शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ला : मेजर विनय नरवाल यांच्या पत्नीचा अश्लील AI व्हिडीओ व्हायरल; पिता-पूत्र ताब्यात
2
अंडरवर्ल्डमधून मोठी बातमी! लॉरेन्स गँग फुटली; गोल्डी ब्रार, रोहित गोदारा लॉरेन्सपासून वेगळे झाले
3
"कोरोनापेक्षाही वाईट परिस्थिती येईल...", चीनबद्दल डोनाल्ड ट्रम्प यांना तज्ज्ञांचा मोठा इशारा
4
Viral Video : चोरी करायला गेला अन् पाय घसरून पडला! चोराची फजिती सीसीटीव्हीत झाली कैद
5
बिहार निवडणुकीपूर्वीच एनडीएत बंडखोरी! चिराग पासवान यांची घोषणा, सर्व २४३ जागांवर लढणार...
6
हिंसाचार, बलात्कार, स्थलांतर...मणिपूर मुद्द्यावरुन प्रियंका गांधींचा मोदी सरकारवर निशाणा
7
मायकल जॅक्सनचं स्वागत करण्यासाठी सोनाली बेंद्रेने ठेवलेली 'ही' अट, म्हणाली- "राज ठाकरेंच्या पत्नीने मला..."
8
Photo : चिनाब रेल्वे पूल कमालच! पण भारतातल्या 'या' पूलांचीही जगभरात आहे चर्चा
9
“प्रश्न निवडणूक आयोगाला विचारले, पण उत्तर भाजपाने दिले, म्हणजे मॅच फिक्सिंगवर शिकामोर्तबच”
10
Delhi: नऊ वर्षाच्या मुलीवर बलात्कार, सुटकेसमध्ये केलं बंद; रक्तबंबाळ अवस्थेत पडलेली होती चिमुकली
11
मुलाच्या पिंडदानासाठी गेलेल्या आईसह तिघींचा कोरणी घाटात बुडून मृत्यू
12
भारतीय इंजिनिअरचा दुबईमध्ये स्कुबा डायव्हिंग करताना मृत्यू, पाण्यात उतरल्यानंतर काय झाले की गेला जीव?
13
Monsoon Update : मान्सूनच्या पावसाला कधीपासून सुरुवात होणार? हवामान विभागाने दिली अपडेट
14
फिल्मी दुनियेत शिल्पा नावाने प्रसिद्ध, पण खरं नाव दुसरंच, 'या' गोष्टीची तिला आजही वाटते भीती!
15
पाकिस्तानने पुन्हा हात पसरले! अमेरिकेकडून एअर डिफेन्स सिस्टम मागितली
16
धक्कादायक! 'लुटेरी दुल्हन' गँगचा धुमाकूळ, जो समोर आला त्याच्याशी संसार थाटला; ३ वर्षांत २० वेळा लग्न केलं अन्...
17
Rinku Singh अन् Priya Saroj यांच्या साखरपुड्यातील थाट; त्या महागड्या हॉटेलात सर्वात स्वस्त थाळी हजारात
18
धार्मिक भावना दुखावत असतील तर मांसाहारी हॉटेलमध्ये का जाता? ग्राहक आयोगाने मुंबईतील तक्रार फेटाळली 
19
“राहुल गांधी यांच्या प्रश्नांना निवडणूक आयोग वस्तुनिष्ठ उत्तर का देत नाही?”: हर्षवर्धन सपकाळ
20
पुतिन आर्मीने आणखी एका शहरावर फडकावला झेंडा; युक्रेनच्या 20 टक्के भूमिवर मिळवला ताबा

पगार लेट झाल्यास अधिकाऱ्यांना भुर्दंड

By admin | Updated: May 2, 2016 23:32 IST

अहमदनगर : रोजगार हमी योजनेत कामाचे मस्टर पूर्ण झाल्यावर मजुरांचे पगार लेट झाल्यास संबंधीत अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना दंड करण्यात येणार आहे.

रोजगार हमी : पगार वेळेत करण्यात नगर राज्यात पाचव्या स्थानावरअहमदनगर : रोजगार हमी योजनेत कामाचे मस्टर पूर्ण झाल्यावर मजुरांचे पगार लेट झाल्यास संबंधीत अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना दंड करण्यात येणार आहे. हा दंड संबंधीतांना त्यांच्या खिशातून भरावा लागणार असून नगर वेळेत पगार करणाऱ्या जिल्ह्यात राज्यात पाचव्या स्थानावर आहे. जिल्हा परिषदेमार्फत ग्रामपंचायत हद्दीत महात्मा गांधी रोजगार हमी योजना राबविण्यात येत आहे. यासाठी स्वतंत्र यंत्रणा नियुक्त करण्यात आली असून त्यांच्यामार्फत रोहयोचे नियंत्रण करण्यात येत आहे. रोहयोचे काम आणि मस्टर पूर्ण झाल्यावर १५ दिवसांच्या आत संबंधीत कर्मचाऱ्यांचा पगार त्यांच्या बँक अथवा त्यांच्या पोस्टाच्या खात्यावर टाकणे बंधनकारक आहे. त्यात उशीर झाल्यास दरहजारी पाचप्रमाणे संबंधीत तालुक्यातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना दंड करण्यात येणार आहे. हा दंड संबंधीतांच्या पगारातून वसूल होणार आहे. राज्यात रोहयोचा पगार वेळेत करणाऱ्या जिल्हा परिषदेत नगर जिल्हा परिषद राज्यात पाचव्या स्थानावर आहे. नगरमध्ये ५९.५ टक्के रोहयो मजुरांचे पगार वेळेत होत असून ४० टक्के मजुरांच्या पगारास विलंब होत आहे. राज्यात सातारा पहिल्या क्र मांकावर असून दुसऱ्या स्थानावर कोल्हापूर, त्यानंतर नागपूर आणि नाशिक आहे. नगरनंतर पुणे जिल्हा परिषदेचा नंंबर आहे. सर्वाधिक वाईट स्थिती परभणी जिल्ह्याची आहे. या ठिकाणी वर्षभरात अवघा ४. ८५ टक्के खर्च झाला असून औरंगाबाद जिल्ह्यात १५. ११ टक्के तर, बीड जिल्ह्याचा खर्च १५.११ टक्के झाला आहे. (प्रतिनिधी)मजुरीच्या दरात वाढजिल्ह्यात सर्वाधिक वाईट स्थिती जामखेड आणि कोपरगाव तालुक्यातील आहे. या ठिकाणी ३७ टक्के आणि ३८ टक्के मजुरांचा पगार होत आहे. यामुळे येथील अधिकारी व कर्मचारी दंडाला पात्र ठरत आहेत. सर्वाधिक वेळेत पगार राहाता तालुक्यात ८९ तर श्रीरामपुरात ७३ आणि श्रीगोंद्यात ७२ टक्के होत आहेत. गेल्या वर्षी रोहयोची मजुरी १८१ रुपये होती तर आता त्यात वाढ होत १९२ रुपये झालेली आहे. जिल्हा परिषदेच्या वतीने राबवण्यात येणाऱ्या रोहयोत ६२९ गावात ६ हजार १६३ मजूर कामावर आहे. महसूलमार्फत राबवण्यात येणाऱ्या रोहयोची ८६० कामे सुरू असून त्या ठिकाणी ८ हजार ६४६ मजूर उपस्थित आहेत. दोन्ही विभाग मिळून १ हजार ४८९ कामावर १४ हजार ८०९ मजुरांची उपस्थिती आहे.