प्रतिनिधी)मागेल त्याला शेततळे, या योजनेतून शेततळे घेण्यासाठी जिल्ह्यातील १० हजार शेतकऱ्यांनी आॅनलाईन प्रस्ताव दिले आहेत़ मात्र, जिल्ह्यासाठी २३९२ शेततळ्यांचे उद्दिष्ट असल्यामुळे उर्वरित शेतकऱ्यांचा पुढील उद्दिष्टात समावेश केला जाईल़ ‘फर्स्ट कम, फर्स्ट रेफरन्स’नुसार पहिल्या २३९२ शेतकऱ्यांना या योजनेतून शेततळ्यासाठी अनुदान मिळणार आहे़ तसेच दारिद्य्ररेषेखालील व आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबाला यात प्राधान्य देण्यात येणार असल्याचे बऱ्हाटे यांनी सांगितले़‘जलयुक्त’मध्ये ७० टक्के काम कृषी विभागाचेजलयुक्त शिवार योजनेत सर्वाधिक ७५ टक्के काम कृषी विभागाच्यामार्फत करण्यात आले आहे़ नाला बल्डिंग, सीसीटी बंधारे, सलग समतल चर, केटीवेअर अशी विविध जलसंधारणाची कामे या योजनेतून करण्यात आली आहेत़ केटीवेअर, बंधाऱ्यांमध्ये पावसाच्या पाण्यात वाहून येणारा गाळ अडविल्यास त्याचे आयुष्य वाढते़ पावसाळ्यात पाचवेळा चर भरतील आणि जिरतील, असे आमचे नियोजन आहे़ त्यातून पाणी पातळी मोठ्या प्रमाणात वाढणार आहे़मका, तूर, उडीद, मूग पिकाखाली क्षेत्र वाढणारकमी पावसामुळे उसाखालील क्षेत्रात मोठी घट झाली आहे़ हे क्षेत्र यंदा कांदा पिकाखाली आले आहे़ आता कांद्याचे रिकामे होणारे क्षेत्र मका, तूर, उडीद, मूग या पिकांखाली येऊन त्यांचे क्षेत्र वाढणार आहे़ कृषी उत्पादन खर्च कमी करण्यासाठी शेती पद्धत विकसित करावी लागणार आहे़ काटेकोरपणे शेतीचे नियोजन व रासायनिक खते, औषधांवरील खर्च कमी करण्यावर भर राहील़ खत वापराचे प्रमाण ठरविले जाईल़ ३६ गटांमध्ये झिरो बजेट शेतीचा उपक्रम तीन वर्षांसाठी राबविण्या येणार आहे, असे बऱ्हाटे म्हणाले़