शहरं
Join us  
Trending Stories
1
जगदीप धनखड यांनी अचानक राजीनामा का दिला? अमित शाह म्हणाले, 'जास्त ताणून काहीतरी...'
2
काय आहे 'सलवा जुडूम' ?; ज्यावरून अमित शाहांनी विरोधकांच्या उपराष्ट्रपतिपदाच्या उमेदवाराला घेरले
3
AI ची कमाल, आता म्हातारपणही रोखणार, राहाल "चिरतरुण"! काय आहे चॅटबॉट रिव्हर्स एजिंग? जाणून घ्या
4
अमित साटम मुंबई भाजपाचे नवे अध्यक्ष; महापालिकेत नवा रेकॉर्ड करणार, CM देवेंद्र फडणवीसांचा दावा
5
ओला इलेक्ट्रिकच्या शेअर्समध्ये जोरदार तेजी; नीति आयोगाच्या वृत्ताचा परिणाम, तुमच्याकडे आहे का?
6
Pune: सिंहगडावरून बेपत्ता झालेला गौतम गायकवाड पाच दिवसांनी सापडला; कुठे होता, पोलिसांनी काय सांगितलं?
7
"मी कुणाच्या वाट्याला जात नाही आणि..." अजित पवारांनी घेतली संकर्षण कऱ्हाडेची फिरकी
8
अमेरिका ७, चीन ४, भारत १.., ही कोणती यादी, जिथे फक्त दोनच दिग्गजांचं आहे वर्चस्व; यातून काय मिळताहेत संकेत?
9
लहान गुंतवणुकीतून कोट्यधीश होण्यासाठी SIP का आहे बेस्ट? 'हे' ८ मुद्दे ठरतात गेमचेंजर
10
गर्लफ्रेंडशी शरीरसंबंध प्रस्थापित करताना पुरूषाचा मृत्यू, कोर्टाने प्रेमिकेला ठोठवला दंड
11
वराह म्हणजे डुक्कर नाही, तर ते यज्ञरूप आहे; वराह जयंतीनिमित्त जाणून घ्या विष्णूंचे अवतारकार्य
12
Viral: रीलचा नाद जीवावर बेतला; २२ वर्षीय युट्यूबर धबधब्यामध्ये बुडाला, घटनाकॅमेऱ्यात कैद
13
गुडन्यूज! परिणीती चोप्रा होणार आई, लग्नाच्या दोन वर्षांनंतर कुणीतरी येणार येणार गं...
14
सरकारच्या एक निर्णयाने अडचणीत आली ₹6,98,44,77,87,200 ची कंपनी; कोण आहेत ड्रीम-11 चे मालक हर्ष जैन? अंबानी कुटुंबाशी खास नातं!
15
एक मुलगा छातीवर बसला, दुसऱ्याने हात-पाय बांधले; रिटायर्ड DSP ना मारहाण; हिसकावलं ATM
16
चौथ्या स्टेजच्या कर्करोगाशी झुंजतेय अभिनेत्री तनिष्ठा चॅटर्जी, तिला सतावतेय ९ वर्षांच्या मुलीची चिंता
17
Prithvi Shaw : संघ बदलला अन् फार्मात आला! पृथ्वी शॉच्या भात्यातून आली आणखी एक कडक खेळी
18
Nikki Murder Case : हुंड्यासाठी निक्कीला जाळून मारलं; पती, सासूनंतर आता दीर आणि सासऱ्यालाही अटक
19
हरितालिका व्रत २०२५: ‘हे’ नियम अवश्य पाळावेत; व्रत पूजनानंतर म्हणावी हरितालिका आरती
20
१० वेळा बॉयफ्रेंडसोबत पळाली, आता विवाहित महिलेने ठेवला १५-१५ चा अजब फॉर्म्युला; ऐकून सगळेच हैराण

आमदारकीचे स्वप्न पाहणाऱ्यांना आस्मान दाखवू

By admin | Updated: June 23, 2014 00:05 IST

बबनराव पाचपुते: राष्ट्रवादी काँग्रेसच्या बैठकीत इशारा

श्रीगोंदा : सर्वसामान्य मतदार बरोबर असल्याने विरोधकांना घाबरत नाही. आगामी विधानसभा निवडणुकीत १९८० चा पॅटर्न राबवून आमदारकीची स्वप्न पाहणाऱ्यांना अस्मान दाखविण्याचा इशारा आ. बबनराव पाचपुते यांनी दिला.काष्टी येथे आयोजित राष्ट्रवादी कार्यकर्त्यांच्या बैठकीत पाचपुते बोलत होते. ते म्हणाले, राजकीय जीवनात पक्षांतर करताना अगोदर कार्यकर्त्यांना विश्वासात घेऊनच पुढची पावले टाकली आहेत. मागच्या दरवाजाने कधीच पक्षांतर केले नाही. गेल्या वर्षी दुष्काळ पडला. मंत्रीपदाची प्रतिष्ठा पणाला लावत जनावरांसाठी छावण्या सुरू केल्या. उन्हाळ्यात पिण्याच्या पाण्यासाठी दोन आवर्तने सोडली. कालवा सल्लागार समितीच्या बैठकांना काहींना मी बसू दिले, परंतु माझ्या विरोधात चुकीचा प्रचार केला. मी मनात आणले असते तर बैठकीतून एका मिनिटात बाहेर काढले असते. पाणी प्रश्नावर मी शुद्धीत बोलतो, घरात बसून बोलत नाही, असा टोला पाचपुते यांनी घन:श्याम शेलार, कुंडलिकराव जगताप यांना मारला.यावेळी बाबासाहेब भोस, भगवान पाचपुते, अ‍ॅड. विठ्ठल काकडे, अरुण हिरडे, सुदाम नवले, मुकुंद सोनटक्के, दिनकर पंधरकर, संग्राम पवार, सुनीता वाघमारे, दादा मोळक, जिजाबापू शिंदे, बबन मदने, बलभिम कासार, हरिदास शिर्के, रामदास घोडके यांची भाषणे झाली. (तालुका प्रतिनिधी)शेलारांच्या राजीनाम्यावर नो कॉमेन्ट..घनश्याम शेलार यांनी राष्ट्रवादी काँगे्रसच्या जिल्हाध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे. यावर पत्रकारांनी आ. बबनराव पाचपुतेंना छेडले असता त्यांनी ‘नो कॉमेन्ट’ एवढीच प्रतिक्रिया दिली.विक्रमसिंह पाचपुतेंनी सुनावले खडे बोल काही कार्यकर्त्यांना फोन केले तरी बैठकांना येत नाहीत. नेहमीच बैठकांना दांडी मारणाऱ्या कार्यकर्त्यांवर कारवाई झाली पाहिजे. पूर्वी संघटनेत परखड बोलणारे कार्यकर्ते होते, परंतु आता ते कमी झाले आहेत. साईकृपाने सर्वाधिक भाव दिला. एक किलोचा काटा कधी मारला नाही. कार्यकर्त्यांनी पक्ष आणि नेत्यांविषयी सकारात्मक दृष्टीकोन ठेवावा, असे खडे बोल विक्रम पाचपुते यांनी सुनावले़चुकलो तर... साईकृपाचे दोन्ही कारखाने पूर्ण क्षमतेने चालू करणार आहे. कार्यकर्त्यांना दुसऱ्याच्या दारात जाऊ देणार नाही. साईकृपा १२५ रुपयाचे बिल दिवाळीपूर्वी देणार आहे. आमची बांधिलकी कार्यकर्त्यांशी, आमचे चुकले तर चार भिंतीच्या आत आमचा कान धरा, पण रस्त्यावर कशासाठी चर्चा करता, अशी खंत साईकृपाचे अध्यक्ष सदाअण्णा पाचपुते यांनी व्यक्त केली.