शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
2
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
3
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
4
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
5
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
6
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
7
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
8
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
9
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
10
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
11
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
12
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
13
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
14
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
15
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
16
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
17
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
18
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
19
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
20
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
Daily Top 2Weekly Top 5

निवडणुकीचा खर्च बँकेमार्फतच करा

By admin | Updated: March 20, 2024 10:59 IST

अहमदनगर : नामनिर्देशन पत्रासोबत बँकेच्या पासबुकची छायांकित प्रत जोडणे बंधनकारक असून, निवडणूक बँकेमार्फतच करणे आवश्यक आहे़

अहमदनगर : नामनिर्देशन पत्रासोबत बँकेच्या पासबुकची छायांकित प्रत जोडणे बंधनकारक असून, निवडणूक बँकेमार्फतच करणे आवश्यक आहे़ दर तीन दिवसांनी खर्चाचा हिशोब सादर करावा लागेल, अशी माहिती जिल्हाधिकारी अनिल कवडे यांनी शनिवारी दिली़जिल्हाधिकारी कवडे यांच्या अध्यक्षतेखाली विविध राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींची बैठक झाली़ या बैठकीत कवडे बोलत होते़ बैठकीस सेनेचे आ़ विजय औटी, भाजपाचे बाळासाहेब पोटघन, राष्ट्रवादी काँग्रेसचे किसन लोटके, योगेश दाणी, सुभाष लांडे, सुधीर टोकेकर, उपजिल्हा निवडणूक अधिकारी सुनील माळी, निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्र पाटील, जिल्हा कोषागार अधिकारी विजय कोते, उपजिल्हाधिकारी अरुण डोईफोडे, विभागीय अधिकारी वामन कदम उपस्थित होते़ कवडे म्हणाले, निवडणूक शांतेत पार पडावी, यासाठी सर्व राजकीय पक्षांनी आदर्श आचारसंहितेचे पालन करावे़ जेणे करून निवडणूक निर्भयपणे पार पडेल़ नामनिर्देशनपत्र दाखल करताना निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या दालनामध्ये उमेदवार व त्यांचे चार प्रतिनिधींनाच प्रवेश दिला जाईल़ त्यापेक्षा अधिक व्यक्तींना दालनात प्रवेश दिला जाणार नाही़ अर्ज दाखल करताना तीनपेक्षा अधिक वाहने १०० मीटरच्या आत आणता येणार नाहीत, असेही कवडे म्हणाले़उमेदवारी अर्ज दाखल करताना सक्षम अधिकाऱ्यांच्या परवानगीशिवाय मिरवणूक काढता येणार नाही़ अर्ज दाखल करतेवेळी आणली जाणारी वाहने, व्यक्ती, मिरवणुकांवर होणारा खर्च उमेदवाराच्या निवडणूक खर्चात धरला जाईल़ उमेदवाराने अर्ज दाखल करण्यापूर्वी स्वतंत्र खाते उघडणे बंधनकारक असेल़ कोणत्याही बँकेत खाते उघडून पहिल्या पानाची छायांकित प्रत अर्जासोबत जोडणे बंधनकारक आहे़ उमेदवारी अर्ज दाखल करण्यापासून ते निवडणूक सर्व खर्च खात्यातूनच करणे बंधनकारक आहे़ उमेदवारासाठी २८ लाख रुपये खर्चाची मर्यादा आहे़ दर तीन दिवसांनी निवडणूक शाखेकडून खर्च सादर करावा लागेल़ निवडणूक काळात अर्थिक व्यवहार बँकेमार्फत करण्याचा आदेश देण्यात आले आहेत़ उमेदवारी अर्ज, अर्ज दाखल करणे, निवडणुकीचा खर्च, याबाबतच्या नियमांचे पालन बंधनकारक असल्याचे कवडे यांनी सांगितले़ (प्रतिनिधी)