अहमदनगर : भाजपाच्या पक्षनिरीक्षकांनी घेतलेल्या मुलाखतीसाठी आठ मतदारसंघातून इच्छुकांनी उमेदवारीची मागणी केली. एका-एका मतदारसंघातून १० ते २० जणांनी मुलाखती दिल्या. प्रमुख उमेदवारांनी शक्तीप्रदर्शन केले. घोषणाबाजी, कार्यकर्त्यांच्या गर्दीने शासकीय विश्रामगृह दणाणले. भाजपाशिवाय काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील इच्छुकांनीही मुलाखत देऊन विधानसभा निवडणूक लढविण्याची इच्छा व्यक्त केली.पक्षाचे निरीक्षक आमदार चंद्रकांत पाटील आणि आमदार माधुरी मिसाळ यांनी इच्छुकांच्या मुलाखती घेतल्या. यावेळी प्रदेश सरचिटणीस आमदार प्रा. राम शिंदे, शहर जिल्हाध्यक्ष अॅड. अभय आगरकर, माजी आमदार चंद्रशेखर कदम,महिला आघाडीच्या सुरेखा विद्ये, सुवेंद्र गांधी उपस्थित होते. सकाळी दहा वाजल्यापासूनच शासकीय विश्रामगृहावर मुलाखतीसाठी गर्दी जमली होती. इच्छुकांसह कार्यकर्ते मोठ्या संख्येने हजर होते. दुपारी तीननंतर अन्य पक्षातील इच्छुकांसह कार्यकर्त्यांची गर्दी झाली होती. औरंगाबाद रोडवर वाहनांच्या रांगाच रांगा लागल्या होत्या. भाजपासह कॉँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसमधील इच्छुकही हजर होते. आधी कार्यकर्त्यांसह इच्छुकांच्या मुलाखती घेतल्यानंतर निरिक्षकांनी पुन्हा इच्छुकांशी स्वतंत्रपणे चर्चा केली. युतीच्या जागावाटपातील भाजपाच्या हक्काच्या पाच जागांसह अन्य चार जागांवर इच्छुकांनी दावा केला आहे. त्यामुळे शिर्डी, पारनेर, कोपरगाव वगळता सर्वच मतदारसंघातून इच्छुकांनी मुलाखती दिल्या. नगर-पारनेर-अकोले मतदारसंघ भाजपाकडे घ्यावा, अशीही मागणी करण्यात आली. आमदार शिवाजी कर्डिले यांची नाशिकला कोर्टाची तारीख असल्याने ते उपस्थित नव्हते. (प्रतिनिधी)शेलार, मुरकुटेंची हजेरीराष्ट्रवादी काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष घनश्याम शेलार, माजी आमदार भानुदास मुरकुटे, बाळासाहेब नाहाटा, अण्णासाहेब शेलार, राहुल जगताप यांच्या उपस्थितीने भाजपाच्या गोटातील वातावरण चांगलेच तापले. त्यांच्या उपस्थितीती चर्चा रंगली. राहुल जगताप वगळता अन्य नेत्यांनी कोणतेही शक्तीप्रदर्शन न करता पक्ष निरीक्षकांशी स्वतंत्रपणे भेट घेऊन चर्चा केली. अकोले, पारनेरची जागाही भाजपाला घ्यावी, अशी मागणी करण्यासाठी काही कार्यकर्ते आले होते. मात्र त्यांच्यापैकी कोणीही उमेदवारीची मागणी केली नाही. दरम्यान, विद्यमान आमदारांच्या मतदारसंघातूनही इच्छुकांची संख्या वाढीस लागल्याचे या मुलाखतींनी स्पष्ट केले. यांनी दिल्या मुलाखतीनेवासा : माजी आमदार भानुदास मुरकुटे, बाळासाहेब मुरकुटे, सचिन देसरडा, साहेबराव घाडगे,नवनीतभाई सुरपुरिया,रामभाऊ खंडागळे,अनिल ताके, अजित फाटके, दिनकर गर्जे. शेवगाव : पाथर्डी- माजी आमदार दगडू पाटील बडे,सी.डी. फकीर,संपतराव कीर्तने, विजयकुमार मंडलेचा, हर्षदा काकडे, नितीन काकडे, अशोक आहुजा, तुषार वैद्य, दिलीप लांडे, श्रीगोंदा : राहुल जगताप, बाळासाहेब नाहाटा, अण्णासाहेब शेलार, घनश्याम शेलार, सुवर्णा पाचपुते, राजेंद्र म्हस्के, संतोष लगड,दादा ढवण, संगमनेर :अॅड. सुधीर पोखरकर, राधावल्लभ कासट, प्रा. सुभाष गिते,विठ्ठल शिंदे, श्रीरामपूर : सुनीता गायकवाड, श्रीकांत साठे, कर्जत-जामखेड : प्रा. राम शिंदे, कैलास शेवाळे, नामदेव राऊत, स्वप्नील देसाई, अशोक खेडकर, अर्चना राळेभात, संजय गोपाळघरे, चंद्रकांत राळेभात, तुळशीराम मुळे, राहुरी : आमदार शिवार्जी कर्डिले, माजी आमदार चंद्रशेखर कदम, नानासाहेब गागरे, कृष्णागर जेजूरकर, साहेबराव म्हसे, नगर : सुवेंद्र गांधी
भाजपाच्या मुलाखतीला आघाडीतील नेते!
By admin | Updated: August 5, 2014 23:59 IST