शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

उत्पन्न वाढविण्यावर नव्या उपायुक्तांचा भर

By admin | Updated: August 30, 2014 23:21 IST

नव्याने उपायुक्त म्हणून रुजु झालेले अजय चारठाणकर यांनी धोरणात्मक निर्णय घेण्याचा निश्चय केला असल्याची माहिती सुत्रांनी दिली.

अहमदनगर: आर्थिक संकटाच्या उंबरठ्यावर असलेल्या महापालिकेला बळकटी आणण्यासाठी उत्पन्नाचे स्त्रोत वाढविणे गरजेचे आहे. अभ्यासाअंती हे स्पष्ट झाल्यानंतर नव्याने उपायुक्त म्हणून रुजु झालेले अजय चारठाणकर यांनी धोरणात्मक निर्णय घेण्याचा निश्चय केला असल्याची माहिती सुत्रांनी दिली. गत आठवड्यातच चारठाणकर यांची नगर महापालिकेत उपायुक्त म्हणून नियुक्ती झाली. पहिल्या आठवड्यात त्यांनी विभागवार महापालिकेची माहिती घेतली. त्यानंतर त्यांना आर्थिक डोलारा डळमळीत असल्याचे दिसले. उत्पन्नाचे स्त्रोत वाढविण्यासाठी त्यांनी मागणी व वसुलीची गोळाबेरीज चेक केली. शहरात ७ हजार ५०० व्यापाऱ्यांनी एलबीटीसाठी नोंदणी केली आहे. मात्र त्यातील सुमारे ४ हजार व्यापारी एलबीटी भरतात. अन्य व्यापारी हे छोटे असून ते स्थानिक व्यापाऱ्यांकडून माल घेतात. त्यामुळे दरमहा सरासरी सव्वातीन कोटी रूपये एलबीटीच्या रुपाने जमा होतात. एलबीटी न भरणाऱ्या व्यापाऱ्यांची यादी तयार करा असे निर्देश चारठाणकर यांनी एलबीटी वसुली विभागास दिले. आरोग्य विभागाचा आढावा घेतल्यानंतर त्यांनी बाळासाहेब देशपांडे रुग्णालयाची स्थिती बदलण्याची गरज असल्याचे बोलून दाखविले. तसेच दवाखान्यात तज्ज्ञ डॉक्टरांची भेट असावी यासाठी प्रयत्न करणे गरजेचे असल्याचे स्पष्ट केले. प्रत्यक्षात हॉस्पिटल पण नोंदणी मात्र क्लिनीक असलेल्यांची यादी तयार करून त्यांच्यावर कारवाईसाठी कृती आराखडा तयार करण्याचे आदेश त्यांनी आरोग्य विभागाला दिले आहेत. चारठाणकर यांचा एकु णच कार्यभार पाहता महापालिकेचे आर्थिक उत्पन्न वाढविण्यावर त्यांचा भर असल्याचे दिसले. महापालिकेच्या कर्मचाऱ्यांना शिस्त व नियमानुसार कामकाज करण्याकडे त्यांचे लक्ष आहे. चारठाणकर यांनी नगरपालिका, महापालिकांत २१ वर्षे सेवा केल्याने त्यांना कामाचा मोठा अनुभव आहे. त्यामुळेच ते नगरला शिस्त लावतील असे बोलले जाते. पण नव्याचे नऊ दिवस हा अनुभव नगरकरांना काही नवा नाही. त्यामुळे चारठाणकर असेच राहतात की कालानुरूप बदलतात, याकडे आता सर्वांचे लक्ष लागून आहे. (प्रतिनिधी)