शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
2
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
3
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
4
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
5
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
6
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
7
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
8
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
9
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
10
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
11
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
12
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
13
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
14
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
15
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
16
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
17
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
18
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
19
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
20
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
Daily Top 2Weekly Top 5

५३६ अवघड क्षेत्रांतील शाळांची यादी प्राप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 6, 2021 04:22 IST

अहमदनगर : शिक्षक बदल्यांच्या अनुषंगाने जिल्ह्यातील अवघड क्षेत्रातील शाळा निवडीची प्रक्रिया जिल्हा परिषदेत मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू ...

अहमदनगर : शिक्षक बदल्यांच्या अनुषंगाने जिल्ह्यातील अवघड क्षेत्रातील शाळा निवडीची प्रक्रिया जिल्हा परिषदेत मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू झाली आहे. जिल्ह्यातून ५३६ अवघड क्षेत्रातील शाळांची यादी शिक्षण विभागाला प्राप्त झाली असून समितीमार्फत पडताळणी करून अंतिम शाळांची निवड होणार आहे.

वाढत्या कोरोना संसर्गामुळे यंदा प्राथमिक शिक्षकांच्या बदल्यांबाबत संभ्रमाचे वातावरण आहे. मात्र, बदल्यांची प्रक्रिया करण्याची वेळ आल्यास ऐनवेळी अडचण नको, यासाठी जिल्ह्यातील अवघड क्षेत्रातील शाळा निश्‍चित करण्याची प्रक्रिया जिल्हा परिषदेने सुरू केली आहे. त्यानुसार १४ तालुक्यांतील गटशिक्षणाधिकारी यांनी त्यांच्या तालुक्यातील अवघड क्षेत्रातील शाळांची यादी प्राथमिक शिक्षण विभागाला सादर केली असून यात ५३६ शाळांचा समावेश आहे. आता अवघड क्षेत्रातील शाळांसाठी नेमलेल्या समितीमधील विभाग यादीतील शाळांची पडताळणी करणार असून त्यानंतर जिल्ह्यातील अवघड क्षेत्रातील शाळांची संख्या निश्‍चित होणार आहे.

जिल्ह्यातील अवघड क्षेत्रातील शाळा निश्‍चित करण्यासाठी मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली समिती असून या समितीमध्ये उपजिल्हाधिकारी (निवडणूक विभाग), कार्यकारी अभियंता (सार्वजनिक बांधकाम विभाग), कार्यकारी अभियंता (जिल्हा परिषद बांधकाम विभाग), विभाग नियंत्रक (राज्य परिवहन मंडळ) आणि शिक्षणाधिकारी (प्राथमिक) हे सदस्य आहेत.

बुधवारी मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र क्षीरसागर यांच्या अध्यक्षतेखाली समितीच्या सदस्यांची बैठक झाली. यावेळी निवडणूक शाखेचे उपजिल्हाधिकारी राजेंद्र पाटील, एसटीचे विभाग नियंत्रक विजय गीते, जिल्हा परिषद आणि राज्य सरकारच्या सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता हजर होते. उपवन संरक्षक मात्र बैठकीला गैरहजर होते. ही समिती आता मिळालेल्या यादीतून अवघड क्षेत्र शाळांची नावे अंतिम करणार आहे.

अवघड क्षेत्र ठरविण्यासाठी शासनाने सात निकष दिलेले आहेत. या सातपैकी कोणतेही तीन निकष पूर्ण करणा-या शाळांची निवड अवघड क्षेत्रातील शाळांमध्ये होणार आहे. २०१८ मध्ये अशा प्रकारे ४७८ शाळांची यादी जिल्हा परिषदेला पाठविल्यानंतर तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी जिल्हा परिषदेच्या प्रत्येक विभागप्रमुखाला १४ तालुके वाटून देऊन त्यांनी प्रत्यक्ष केलेल्या पाहणीत जिल्ह्यात ३६८ शाळा अवघड क्षेत्रात अंतिम झाल्या होत्या. यंदा किती शाळा अंतिम होतात, याकडे शिक्षकांचे लक्ष लागले आहे.