शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्ली, हरयाणा, पंजाबमधील CCTV चे फुटेज थेट पाकिस्तानला, चिनी कॅमेऱ्यातून भारताची हेरगिरी
2
Latest Marathi News LIVE: सूरसम्राज्ञी आशा भोसले पंचत्वात विलीन, चाहत्यांनी साश्रू नयनांनी दिला अखेरचा निरोप
3
बालेन शाह यांनी PM मोदींना भेटण्यासाठी ठेवली अट; नेपाळ-भारत संबंध पुन्हा सुधारणार
4
"काही लोकांना ४ लग्नांची सूट, भाजप सत्तेत आल्यास...";  अमित शाह यांनी बंगालमध्ये सभा गाजवली, स्पष्टच बोलले
5
इराणी नेत्यांच्या सुरक्षेसाठी पाकिस्ताननं अख्खी ताकद पणाला लावली; कसं केले होते नियोजन?
6
सीलिंग फॅन की टेबल फॅन? वीज बिल वाचवण्यासाठी कोणता पर्याय सर्वोत्तम? खरेदीपूर्वी नक्की वाचा
7
"US-इराणमध्ये तयार होता अंतिम करार; शेवटच्या क्षणी आला एक कॉल अन् २१ तासांची चर्चा फिस्कटली"
8
श्रीलंकेत भारताची मोठी खेळी; खरेदी केली मोठी शिपबिल्डिंग कंपनी, चीन पाहतच राहिला
9
आशा भोसलेंची नात जनाईला धीर द्यायला पोहोचला 'मानलेला भाऊ' मोहम्मद सिराज, पाहा VIDEO
10
Garud Puran: गरुड पुराणानुसार मृत्यूपूर्वी मिळतात 'हे' रहस्यमयी संकेत; अखेरच्या काळात नेमकं काय घडतं?
11
MPSC भरती प्रक्रियेत मोठा बदल; राज्य मंत्रिमंडळाने घेतले ७ महत्त्वाचे निर्णय, जाणून घ्या
12
आले कधी अन् गेले कधी, समजलंच नाही! आयपीएलमध्ये सर्वात कमी धावसंख्येवर ऑलआउट झालेले संघ
13
८ व्या वेतन आयोगाची बंपर भरती; १.८० लाख रुपये महिना पगार, जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
14
पत्नीला काम सांगायचे म्हणून मुलाने केला पित्याचा खून; गडचिरोलीतील धक्कादायक घटना
15
Kalyan Accident: कल्याण-अहिल्यानगर महामार्गावर भीषण अपघात; ११ जणांचा मृत्यू, दोन गंभीर
16
IPL 2026: "सरळ मैदानाबाहेर जा...!" लाईव्ह सामन्यात सुनील गावस्कर आरसीबीच्या खेळाडूवर भडकले
17
इस्रायलचा महात्मा गांधी हॉस्पिटलवर हल्ला; सगळीकडे विध्वंस, इराणनं शेअर केला Video
18
पाकिस्तानचा दुहेरी डाव! US-इराण शांतता चर्चा निष्फळ ठरताच १३००० सैनिक सौदीत पाठवले, कारण काय?
19
IPL 2026: बॉल बॉयनं पाय धरताच व्यंकटेश अय्यरनं केलं असं काही, सर्वत्र होतंय कौतुक! 
20
'एक अब्ज डॉलर आणि लग्नासाठी एक सुंदर तरुणी द्या, अन्यथा...', या देशाच्या लष्कर प्रमुखाची तुर्कीला धमकी
Daily Top 2Weekly Top 5

७० हजार कोटींचे सिंचन आघाडीच्या घशात

By admin | Updated: March 20, 2024 13:05 IST

संगमनेर : गेल्या १५ वर्षांत एकाही पैशाची गुंतवणूक न झाल्याने महाराष्ट्रातील ४३ टक्के उद्योगधंदे घटले.

संगमनेर : गेल्या १५ वर्षांत एकाही पैशाची गुंतवणूक न झाल्याने महाराष्ट्रातील ४३ टक्के उद्योगधंदे घटले. काँग्रेस आघाडीवाल्यांनी ७० हजार कोटींचे सिंचन घशात घातले, अशी टीका करीत लाल दिवा हे माझं ध्येय नाही, तर माझ्या बाबांचं अधुरं स्वप्न पूर्ण करण्यासाठी मी उभी आहे, असे प्रतिपादन आमदार पंकजा मुंडे-पालवे यांनी केले. संगमनेर येथे शनिवारी जाणता राजा मैदानावर संघर्ष यात्रा सभेत आ. मुंडे बोलत होत्या. व्यासपीठावर राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर, गोविंद केंद्रे, सुरजीत ठाकूर, माजीमंत्री बबनराव पाचपुते, खासदार दिलीप गांधी, अमित पालवे उपस्थित होते. त्या म्हणाल्या, पंचायत राजपासून राजकीय पदार्पण करणारे गोपीनाथ मुंडे केंद्रीय ग्रामविकासमंत्री झाले. त्यांच्या सत्कार समारंभात भाषण करण्याची माझी इच्छा होती. पण, ३ जूनला बाबा गेले अन् मी अंध:कारात बुडाले. तुमच्यासारखी सर्वसामान्य माणसं पुढं आली म्हणून उभी राहिले. बाबांना ‘साहेब’ होण्यासाठी २० वर्षे लागली. मी १४ दिवसांत ‘ताई’ची ताईसाहेब झाले. त्यांचं स्वप्न होतं शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबविण्याचं. ते पूर्ण करणं माझं कर्तव्य आहे म्हणून सगळं दु:खं बाजूला ठेवून मी तुमच्यासमोर आले आहे. गृहमंत्री म्हणून बाबांच्या काळात एकही दंगल व दहशतवादी हल्ले झाले नाहीत. आता महिलांवर अत्याचार होत आहेत. राज्य सरकार भ्रष्टाचारावर चाललं आहे. २०१२ ला महाराष्ट्र ‘लोडशेडींग’मुक्त करण्याची आघाडीची घोषणा होती. पण ते झालेच नाही. भाजपशासीत गोवा, गुजरातसारख्या सुरक्षित राज्यांमध्ये उद्योग जात आहेत. शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबवून रोजगार देण्याचे आमचे प्रयत्न आहेत. त्यासाठी सत्ता परिवर्तनाची गरज असून हे जुलमी सरकार उलथून टाकायचे असेल तर माझ्याबरोबर मैदानात उतरण्याची तयारी ठेवा, असे आवाहन त्यांनी केले. जानकर यांनी आमचं नातं भावनिक असून ते आयुष्यभर तोडणार नाही. स्वार्थ घेवून आलो नाही. ‘ताई’मागे भाऊ म्हणून उभा राहील. महाराष्ट्रात फक्त १५० लोकांची सत्ता आहे. इकडे थोरात व तिकडे विखेंचा पाळणा हलला तरच पालकमंत्री होतो. पाचपुते यांनी रावणाचा वध करण्यासाठी विभिषणाची भूमिका घेतली आहे, असे सांगून ‘ताई’च्या संघर्ष यात्रेद्वारे परिवर्तनातून आघाडी सरकार गाडले जाईल, अशी टीका जाणकर यांनी केली. दिलीप गांधी यांनी राज्यात महायुतीच्या २०० पेक्षा जास्त जागा येतील, असे भाकीत वर्तविले. याप्रसंगी विठ्ठल शिंदे, राधावल्लभ कासट, ज्ञानेश्वर कर्पे, राजेश चौधरी, प्रा. सुभाष गीते, अशोक रागीर, संजय नाकिल, साहेबराव नवले, बाबासाहेब कुटे, कैलास वाक्चौरे, अमर कतारी, संजय फड आदींसह भाजप, सेना व आरपीआयचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. (प्रतिनिधी)