शहरं
Join us  
Trending Stories
1
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
2
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
3
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
4
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
5
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
6
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
7
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
8
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
9
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
10
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
11
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
12
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
13
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
14
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
15
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
16
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
17
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
18
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला पदार्पणाची संधी मिळणार?
19
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
20
Shocking: बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; पाहा अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
Daily Top 2Weekly Top 5

‘अर्जुन चषक’ क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 29, 2020 04:19 IST

तळेगाव दिघे : संगमनेर तालुक्यातील तळेगाव दिघे स्ट्राईकर्स क्रिकेट क्लब आयोजित भव्य प्लास्टिक बॉल ‘अर्जुन चषक’ क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन ...

तळेगाव दिघे : संगमनेर तालुक्यातील तळेगाव दिघे स्ट्राईकर्स क्रिकेट क्लब आयोजित भव्य प्लास्टिक बॉल ‘अर्जुन चषक’ क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन छत्रपती प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष व जिल्हा परिषद सदस्य महेंद्र गोडगे पाटील यांच्या हस्ते पार पडले. विजेत्यांना २१ हजार १११ रुपयांचे प्रथम, ११ हजार १११ रुपयांचे द्वितीय, ७ हजार ७७७ रुपयांचे तृतीय, तर ५ हजार ५५५ रुपयांचे चतुर्थ पारितोषिक ठेवण्यात आलेले आहे. अर्जुन चषक क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन जिल्हा परिषद सदस्य महेंद्र गोडगे पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी सरपंच बाबासाहेब कांदळकर, इंजि. सुभाषराव सांगळे, सोसायटीचे अध्यक्ष तुकाराम दिघे, अनिल कांदळकर, भाऊसाहेब दिघे, डॉ. नंदकुमार गोडगे, डॉ. संतोष डांगे, डॉ. राजेंद्र जोंधळे, डॉ. सुनील भागवत, बाळासाहेब दिघे अमोल दिघे, संतोष दिघे, सुनील दिघे, रावसाहेब दिघे, गणेश बोडखे, ज्ञानेश्वर पिंगळे, अनिस शेख, शाहरुख शेख, रवींद्र दिघे, संचित खालकर, गणेश लामखडे, गोकुळ जोर्वेकर, अक्षय दिघे उपस्थित होते.

-----------

चिखली घाटातील काम पूर्ण करा

अहमदनगर : नगर-दौंड रस्त्यावरील चिखली घाटातील काम पूर्ण करण्याची मागणी प्रवाशांनी केली आहे. घाटात मोठ-मोठे खड्डे पडल्याने अवजड वाहतूक करणाऱ्या वाहनचालकांना कसरत करावी लागत आहे. तसेच रस्त्यावरून उडणाऱ्या धुळीनेही परिसरातील हॉटेल व्यावसायिक हैराण झाले आहेत. त्यामुळे रस्त्याचे काम करणाऱ्या संबंधित ठेकेदाराने हे काम तत्काळ पूर्ण करावे, अशी मागणी होत आहे. प्रशासनाने तसे आदेश ठेकेदाराला द्यावेत, असे प्रवाशांचे म्हणणे आहे.