शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतासाठी गुड न्यूज! अमेरिकेला मागे टाकत बनू शकतो जगातील दुसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था; EY च्या रिपोर्टमध्ये काय?
2
शी जिनपिंग यांचं सीक्रेट लेटर, मैत्रीसाठी पुढाकार; भारत-चीन संंबंध सुधारण्यामागची Inside Story
3
रोज फोनवर बोलता बोलता मित्राच्या पत्नीवर जीव जडला, अडथळा ठरलेल्या नवऱ्याचा प्रियकरानेच खेळ खल्लास केला! 
4
भयंकर! तांत्रिकाच्या सांगण्यावरून ११ वीतील युवकाचा दिला नरबळी; शीर धडापासून वेगळे केले, अन्...
5
बॉयफ्रेंडने लाथा-बुक्क्यांनी मारलं, सर्व पैसे चोरले, माझं घर घेतलं; प्रसिद्ध गायिकेचा आरोप
6
ना चित्रपट ना जाहिरात, तरीही सोनू सूदने कमावले ३.१० कोटी रुपये; काय आहे उत्पन्नाचा स्त्रोत?
7
संतापजनक! मोबाईल दुरुस्ती दुकानातून खाजगी व्हिडीओ लीक, आता येत आहेत वाईट मेसेज
8
पहिलाच टी-२० सामना ठरला शेवटचा; जाणून घ्या 'त्या' ५ भारतीय खेळाडूंबद्दल!
9
"तुम्ही गोळ्या घातल्या, तरी हटणार नाही"; मनोज जरांगेंचा निर्धार, CM फडणवीसांना काय केलं आवाहन?
10
AAI Recruitment: एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडियामध्ये नोकरी, निवड झाल्यास दीड लाख पगार!
11
EV सेक्टरच्या शेअरची कमाल! दिला 8600% परतावा, 59 पैशांचा स्टॉक 51 रुपयांवर पोहोचला; करतोय मालामाल
12
पार्थ पवारांनी पैसे दिले, जॅकलिनने लालबागच्या राजाच्या पेटीत टाकले, पाहा VIDEO
13
मतदानानंतर रेशन आणि आधारही हिसकावून घेतील..; राहुल गांधींचा मोदी सरकारवर हल्लाबोल
14
Pooja Kumari : कष्टाचं फळ! भाजी, कपडे विकले, कोरोनात मास्क शिवले; अडचणींवर मात करुन झाली अधिकारी
15
जिओ IPO, AI आणि नवीन उर्जा... मुकेश अंबानी उद्या मोठ्या घोषणा करणार? गुंतवणूकदारांना संधी?
16
बिहारमध्ये हाय अलर्ट, जैश-ए-मोहम्मदचे तीन पाकिस्तानी दहशतवादी नेपाळमधून घुसले
17
सोनं झळाळलं, चांदी कडाडली... दोघांचीही किंमत चांगलीच वधारली! कॅरेटप्रमाणे पटापट चेक करा सोन्याचे लेटेस्ट रेट
18
इंजेक्शन घेऊन वर्ल्ड कप खेळला; आता त्याच्या फिटनेसवर नाही भरवसा! मोहम्मद शमी म्हणाला...
19
TVS: टीव्हीएसचा बाजारात धमाका! स्टायलिश डिझाइनसह ई-स्कूटर केली लॉन्च, जाणून घ्या किंमत
20
Open AI: एआयचा वापर धोकादायक? चॅटजीपीटीमुळे १६ वर्षांच्या मुलाने आत्महत्या केल्याचा आरोप

चला पंढरीसी जाऊ! रखुमा-देवीवरा पाहू!!

By admin | Updated: June 28, 2014 01:11 IST

अहमदनगर : भागवत धर्माची भगवी पताका हातात घेऊन ‘चला पंढरीशी जाऊ, रखुमा देवीवरा पाहू’, ‘ज्ञानोबा माऊली तुकाराम’, विठू माऊली तू माऊली जगाची असा विठ्ठल नामाचा गजर करीत

अहमदनगर : भागवत धर्माची भगवी पताका हातात घेऊन ‘चला पंढरीशी जाऊ, रखुमा देवीवरा पाहू’, ‘ज्ञानोबा माऊली तुकाराम’, विठू माऊली तू माऊली जगाची असा विठ्ठल नामाचा गजर करीत पंढरीच्या वाटेवर निघालेल्या देवगड दिंडीतील वारकऱ्यांची पावले शुक्रवारी नगरमध्ये विसावली़नेवासा तालुक्यातील श्री क्षेत्र देवगड दिंडी राज्यात शिस्तप्रिय समजली जाते़ श्री समर्थ सदगुरु किसनगिरी बाबांच्या आषाढी वारी पायी पालखी दिंडीचे हे ४० वे वर्ष आहे. दरवर्षी श्री क्षेत्र देवगड येथील गुरुदेव दत्तपीठाचे प्रमुख महंत भास्करगिरी महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली ही दिंडी पंढरपूरला जाते़ या दिंडीचे शुक्रवारी (दि़२३) दुपारी नगर शहरात आगमन झाले. खांद्यावर भगवी पताका, पांढरा पोषाख, गळ्यात तुळशीची माळ, डोक्यावर पांढरी टोपी परिधान केलेले वारकरी ‘ज्ञानोबा-तुकाराम’, विठू माऊलीचा गजर करीत अग्रभागी होते़ त्यांच्यामागे भजनी मंडळ, चांदीच्या पुष्पांनी सजविलेल्या रथामध्ये किसनगिरी बाबांची प्रतिमा व प्राकृत पादुका त्यामागे ज्ञानोबा-तुकाराम व विठू माऊलीचा जयघोष करणाऱ्या महिला भाविक रांगेनेच शिस्तीचे दर्शन घडवित शहरात दाखल झाले़ दरम्यान वाटेत ठिकठिकाणी वारकऱ्यांचे स्वागत करतानाच अनेक भाविकांनी वारकऱ्यांसाठी फळे, पाणी वाटप केले़ दिंडी शहरातील वसंत टेकडी परिसरात पोहोचल्यानंतर तेथे प्रेस क्लब व फिनिक्स सोशल फौंडेशनच्या वतीने वारकऱ्यांची मोफत आरोग्य तपासणी करुन औषध वाटप करण्यात आले़ यावेळी प्रेस क्लबचे अध्यक्ष मन्सूरभाई शेख, जालिंदर बोरुडे, चंद्रकांत पालवे, मीनाताई मुनोत, डॉ़ प्रसन्नाकुमार खन्ना, डॉ़ संजय मेहेर, डॉ़ संदीप कळमकर आदी उपस्थित होते़ भास्करगिरी महाराज व सद्गुरु किसनगिरी बाबांच्या पालखीचे दर्शन घेण्यासाठी भाविकांनी गर्दी केली़ वसंत टेकडी परिसरात वारकऱ्यांनी दुपारचे भोजन केले़ त्यानंतर भास्करगिरी महाराज यांचे प्रवचन झाले़ दुपारी ३ वाजण्याच्या सुमारास पालखी वसंत टेकडी येथून निघाल्यानंतर डीएसपी चौक, नटराज चौक, सर्जेपुरा, कापड बाजार, माळीवाडा मार्गे जावून लक्ष्मीनारायण मंगल कार्यालयात मुक्कामी थांबली़ सकाळी आनंदऋषी समाधीस्थळमार्गे सोलापूर रस्त्याने पंढरपूरकडे मार्गस्थ होईल़दिंडीच्या स्वागतासाठी ठिकठिकाणी कमानी उभारण्यात आल्या होत्या़ शहरात आ़ अनिल राठोड, संभाजी कदम, प्रकाश भागानगरे, संजय चोपडा, महापौर संग्राम जगताप यांच्यासह व्यापारी व भाविकांनी दिंडीचे जोरदार स्वागत केले़ अनेक ठिकाणी फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली़लवाजमा आणि सेवाधारीदिंडीतील वारकऱ्यांसाठी पाणी, भोजन, आरोग्य सुविधा पुरविण्यासाठी दिंडीसोबत सुमारे १७ वाहनांचा ताफा आहे़ यामध्ये ७ ट्रका, ४ पाण्याचे टँकर, ३ ट्रॅक्टर, देवगड संस्थांनची रुग्णवाहिका, मिनीबस, मोठी बस अशा १७ वाहनांचा लवाजमा आणि सुमारे ५० सेवाधारी दिंडीसोबत आहेत़ यावर्षी सुमारे १६०० वारकरी दिंडीत सामिल झाले आहेत, अशी माहिती बाळू महाराज कानडे यांनी दिली़असा आहे वारकऱ्यांचा दिनक्रमसकाळी ३ वाजता वारकऱ्यांना जागविण्यासाठी सनई चौघडा सुरु होतो़ त्यानंतर सर्वांनी उरकून ४ वाजता काकडा भजन व आरती सुरु होते़ ५ वाजल्यानंतर चहापान होते़ ६़३० वाजता प्रार्थना केली जाते़ आणि त्यानंतर दिंडीचे मुक्कामाच्या ठिकाणाहून प्रस्थान होते़ सकाळी ९ वाजता अल्पोपहारासाठी दिंडी थांबते़ अल्पोपहार झाल्यानंतर पुन्हा दिंडी मार्गस्थ होते़ दुपारी १२ ते १ वाजण्याच्या सुमारास दुपारचे भोजन, त्यानंतर प्रवचन होते़ दुपारी ३ वाजण्याच्या सुमारास दिंडीतील वारकऱ्यांची पावले पुन्हा पंढरीच्या वाटेवर चालू लागतात़ ५ कि.मी़च्या प्रवासानंतर छोट्याशा विश्रांतीसाठी दिंडी पुन्हा थांबते़ तेथून निघाल्यानंतर मुक्कामाच्या ठिकाणी वारकरी विसावतात़ तेथे रात्री आरती, कीर्तन, प्रवचन असे कार्यक्रम पार पडतात़