जामखेड : कोरोना काळात केलेले काम, युवकांना नोकरी, व्यवसायात करीत असलेली मदत अशा आमदार रोहित पवार यांनी केलेल्या कामाने प्रभावित होऊन गोरेगाव (मुंबई) येथील एक तरुण दहा दिवस पायी वारी करत कर्जत येथे नुकताच पोहोचला. त्याने येथे कर्जत-जामखेड मतदारसंघातील विविध विकासकामांची पाहणीही केली.
संदीप पडघण (रा. गोरेगाव, मुंबई) असे त्या तरुणाचे नाव आहे. संदीप पडघण हा वाशिम जिल्ह्यातील ब्रह्मागावचा तरुण असून प्राणीमित्र आहे. मोकाट प्राण्यांसाठी तो एनजीओच्या माध्यमातून मुंबईत काम करतो. आमदार रोहित पवार हे युवकांना नोकरी, उद्योग, व्यवसाय यासाठी करत असलेली मदत, कोरोना काळात राज्यभर केलेले काम पाहून तो प्रभावित झाला. त्याने खांद्यावर रोहित पवार यांच्या नावाचा झेंडा घेऊन मुंबई ते कर्जत-जामखेड अशी पायी वारी केली. त्याने नुकतीच कर्जत येथे रोहित पवार यांची भेट घेतली. पवार यांनीही त्याचा सन्मान केला.
----
०१ जामखेड पवार