मंगळवारपासून साठ वर्षांवरील व्यक्तिंना कोरोना लसीकरण सुरू करण्यात आले आहे. डायबिटीज, ब्लड प्रेशर, कॅन्सर व इतर आजार असणाऱ्या पंचेचाळीत ते साठ वयादरम्यानच्या व्यक्तिंनाही कोरोना लस दिली जाणार आहे. संबंधित आजाराचे प्रमाणपत्र बरोबर आणणे गरजेचे आहे. सोमवार, बुधवार आणि शुक्रवार या दिवशी लसीकरण करण्यात येईल. प्राथमिक आरोग्य केंद्रात येताना मोबाईल आणि आधार कार्ड बरोबर आणणे गरजेचे आहे. लसीकरणाचा सर्वांनी लाभ घ्यावा, कोणीही वंचित राहता कामा नये, असे आवाहन बोठे यांनी केले.
महिला दिनानिमित्त सर्व आरोग्य सेविका व उपस्थित महिलांना बोठे यांनी भेटवस्तू देऊन त्यांचे स्वागत केले. याप्रसंगी प्राथमिक आरोग्य अधिकारी डॉ. अनिल ससाने, डॉ. शैलजा ठाकूर, मनीषा सुपेकर, नसीमा शेख, सोनल नाईक, देवराम कासार, प्रा. रमाकांत बोठे उपस्थित होते.
...