अकरापैकी दहा जागांसाठी बावीस उमेदवार निवडणूक रिंगणात असून, प्रभाग एकमधून अनुसूचित जमातीसाठी राखीव असलेल्या जागेवर एकनाथ मेंगाळ यांची बिनविरोध वर्णी लागली आहे. या बिनविरोध निवडून आलेल्या जागेवर भाजपने दावा केला आहे. बिनविरोध निवडले गेलेले एकनाथ मेंगाळ यांचा संकल्प महाविकास आघाडीने प्रथम सत्कार केला. त्यानंतर त्याचदिवशी सायंकाळी भाजपने मिरवणूक काढून वाजतगाजत मेंगाळ यांचा सत्कार करत त्यांना प्रचार रणधुमाळीत बरोबर घेतले आहे. गत पंचवार्षिक निवडणुकीतील कट्टर विरोधक आता भाजपच्या व्यासपीठावर एकत्र आले असून, येथे बिनविरोध निवडणूक अपेक्षित असताना महाविकास आघाडीने पॅनल उभे करून प्रस्थापितांना आव्हान दिले आहे. जिल्हा परिषदेतील भाजप गटनेते जालिंदर वाकचौरे, विधानसभेच्या वेळी भाजपवासी झालेले पिचड समर्थक रावसाहेब वाकचौरे व रामनाथबापू वाकचौरे, महाविकास आघाडीचे सेनेचे बाळासाहेब कुमकर, बाजार समितीचे माजी संचालक भागवत कुमकर यांची ग्रामपंचायत निवडणुकीच्या निमित्ताने
प्रतिष्ठा पणाला लागली आहे.