अनुसूचित जातीच्या प्रवर्गाकरिता सहा, अनुसूचित जमातीकरिता तीन, नागरिकांच्या मागास प्रवर्गाकरिता सात, तर सर्वसाधारण गटाकरिता नऊ ग्रामपंचायतींमध्ये आरक्षण जाहीर करण्यात आले. उर्वरित २६ ठिकाणी महिलाराज येणार आहे.
ग्रामपंचायती व आरक्षण
अनुसूचित जाती : मातुलठाण, मांडवे, ब्राह्मणगाव वेताळ, बेलापूर बुद्रुक, कुरणपूर, रामपूर. महिला : गोवर्धनपूर, कान्हेगाव, खिर्डी, खोकर, शिरसगाव, वांगी खुर्द, टाकळीभान.
अनुसूचित जमाती : उंदिरगाव, नाऊर, कारेगाव. महिला : उक्कलगाव, माळवाडगाव, खंडाळा.
नागरिकांचा मागास प्रवर्ग : सराला, खैरी निमगाव, गोंडेगाव, हरेगाव, नायगाव, मातापूर, मुठेवाडगाव. महिला : भैरवनाथनगर, भेर्डापूर, भामाठाण, महांकाळवाडगाव, दिघी, बेलापूर खुर्द, कमालपूर.
सर्वसाधारण गट : एकलहरे, पढेगाव, गळनिंब, लाडगाव, वडाळा महादेव, वांगी बुद्रुक, वळदगाव, मालुंजे, खानापूर.
महिला : दत्तनगर, कडीत बुद्रुक, फत्याबाद, निपाणी वाडगाव, जाफराबाद, गुजरवाडी, भोकर, माळेवाडी, उंबरगाव.
------------
प्रमुख गावांतील चित्र असे :
निवडणूक झालेल्या बेलापूर येथे अनुसूचित जाती तर टाकळीभान येथे अनुसूचित जाती महिलेकरिता आरक्षण जाहीर झाले. निपाणी वाडगाव, वडाळा महादेव, मालुंजा, पढेगाव येथे सरपंचपद खुले झाले आहे. उक्कलगाव, खंडाळा, कारेगाव येथे अनुसूचित जमाती व भेर्डापूर, बेलापूर खुुर्द व हरेगाव येथे नागरिकांच्या मागास प्रवर्गाकरिता आरक्षण जाहीर करण्यात आले.
---------