शहरं
Join us  
Trending Stories
1
"ते नेमकं काय म्हणाले माहित नाही, मी..."; एकनाथ शिंदेंच्या 'जय गुजरात'वर अजित दादांची पहिली प्रतिक्रिया, नेमकं काय म्हणाले?
2
महाराष्ट्रात मराठी शिकण्याचा आग्रह करू शकतो, पण दुराग्रह करू शकत नाही- CM देवेंद्र फडणवीस
3
सोमनाथ सूर्यवंशी कोठडीतील मृत्यू प्रकरण; पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याचे न्यायालयाचे आदेश
4
'देशांतर्गत बाबींमध्ये हस्तक्षेप करू नका', भारताने दलाई लामांना पाठिंबा दिल्याने चीन संतापला
5
भारताचा बुद्धीबळपटू डी. गुकेशचा मोठा पराक्रम; वर्ल्ड नंबर वन कार्लसनची जिरवली!
6
मथुरा श्रीकृष्ण जन्मभूमी प्रकरण: हिंदू पक्षाला झटका, शाही ईदगाहला वादग्रस्त ढाचा घोषित करण्याची मागणी HC नं फेटाळली
7
ENG vs IND : जलद शतकी खेळीसह Jamie Smith चा पराक्रम! १४८ वर्षांत असं पहिल्यांदा घडलं
8
'रामायण'मध्ये दिग्गज कलाकारांची फौज रावणावर तुटून पडणार, अमिताभसह कोण साकारणार कोणती भूमिका?
9
'बिहार की बेटी', PM मोदींनी उल्लेख केलेल्या त्रिनिदादच्या पंतप्रधान कोण? बिहारशी काय संबंध?
10
एकनाथ शिंदेंच्या 'जय गुजरात'वर प्रतिक्रिया देताना देवेंद्र फडणवीसांनी घेतले शरद पवारांचे नाव
11
Video: मोठी बातमी! एकनाथ शिंदेंकडून पुण्यात 'जय महाराष्ट्र' पाठोपाठ 'जय गुजरात'चा नारा; आधीच मराठी-हिंदी वाद...
12
इन्फेक्शन झाले म्हणून २८ वर्षांचा तरुण डॉक्टरकडे गेला, त्याने प्रायव्हेट पार्टच कापून टाकला...
13
Sanjay Raut : "अमित शाह यांच्या डुप्लिकेट शिवसेनेचं खरं रूप...", संजय राऊतांचं एकनाथ शिंदेंवर टीकास्त्र
14
कडक सॅल्यूट! ऐकता, बोलता, पाहता येत नाही; कठोर परिश्रमाने मिळवली सरकारी नोकरी
15
“आता काय, राज तुमच्यात येणार, तुमची पॉवर वाढणार”; शिंदेंच्या मंत्र्यांची ठाकरे गटाला कोपरखळी
16
“‘लाडकी बहीण’साठी आम्ही ४१० कोटींचा निधी देतो, पण अजितदादांनी कबूल केले की...”: संजय शिरसाट
17
Ashadhi Ekadashi 2025: चातुर्मासात विष्णू योगनिद्रा घेतात तेव्हा विश्वाचा सांभाळ कोण करतं?
18
२ दिवसांच्या धक्क्यातून बाजार सावरला, पण टाटा-महिंद्रासह 'या' कंपनीला मोठा फटका! तुमचे पैसे सुरक्षित आहेत का?
19
"राज ठाकरेंचं मराठीवर नाही तर राजकारणावर प्रेम", काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्याची टीका

मारहाण करुन दागिने लंपास

By admin | Updated: June 27, 2014 00:20 IST

अहमदनगर : शेवगाव तालुक्यातील भावीनिमगाव येथील दरोड्यापाठोपाठ केडगाव येथील कांबळे मळ््यात चोरट्यांनी धुमाकूळ घातला.

अहमदनगर : शेवगाव तालुक्यातील भावीनिमगाव येथील दरोड्यापाठोपाठ केडगाव येथील कांबळे मळ््यात चोरट्यांनी धुमाकूळ घातला. गुरुवारी पहाटेच्या सुमारास दोघांना जखमी करून चोरट्यांनी सोन्याचे दागिने लंपास केले. दोन दिवसांपासून प्रशासकीय तपासणीसाठी नगरमध्ये तळ ठोकून बसलेल्या विशेष पोलीस महानिरीक्षक प्रवीण साळुंखे यांना चोरट्यांनी सलामी दिली आहे.केडगाव भागातील कांबळे मळ््यात बाबासाहेब कांबळे हे रात्री शेजारी सुरू असलेल्या बांधकामावरून घरी परतले आणि घराचा दरवाजा बंद करून झोपले. गुरुवारी पहाटे सव्वातीनच्या सुमारास चार अज्ञात चोरट्यांनी घराचा दरवाजा तोडून आतमध्ये प्रवेश केला. बॅटऱ्यांचा प्रकाश तोंडावर टाकून दमदाटी केली. लाकडी दांडक्यांने सुजाता आणि बाबासाहेब कांबळे या पती-पत्नींना मारहाण केली. सुजाता आणि त्यांच्या सासुबाई कुसुमबाई कांबळे यांच्या अंगावरील १८ हजार रुपये किमतीचे दागिने चोरट्यांनी हिसकावून घेतले. त्यामध्ये कानातील टॉप्स, झुबे, मिनी गंठण असे साहित्य चोरीला गेले. चोरट्यांनी केलेल्या मारहाणीत सुजाता आणि बाबासाहेब कांबळे यांच्या डोक्याला मार लागला. ते जखमी असून त्यांच्यावर घरीच प्राथमिक उपचार करण्यात आले.या प्रकरणी सुजाता कांबळे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून कोतवाली पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. सहायक पोलीस निरीक्षक भारत जाधव यांनी घटनास्थळाचा पंचनामा केला. सुजाता कांबळे यांनी चोरट्यांना ओळखले होते. परिसरात एका बांधकामाच्या ठिकाणीच चोरटे काम करीत असल्याचे फिर्यादी सुजाता कांबळे यांनी पोलिसांना सांगितले. त्यावरून पोलिसांनी गोचा मधु चव्हाण याचा मुलगा (रा. केडगाव), गणेश सुकऱ्या माळी (रा. केडगाव) आणि त्यांच्यासोबत असलेल्या अन्य दोन अनोळखी साथीदार अशा चौघांविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. या पैकी दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्यांच्याकडे दरोड्याची चौकशी सुरू असल्याचे तपासी अधिकारी जाधव यांनी सांगितले.(प्रतिनिधी)पोलीस पाटलाच्या शेजारी चोरी केडगाव येथील कांबळे यांच्या घराशेजारीच पोलीस पाटलांचे घर आहे. आरोपी हे कांबळे मळ्यात सुरु असलेल्या एका बांधकामाच्या ठिकाणी काम करीत असल्याचे पोलीस तपासात उघड झाले आहे. फिर्यादीनेच त्या आरोपींना ओळखले.