शहरं
Join us  
Trending Stories
1
"हे खूप क्रूर असेल, जवळ आले की नष्ट करू", नाकेबंदी सुरू होताच ड्रोनाल्ड ट्रम्प यांची इराणला नवी धमकी
2
SRH चा 'प्रफुल्लित' विजय! सनरायझर्सच्या दोन रायझिंग स्टार्संसमोर RR च्या 'धुरंधरां'नी टेकले गुडघे
3
"मी साडी नेसलेली होती, त्यात अश्लीलता कुठे होती?", ती तरुणी ढसाढसा रडली, ट्रोलिंगनंतर 'धक-धक' गर्ल काय म्हणाली?
4
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीमुळे भारताच्या अडचणी वाढणार, होर्मुझ बंद झाली तर आता काय होईल?
5
Praful Hinge नं सांगून पहिल्याच बॉलवर काढली Vaibhav Suryavanshi ची विकेट; मॅचनंतर म्हणाला...
6
बालमैत्रिणीसाठी आशाताई दोनदा आल्या गडहिंग्लजला! महिला बँकेचे उद्घाटन, महाविद्यालयाच्या मदतीसाठी विनामूल्य कार्यक्रम 
7
शॉम्पूच्या बॉटलमध्ये ४.२६ कोटींचे कोकेन, नागपुरात राजधानी एक्सप्रेसमध्ये सिनेस्टाईल कारवाई
8
Praful Hinge : विदर्भकराचा पदार्पणात महारेकॉर्ड! पहिल्या षटकात वैभव सूर्यवंशीसह तिघांची विकेट घेत रचला इतिहास
9
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
10
व्हॅटिकन VS व्हाईट हाऊस: "मी घाबरत नाही...!" ट्रम्प यांच्या विधानावर पोप लियो XIV यांचा थेट पलटवार; प्रकरण काय?
11
IPL 2026, SRH vs RR : ईशानचा 'शानदार' शो! वैभव सूर्यवंशीला केलं ओव्हरटेक; काव्या मारनने अशी दिली दाद
12
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार, १५ एप्रिल रोजी बिहारला नवा मुख्यमंत्री मिळणार...
13
होर्मुझमधून जाणाऱ्या भारतीय जहाजांकडून कोणताही टोल घेतला नाही; इराणची स्पष्टोक्ती...
14
SRH vs RR : जोफ्राचा कहर! अभिषेक शर्मावर 'गोल्डन डक'ची नामुष्की; नको तिथं रोहित-संजूला टाकलं मागे
15
'अमिरों का नशे'मुळे तपास यंत्रणांमध्ये खळबळ, महागड्या 'कोकेन'ची नागपूर मार्गे नियमित तस्करी 
16
'पतसंस्थेतील बँक खाती बनावट, सह्या सुद्धा खोट्या'; प्रतिभा चाकणकर पहिल्यांदाच अशोक खरात प्रकरणावर बोलल्या
17
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
18
अमेरिकेच्या नाकेबंदीमुळे १५ भारतीय जहाजे होर्मुझमध्ये अडकली; मदतीसाठी नौदलाची धाव...
19
बहिणीला शिवीगाळ, बोअरवेल कामगार विजय पानसेची धारदार शस्त्राने वार करत हत्या, सांगली जिल्ह्यातील घटना 
20
Latest Marathi News LIVE: नागपुरात ४.२६ कोटींचे कोकेन जप्त, राजधानी एक्स्प्रेसमध्ये मोठी कारवाई
Daily Top 2Weekly Top 5

स्वदेशी चळवळ ते स्टायलिश युग.... खादीची क्रेझ कायम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 2, 2019 10:20 IST

देशाच्या स्वातंत्र्य लढ्यात महात्मा गांधीजींच्या स्वदेशी चळवळीचे प्रतीक ठरलेल्या खादी कपड्यांची क्रेझ आजही कायम आहे़ राजकीय नेत्यांसह तरुण अन् इतर सर्वसामान्य नागरिकही खादीचे चाहते आहेत़ काळाच्या ओघात फॅशनेबल झालेला हा खादी ब्रॅण्ड भारतीय वस्त्रपरिधान परंपरेचा अविभाज्य घटक बनल्याचे दिसत आहे़ 

गांधी जयंती विशेष / अरुण वाघमोडे ।  अहमदनगर : देशाच्या स्वातंत्र्य लढ्यात महात्मा गांधीजींच्या स्वदेशी चळवळीचे प्रतीक ठरलेल्या खादी कपड्यांची क्रेझ आजही कायम आहे़ राजकीय नेत्यांसह तरुण अन् इतर सर्वसामान्य नागरिकही खादीचे चाहते आहेत़ काळाच्या ओघात फॅशनेबल झालेला हा खादी ब्रॅण्ड भारतीय वस्त्रपरिधान परंपरेचा अविभाज्य घटक बनल्याचे दिसत आहे़ सध्या विधानसभेचा निवडणूक काळ असल्याने राजकीय नेत्यांसह कार्यकर्त्यांकडून खादीच्या कपड्यांना मोठी मागणी वाढल्याचे नगर शहरातील  विक्रेत्यांनी सांगितले़ एकेकाळी केवळ कापडामध्ये मिळणारी खादी आता रेडिमेड कपड्यांमध्ये उपलब्ध झाली आहे़ खादी कपड्यांमधील झब्बा आणि शबनम हे स्वरुप बदलून आता विविध रंगातील आकर्षक बॅग्ज, साड्या, ड्रेस मटेरिअल, दुपट्टे, चुडीदार, लेहंगा, शॉटर््स, पलाझो हे स्त्रियांसाठी  तर कुर्ता, जॅकेट्स, ब्लेझर्स,  झब्बा, शर्टस, पँटस हे पुरुषांसाठी उपलब्ध आहेत. लहान मुलांसाठीही खादीचे विविध कपडे उपलब्ध आहेत़ कॉलेज तरुण, तरुणींमध्येही खादीपासून तयार केलेला कुर्ता आणि त्यावर जॅकेट परिधान करण्याची मोठी फॅशन आहे़ या कपड्यांसह खादीमध्ये टॉवेल, ब्लँकेटस्, नॅपकिन अशा इतर कपड्यांनाही ग्राहकांकडून मोठी पसंती मिळते़ खादीसोबत इतर धाग्यांना वापरून त्यातून रॉ सिल्क खादी, मटका खादी, पॉली खादी, टसर सिल्क असे खादीचे प्रकार तयार झाले आहेत़ त्यातून वेगवेगळे कपडे तयार होऊ  लागले. पूर्वी केवळ प्लेन खादी मिळत असे. आता त्यात अनेक प्रिंट्स उपलब्ध होत आहेत. सध्या खादीचे कापड १०० ते ७०० रुपये प्रती मीटर विकले जाते़ पांढ-या कपड्यांपेक्षा रंगीत आणि डिझाईनचे कापड महाग आहे़  रेडिमेडमध्ये शर्ट २०० रुपयांपासून ते १२०० रुपये तर जॅकेट ३०० रुपयांपासून ते १५०० रुपयांपर्यंत मिळते.नेहरु कुर्ता ते मोदी जॅकेटमुळे खादीला अच्छे दिन स्वातंत्र्याच्या काळात पंडित जवाहरलाल नेहरु खादीच्या कपड्यांपासून तयार केलेला कुर्ता परिधान करायचे. पुढे या कुर्त्याचे नेहरु कुर्ता असे नामकरण झाले़ हा कुर्ता आजही प्रचंड लोकप्रिय आहे़ पुढे महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण हे खादीपासून तयार केलेले जॅकेट परिधान करत होते़ या जॅकेटला त्या काळी मिनिस्टर जॅकेट अशी ओळख मिळाली़ हे जॅकेट घालणाºयांची संख्या मोठी वाढली़ असेच जॅकेट पंतप्रधान नरेंद्र मोदीही वापरतात़ या जॅकेटला आता मोदी जॅकेट अशी ओळख मिळाली आहे़ खादीपासून तयार केल्या जाणा-या या जॅकेटला गेल्या पाच वर्षापासून मोठी मागणी आहे़ काळाच्या ओघातही खादीचे अच्छे दिन कायम आहेत़ 

खादी कापडापासून तयार केलेले विविध कपडे बाजारात उपलब्ध आहेत़ काळाच्या ओघात या कपड्यांची मागणी घटलेली नसून वाढलेली आहे़ पुरुषांसह महिलाही खादीचे कपडे खरेदी करतात़ खादीचे कपडे खरेदी करण्यासाठी नगर शहरात जिल्हाभरातून ग्राहक येतात़, असे महाराष्ट्र खादी भांडारचे व्यवस्थापक राजू गौतम यांनी सांगितले.  

टॅग्स :Mahatma Gandhiमहात्मा गांधीAhmednagarअहमदनगर