शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्याचे तीन महिने आचारसंहितेत; ‘झेडपी’मध्ये याचिकांचाच अडसर
2
तीस जिल्ह्यांत १७ लाख हेक्टरवरील पिकांची माती; अतिवृष्टीचा सर्वाधिक फटका नांदेड जिल्ह्याला
3
‘गर्व से कहो यह स्वदेशी हैं’ प्रत्येक दुकानावर फलक लावा ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा दिला स्वदेशीचा नारा
4
एअर इंडिया अपघाताची सरकारने चौकशी करावी; माझ्या मुलावर बट्टा नको, सुमितच्या वडिलांची मागणी
5
मृतदेहाची ‘डोली’तून दोन किमी फरपट, मृत्यूनंतरही अवहेलना
6
देशातील दोनच राज्यांत त्रिभाषा सूत्र, हिंदी सक्तीवरून वाद; नरेंद्र जाधव समितीची पहिली बैठक संपन्न; जनमत जाणून देणार अहवाल
7
विरार-डहाणू रोडदरम्यान सात स्टेशन; चौपदरीकरणामुळे गर्दी टाळण्यास मदत
8
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
9
Asia Cup 2025 : पाकनं UAE संघाला केलं 'आउट'! Super 4 मध्ये पुन्हा सेट झाली IND vs PAK मॅच
10
ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन भास्कर मेहेंदळे यांचे निधन; ७८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
11
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
12
आता डोनाल्ड ट्रम्प यांचं नवं नाटक...! भारताला, अफगाणिस्तान-पाकिस्तानसारख्या देशांशी जोडलं, चीनचंही नाव घेतलं!
13
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
14
Asia Cup 2025 : दुबईत 'सिंग इज किंग' शो! PAK विरुद्ध UAE च्या ताफ्यातून सिमरनजीतचा भांगडा
15
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!
16
दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपींचं एन्काउंटर, गाजियाबादमध्ये दोन्ही शूटर ठार; अशी पटवली ओळख
17
मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याची विटंबना; CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
18
Asia Cup 2025 : आधी टीम इंडियानं हँडशेक न केल्याची बोंब! आता UAE विरुद्धच्या मॅचआधी PAK चं नवं सोंग!
19
कुणबी प्रमाणपत्र कसे काढले जाते? १, २ नाही, १२ ते १६ कागदपत्रे आवश्यक; पाहा, पूर्ण प्रक्रिया

ज्येष्ठांचा भन्नाट सूर!

By admin | Updated: September 20, 2014 23:23 IST

अहमदनगर : वाडियापार्क येथे आयोजित १७ व्या राज्यस्तरीय मास्टर जलतरण स्पर्धेच्या पहिल्या दिवसावर ज्येष्ठ खेळाडूंच्या भन्नाट सूराने मोहर उमटवली़

अहमदनगर : वाडियापार्क येथे आयोजित १७ व्या राज्यस्तरीय मास्टर जलतरण स्पर्धेच्या पहिल्या दिवसावर ज्येष्ठ खेळाडूंच्या भन्नाट सूराने मोहर उमटवली़ वाढत्या वयातही तंदुरुस्ती राखणाऱ्या या जलतरणपटूंचा प्रत्येक स्ट्रोक ताकदीचा आणि तेवढाच लयदार होता. त्यामुळे क्रीडाप्रेमींनी त्यांचे प्रोस्ताहन वाढवत जिंकण्याच्या इर्षेला दाद दिली. राज्य जलतरण संघटना व जिल्हा जलतरण संघटना आणि मास्टर्स अ‍ॅक्केरिक समिती यांच्या संयुक्त विद्यमाने या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे़ स्पर्धेत २५ ते ९० वयोगटातील खेळाडू सहभागी झाले आहेत़ शनिवार व रविवार अशी दोन दिवस स्पर्धा होणार आहेत़ पहिल्या दिवशी सकाळी १२ वाजेच्या सुमारास फ्री स्टाईल आणि ब्रेस्ट स्ट्रोक प्रकारात ज्येष्ठ वयोगटातील खेळाडुंची कामगिरी लक्षवेधी ठरली़ स्पर्धेत ४१० पुरुष व ७० महिला खेळाडुंनी सहभाग नोंदविला आहे़ नगरसह राज्यातील नाशिक, अमरावती, पुणे, नागपूर, ठाणे, सांगली, रायगड, रत्नागिरी, वर्धा, अकोला, जळगाव, धुळे, सातारा, कोल्हापूर आदी जिल्ह्यातील खेळाडू सहभागी झाले आहेत़ या स्पर्धेत फ्री स्टाईल, ब्रेस्ट स्ट्रोक, बॅक स्ट्रोक, बटरप्लाय स्ट्रोक, वैयक्तीक मिडले, रिले व डयव्हिंग आदी प्रकारांचा समावेश आहे़ स्पर्धेतील प्रथम, द्वितीय तृतीय येणाऱ्या खेळाडुंना अनुक्रमे सुवर्ण, रौप्य व कांस्य पदक प्रदान करण्यात येणार आहेत़ या स्पर्धेमधून नोव्हेंबरमध्ये हैद्राबाद येथे होणाऱ्या राष्ट्रीय मास्टर्स जलतरण स्पर्धेसाठी महाराष्ट्राच्या संघाची निवड केली जाणार आहे़ दरम्यान, स्पर्धेच्या उद्घाटनप्रसंगी राज्य जलतरण स्पर्धेचे राज्य सचिव किशोर वैद्य, संघटनेचे अध्यक्ष शंकरराव घुले, गजानन चव्हाण, रावसाहेब बाबर, बाळासाहेब पवार आदी उपस्थित होते़ (प्रतिनिधी)