शहरं
Join us  
Trending Stories
1
"हे खूप क्रूर असेल, जवळ आले की नष्ट करू", नाकेबंदी सुरू होताच ड्रोनाल्ड ट्रम्प यांची इराणला नवी धमकी
2
SRH चा 'प्रफुल्लित' विजय! सनरायझर्सच्या दोन रायझिंग स्टार्संसमोर RR च्या 'धुरंधरां'नी टेकले गुडघे
3
"मी साडी नेसलेली होती, त्यात अश्लीलता कुठे होती?", ती तरुणी ढसाढसा रडली, ट्रोलिंगनंतर 'धक-धक' गर्ल काय म्हणाली?
4
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीमुळे भारताच्या अडचणी वाढणार, होर्मुझ बंद झाली तर आता काय होईल?
5
Praful Hinge नं सांगून पहिल्याच बॉलवर काढली Vaibhav Suryavanshi ची विकेट; मॅचनंतर म्हणाला...
6
बालमैत्रिणीसाठी आशाताई दोनदा आल्या गडहिंग्लजला! महिला बँकेचे उद्घाटन, महाविद्यालयाच्या मदतीसाठी विनामूल्य कार्यक्रम 
7
शॉम्पूच्या बॉटलमध्ये ४.२६ कोटींचे कोकेन, नागपुरात राजधानी एक्सप्रेसमध्ये सिनेस्टाईल कारवाई
8
Praful Hinge : विदर्भकराचा पदार्पणात महारेकॉर्ड! पहिल्या षटकात वैभव सूर्यवंशीसह तिघांची विकेट घेत रचला इतिहास
9
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
10
व्हॅटिकन VS व्हाईट हाऊस: "मी घाबरत नाही...!" ट्रम्प यांच्या विधानावर पोप लियो XIV यांचा थेट पलटवार; प्रकरण काय?
11
IPL 2026, SRH vs RR : ईशानचा 'शानदार' शो! वैभव सूर्यवंशीला केलं ओव्हरटेक; काव्या मारनने अशी दिली दाद
12
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार, १५ एप्रिल रोजी बिहारला नवा मुख्यमंत्री मिळणार...
13
होर्मुझमधून जाणाऱ्या भारतीय जहाजांकडून कोणताही टोल घेतला नाही; इराणची स्पष्टोक्ती...
14
SRH vs RR : जोफ्राचा कहर! अभिषेक शर्मावर 'गोल्डन डक'ची नामुष्की; नको तिथं रोहित-संजूला टाकलं मागे
15
'अमिरों का नशे'मुळे तपास यंत्रणांमध्ये खळबळ, महागड्या 'कोकेन'ची नागपूर मार्गे नियमित तस्करी 
16
'पतसंस्थेतील बँक खाती बनावट, सह्या सुद्धा खोट्या'; प्रतिभा चाकणकर पहिल्यांदाच अशोक खरात प्रकरणावर बोलल्या
17
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
18
अमेरिकेच्या नाकेबंदीमुळे १५ भारतीय जहाजे होर्मुझमध्ये अडकली; मदतीसाठी नौदलाची धाव...
19
बहिणीला शिवीगाळ, बोअरवेल कामगार विजय पानसेची धारदार शस्त्राने वार करत हत्या, सांगली जिल्ह्यातील घटना 
20
Latest Marathi News LIVE: नागपुरात ४.२६ कोटींचे कोकेन जप्त, राजधानी एक्स्प्रेसमध्ये मोठी कारवाई
Daily Top 2Weekly Top 5

तनपुरे कारखान्याची विखे टिमकडून पाहणी

By admin | Updated: August 13, 2015 23:11 IST

राहुरी : गुरुवारी दुपारी विखे कारखान्याच्या टिमने तनपुरे कारखान्याची पाहणी केली़ त्यामुळे राहुरीकरांमधील उत्सुकता अधिक वाढली आहे़

राहुरी : राहुरी येथील डॉ़ बाबुराव तनपुरे साखर कारखाना कोण चालविण्यास घेणार याबाबत उत्सुकता निर्माण झाली असतानाच गुरुवारी दुपारी विखे कारखान्याच्या टिमने तनपुरे कारखान्याची पाहणी केली़ त्यामुळे राहुरीकरांमधील उत्सुकता अधिक वाढली आहे़ तनपुरे कारखाना चालविण्यासाठी राज्यभरातून अनेकांनी प्रशासकांकडे चौकशी केली असून प्रस्ताव दाखल करण्याची अंतिम मुदत १७ आॅगष्ट आहे़दरम्यान गुरुवारी विखे कारखान्याचे अभियंते व अधिकाऱ्यांनी तनपुरे कारखान्याची पाहणी केली़ अनेक सहकारी संस्था व खाजगी उद्योगांचे लक्ष या कारखान्याकडे लागले आहे़अखेरच्या दिवशी प्रस्ताव दाखल होतील़ हा कारखाना चालविण्यास विखे सर्वाधिक उत्सुक आहेत़ विखे यांनी कारखाना चालविण्यासाठी घेतल्यास राहुरी तालुक्यावर त्यांची पक्कड अधिक भक्कम होणार आहे़मनसेच्या सरचिटणीस शालिनी ठाकरे यांनीही हा कारखाना चालविण्यासाठी घेण्याबाबत स्थानिक कार्यकर्त्यांशी चर्चा केल्याचे सांगितले जाते़ राहुरी व देवळाली नगरपरिषदा असून पक्षाला चांगले वातावरण तयार होईल, असे मनसे कार्यकर्त्यांनी ठाकरे यांना सांगितले़ त्यामुळे त्यांनीही निविदा भरण्याची तयारी सुरू केली आहे़ मनसेचे शहराध्यक्ष दिपक वराळे यांनी शालीनी ठाकरे यांना व्हॉटस्अ‍ॅपवर कारखान्याचे फोटो पाठविले आहे़ हिंदुस्थान अ‍ॅग्रोचे अध्यक्ष डॉ़ भारत ढोकणे यांनीही प्रस्ताव सादर केल्याची माहिती सांगण्यात येते़ याशिवाय मुंबईचे उद्योगपतीही स्पर्धेत आहेत़ आरती उद्योग समूह, नैना केमिकल्स (पनवेल) हे देखील कारखाना चालविण्यास उत्सुक आहेत़