मोटारसायकल चोरली
अहमदनगर : शहरातील तपोवन रोडवरील संस्कृती मंगल कार्यालयासमोरून चोरट्याने मोटारसायकल चोरून नेली. १८ जानेवारी रोजी दुपारी ही घटना घडली. याप्रकरणी तोफखाना पोलीस ठाण्यात सचिन बबन ससे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी हेड कॉस्टेबल विजय पानसरे हे पुढील तपास करीत आहेत.
विहिरीतून वीजपंप चोरला
अहमदनगर : पाथर्डी तालुक्यातील येळी येथील शेतकऱ्याच्या विहिरीतून चोरट्यांनी वीजपंप व केबल चोरून नेली. १८ ते १९ जानेवारीदरम्यान ही घटना घडली. याप्रकरणी किरण दिगंबर जायभाये यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पोलीस नाईक बटुळे हे पुढील तपास करीत आहेत.
शेळ्या चोरल्या
अहमदनगर : पारनेर तालुक्यातील गव्हाणवाडी येथून चोरट्याने १७ हजार रुपये किमतीच्या शेळ्या चोरून नेल्या. १८ ते १९ जानेवारीदरम्यान ही घटना घडली. याप्रकरणी कपल अशोक रासकर यांनी सुपा पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी हेड कॉस्टेबल बी. बी. अकोलकर हे पुढील तपास करीत आहेत.
पैसे, दागिने चोरले
अहमदनगर : नेवासा तालुक्यातील पानसवाडी येथे चोरट्यांनी घरफोडी करून पैसे व सोन्याचे दागिने असा एकूण १ लाख ७५ हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला. १९ जानेवारी रोजी ही घटना घडली. याप्रकरणी सोनई पोलीस ठाण्यात बाबासाहेब होनाजी वायभासे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी सहायक निरीक्षक ज्ञानेश्वर थोरात हे पुढील तपास करीत आहेत.