शहरं
Join us  
Trending Stories
1
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
2
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
3
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
4
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
5
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
6
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
7
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
8
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
9
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
10
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
11
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
12
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
13
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
14
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
15
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
16
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
17
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
18
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
19
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
20
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला पदार्पणाची संधी मिळणार?
Daily Top 2Weekly Top 5

मंदिरातील साहित्य चोरणारी टोळी जेरबंद

By admin | Updated: September 2, 2014 23:58 IST

अहमदनगर : स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने दोन आरोपींना जेरबंद केले.

अहमदनगर : डॉन बॉस्को चर्च शेजारी असलेल्या पाचम्मा मंदिरातील १६ हजार रुपये किमतीच्या वस्तू चोरीला गेल्यानंतर सहा तासांमध्येच स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने दोन आरोपींना जेरबंद केले. त्यांच्याकडून जिल्ह्यातील मंदिरातील चोरीचे आणखी काही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.पाचम्मा मंदिरातील देवीच्या मूर्तीवरील बेंटेक्सचे दागिने, हार, मंदिरातील लोखंडी घंटा, समई आदी १६ हजार रुपये किमतीचे दागिने चोरीला गेले होते. ही घटना रविवार सायंकाळी ते सोमवारी पहाटेच्या सुमारास घडली. याबाबत मंदिराचे पुजारी नारायण माधवराव पुप्पाल (रा. सरस्वती कॉलनी, चाँदणी चौक) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. दरम्यान याच सुमारास स्थानिक गुन्हे शाखेचे पथक शहरात पेट्रोलिंग करीत होते. पोलिसांनी दोघा संशयितांना हटकले आणि त्यांची झडती घेतली असता त्यांच्याकडे मंदिरातील साहित्य आढळून आले. त्यामध्ये चार पितळी घंटा, चार समई, कासवाच्या दोन प्रतिमा, दोन पावले, बेन्टेक्सचे हार असे साहित्य आढळून आले. त्यांनी हे साहित्य पाचम्मा देवीच्या मंदिरातून चोरल्याचे पोलिसांना सांगितले. जावेद इस्माईल शेख (वय २२, रा. बाबा बंगाली चौक, नगर) आणि अरिफ अल्लाउद्दिन शेख (वय ४२, इंदिरानगर, कोठी) यांना अटक करून गुन्हा दाखल केला. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक शशिराज पाटोळे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक सुनील टोणपे, मधुकर शिंदे, प्रसाद भिंगारदिवे, जोसेफ साळवे, उमेश खेडकर, विशाल अमृते, दिगंबर कारखिले यांच्या पथकाने ही कारवाई केली.