शहरं
Join us  
Trending Stories
1
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
2
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
3
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
4
बेडरुम व्हिडीओ, २०२० चं 'ते' सीक्रेट अफेअर... प्रियंकाच्या क्राईम फाईलबाबत खळबळजनक खुलासा
5
होर्मुझमध्ये अमेरिकेचा 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
6
"...तेव्हा मी जगाचा निरोप घ्यावा!"; आशा भोसलेंची शेवटची इच्छा ऐकून चाहत्यांचे डोळे पाणावले
7
लहानशा देशात इराणनं लपवलाय 'खजिना'; इथूनच चालतो ड्रोन-मिसाइलचा खेळ, अमेरिकेलाही देतात चकवा
8
Raj Thackeray : "आशाताई'-दि लास्ट एम्परर, आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर वादळं पहिली, तरीही..."; राज ठाकरेंची भावुक पोस्ट
9
TCS ची मोठी घोषणा! यावर्षी २५ हजार फ्रेशर्सना देणार नोकरी; युवा टॅलेंटवर कंपनीचा फोकस
10
ना हृदय... ना मेंदू! तरीही समुद्राच्या अथांग गर्तेत राज्य करतो 'हा' जीव; नेमकं गुपित काय?
11
GT विरुद्धही भावाला प्लेइंग इलेव्हनमध्ये मिळाली नाही जागा; तरी LSG ला सपोर्ट करताना दिसली सारा तेंडुलकर
12
"मदरशांसाठी 600 कोटींचं बजेट पण विकासासाठी निधी नाही...!" प. बंगालच्या रॅलीतून पंतप्रधान मोदींचा हल्लाबोल
13
बंद घराची कौले काढून चोरी; दहा तोळे सोने व १७ हजारांची रोकड लंपास!
14
Payal Nag : नियतीला झुकवणाऱ्या पायलची सुवर्णगाथा! अपघातात हात-पाय गमावले, तिरंदाजीतून जग जिंकले
15
LSG vs GT : पंतसमोर पहिला डाव जिंकला; गिलचा आनंद गगनात मावेना! 'तो' व्हिडिओ व्हायरल
16
युद्धविराम रद्द झाला तर जगावर मोठे संकट येणार; जागतिक बँकेचे प्रमुख अजय बंगा यांचा इशारा
17
सोशल मीडियाचा अतिवापर आणि अश्लील कंटेंटला बसणार लगाम! इन्स्टाग्रामने आणले नवीन 'टीन रूल्स'
18
“मंगेशकर कुटुंबातील ईश्वरीय आवाज लाभलेला तारा निखळला”; CM फडणवीसांकडून आशाताईंना श्रद्धांजली
19
US-इराणमधील चर्चा फिस्कटली, पुन्हा युद्धाचे ढग; भारत अलर्ट मोडवर, 'स्पेशल ऑपरेशन' लॉन्च
20
अमेरिका-इराण चर्चा निष्फळ! पाकिस्तानची पहिली प्रतिक्रिया आली समोर; परराष्ट्र मंत्री इशाक डार म्हणाले...
Daily Top 2Weekly Top 5

भय्यू महाराज यांच्या संपत्तीबाबत कुहूला हवी माहिती

By | Updated: December 5, 2020 04:35 IST

अहमदनगर : इंदूर (मध्यप्रदेश) येथील उदयसिंह देशमुख ऊर्फ भय्यू महाराज यांच्या आत्महत्येला ३० महिने उलटले तरी अद्याप वडिलांच्या संपत्तीचा ...

अहमदनगर : इंदूर (मध्यप्रदेश) येथील उदयसिंह देशमुख ऊर्फ भय्यू महाराज यांच्या आत्महत्येला ३० महिने उलटले तरी अद्याप वडिलांच्या संपत्तीचा ताळमेळ लागलेला नाही. त्यांच्या व ट्रस्टच्या नावावर असलेल्या संपत्तीची संपूर्ण माहिती मला हवी आहे, अशी विनंती भय्यू महाराज यांची कन्या कुहू देशमुख हिने इंदूर येथील जिल्हा न्यायालयात केली आहे, अशी माहिती कुहूच्या वकिलांनी ‘लोकमत’ला दिली.

भय्यू महाराज यांच्या आत्महत्या प्रकरणाची सध्या इंदूर न्यायालयात सुनावणी सुरू आहे. शनिवारी (दि. २८ नोव्हेंबर) झालेल्या सुनावणीच्या वेळी कुहू देशमुख ही न्यायालयात हजर झाली होती. यावेळी तिने वडिलांच्या संपत्तीविषयी माहिती हवी असल्याचे न्यायालयाला सांगितले, अशी माहिती कुहूचे वकील ॲड. सुदत जयसिंग पाटील, ॲड. प्रियंका राणे-पाटील, ॲड. भाग्येश पारनेरकर यांनी सांगितले. पाटील (मुंबई) व पारनेरकर यांनी कुहूचे वकीलपत्र घेतले आहे.

मध्यप्रदेशातील इंदूर येथील राष्ट्रसंत भय्यू महाराज यांनी १२ जून २०१८ रोजी रिव्हॉल्हरमधून गोळी झाडून आत्महत्या केली होती. याप्रकरणी त्यांचे सेवेकरी विनायक दुधाडे, शरद देशमुख, पलक पुराणिक यांना केली अटक असून, ते सध्या कारागृहात आहेत. वडिलांच्या मृत्यूनंतर कुहू ही प्रसारमाध्यमांपासून दूर होती. वडिलांशी निगडित अनेक गोष्टी तिने न्यायालयाला सांगितल्या. यामध्ये संपत्तीचा वाद, भय्यू महाराज यांची दुसरी पत्नी आयुषी, परिवारातील अन्य सदस्यांचे वागणे या गोष्टींचा समावेश होता.

कुहूला वडिलांच्या संपत्तीबाबत काहीही माहिती नाही. मध्यप्रदेश आणि महाराष्ट्रात त्यांची संपत्ती कुठे-कुठे आहे? त्या संपत्तीची सध्या देखभाल कोण करीत आहे? बँक खाते आणि खात्यामधील व्यवहार कसे सुरू आहेत, याबाबत कोणतीही माहिती नाही. वडिलांच्या संपत्तीवर तिचा पूर्ण हक्क असल्याचा दावाही तिने न्यायालयात केला असल्याचे वकिलांनी सांगितले. वडिलांना आत्महत्या करण्यास भाग पाडणाऱ्यांना शिक्षा व्हावी, अशीही मागणी तिने न्यायालयाकडे केली आहे. याप्रकरणी आता पुढील सुनावणी ८ ते १० डिसेंबरला होणार आहे, असे ॲड. भाग्येश पारनेरकर यांनी सांगितले.