जामखेड : वंचित बहुजन आघाडी आगामी जामखेडची नगरपरिषद निवडणूक स्वबळावर लढविणार आहे, अशी माहिती पक्षनिरीक्षक रामभाऊ मरगळे यांनी दिली.
नगरपरिषद निवडणूक पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडीची जामखेड येथे शनिवारी दुपारी बैठक झाली. यावेळी इच्छुक उमेदवार, नेते, कार्यकर्ते यांची मते यावेळी जाणून घेण्यात आली. वंचितचे भटके विमुक्त आघाडीचे राज्य समन्वयक डॉ. अरुण जाधव अध्यक्षस्थानी होते. यावेळी जिल्हाध्यक्ष प्रतीक बारसे, जिल्हा सचिव योगेश साठे, जिल्हा उपाध्यक्ष भीमराव चव्हाण, ज्येष्ठ सल्लागार जीवन पारधे यांनी आपले मत व्यक्त केले. अरुण जाधव यांच्या माध्यमातून नगरपरिषदेच्या २१ जागा स्वबळावर लढविण्याची यावेळी घोषणा करण्यात आली.
अरूण जाधव म्हणाले, वंचित समूहाला सत्तेत बसविण्यासाठी ॲड. बाळासाहेब आंबेडकर अहोरात्र झटत आहेत. याचा वंचित समूहाने विचार करावा. वंचित बहुजन आघाडी शिवाय सत्तेचे समीकरण बसणार नाही हे प्रस्थापितांनी लक्षात घ्यावे, असा सूचक इशाराही त्यांनी यावेळी दिला. सूत्रसंचालन संतोष चव्हाण यांनी केले.
यावेळी अखिल भारतीय नाथपंथी डवरी गोसावी समाजाचे तालुकाध्यक्ष आजिनाथ शिंदे, सुधीर कदम, रवींद्र जाधव, जयओम टेकाळे, मोहन शिंदे, विष्णू चव्हाण, सागर ससाणे, तान्हाजी चव्हाण, राजू सावंत, सागर शिंदे, अविनाश जाधव, आकाश शेगर, डॉ. शेख खलील तय्यब, किशोर देडे, सोहेल मदारी, जावेद मदारी, अल्ताफ मदारी आदींसह कार्यकर्त्यांनी वंचितमध्ये प्रवेश केला.
यावेळी जिल्हा महासचिव योगेश साठे, वंचित बहुजन आघाडीचे जामखेड तालुकाध्यक्ष अतिश पारवे, श्रावण गंगावणे, पोपट जाधव, संतोष जाधव, केशव जाधव, ऋषिकेश जाधव, आकाश चंदन, अनिकेत जाधव, सागर जाधव, विकी जाधव, शेखर रिटे, बबलू सातपुते, यशवंत काकडे, किशोर मोहिते, फुलाबाई शेगर, कादीर मदारी, सुधीर कदम, नितीन आहेर, किरण जाधव आदी उपस्थित होते.
180921\1824-img-20210918-wa0024.jpg
( फोटो - वंचीत बहुजन आघाडीचा मेळाव्यात नगरपरिषद निवडणूक स्वबळावर लढण्याचा निर्णय)