कर्मचाऱ्यांच्या विविध प्रलंबित प्रश्नांबाबत जिल्हा परिषद कर्मचारी महासंघाच्या शिष्टमंडळासमवेत क्षीरसागर यांनी बैठक घेतली. यावेळी विविध प्रलंबित मागण्यांबाबत सकारात्मक चर्चा करण्यात आली. या बैठकीस महासंघाचे जिल्हाध्यक्ष सुनील नागरे, सरचिटणीस मंगेश पुंड, राजेंद्र पावसे, रमेश बांगर, मंजुषा शिंदे आदी उपस्थित होते.
जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांना दरमहा वेळेवर पगार मिळावा, प्रवर्गनिहाय कालबद्ध पदोन्नती १०,२०,३० वर्षांचे लाभ मंजूर करावेत, अंगणवाडी पर्यवेक्षिकांना अद्याप कालबद्ध पदोन्नतीचा लाभ मिळालेला नाही. आदर्श ग्रामसेवक पुरस्कार दोन वर्षांपासून रखडले असून त्याबाबत तातडीने निर्णय घ्यावा, आरोग्य उपकेंद्रातील अर्धवेळ परिचरांचे थकीत पगार व आवश्यक सुविधा मिळाव्यात, जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांना गोपनीय अहवालाची सत्यप्रत मिळावी, डीसीपीएस, एनपीएस हिशोब व प्राण कार्ड सर्वांना मिळावे, मंजूर वैद्यकीय थकीत बिलाकरिता अनुदान मंजूर करावे, कोविडचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन जिल्हा परिषद अधिकारी, कर्मचारी, फ्रंट लाईन वर्कर्सचे १०० टक्के लसीकरण करावे, अर्धवेळ स्त्री परिचरांना कोविड योद्धा म्हणून ग्रामपंचायतीमार्फत १ हजार रुपये देण्याच्या शासन निर्णयाची अंमलबजावणी करावी, आरोग्य सुपरवायझर यांना परिवेक्षक पदावर पदोन्नती द्यावी, जिल्हाअंतर्गत बदल्यांचे धोरण निश्चित करावे, वाहनचालक, सफाई कर्मचारी यांना गणवेश मिळावे, अंगणवाडी पर्यवेक्षिकांना आश्वासित प्रगती योजनेचा लाभ तातडीने मिळावा आदी मागण्यांवर बैठकीत सविस्तर चर्चा करण्यात आली.
महासंघात ग्रामसेवक, कृषी विस्तार, विस्तार अधिकारी, वाहनचालक, परिचर, अंगणवाडी पर्यवेक्षिका, परिचारिका, अर्धवेळ परिचर, पशुसंवर्धन आदी संघटनांच्या प्रतिनिधींचा समावेश होता.
----------
फोटो - २३झेडपी एम्पलाॅई निवेदन
जिल्हा परिषद सेवेतील विविध संवर्गातील कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांबाबत कर्मचारी महासंघाच्या शिष्टमंडळासमवेत मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र क्षीरसागर यांनी चर्चा केली.