शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
2
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
3
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
4
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
5
महामुंबईत गिरणी कामगारांसाठी २,५२१ घरांची लॉटरी काढावी; एकनाथ शिंदे यांचे म्हाडाला निर्देश
6
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
7
विमानतळावर ३८ कोटींच्या सोने तस्करीचा पर्दाफाश; DRI कडून केनियाच्या २६ नागरिकांना अटक
8
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
9
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
10
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
11
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
12
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
13
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
14
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
15
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
16
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
17
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
18
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
19
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
20
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
Daily Top 2Weekly Top 5

शिक्षण व्यवस्थेच्या दुरवस्थेला विचारवंतच जबाबदार

By admin | Updated: March 20, 2016 23:16 IST

अहमदनगर : आरटीआय कायद्यामुळे शिक्षण क्षेत्रातील गुंता वाढला आहे. राज्यभर इंग्रजी शिक्षण संस्था लूट करतात, असे चित्र निर्माण केले जात आहे.

अहमदनगर : आरटीआय कायद्यामुळे शिक्षण क्षेत्रातील गुंता वाढला आहे. राज्यभर इंग्रजी शिक्षण संस्था लूट करतात, असे चित्र निर्माण केले जात आहे. वास्तवात ते खरे नाही. इंटरनॅशनल स्कूलच्या नावाखाली शिक्षणाचा धंदा सुरू आहे. शिक्षण व्यवस्थेच्या दुरवस्थेला विचारवंत जबाबदार आहेत. अशा परिस्थितीत राज्यातील इंग्रजी शाळांच्या संस्थाचालकांच्या पाठिशी खंबीरपणे उभे राहू असे, आश्वासन राज्याचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे यांनी दिले. महाराष्ट्र इंग्रजी शाळा संस्थाचालक संघटनेच्या (मेस्टा) वतीने नगरला जिल्हा मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी विरोधी पक्ष नेते विखे बोलत होते. मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी मेस्टाचे अध्यक्ष संजय तायडे होते. विखे म्हणाले, मी शिक्षणमंत्री असताना मोठ्या प्रमाणात इंग्रजी शाळांना मान्यता देऊन राज्याचे शैक्षणिक धोरण बदलवले. आज मोठ्या प्रमाणात लोकांची इंग्रजी शाळांना मागणी आहे. मात्र, सत्तेतील भाजपा सरकार हे इंग्रजी माध्यमाच्या शाळांची गळचेपी करीत आहे. सरकारचे जीआर दररोज तयार होतात व ताबडतोब रद्द होतात. विचारहीन सरकारमुळे समस्या निर्माण होत आहेत. संघटनेच्या मागण्यांसंदर्भात मेस्टाच्यावतीने मुख्यमंत्री व शिक्षणमंत्री यांच्याशी बोलून बैठक लावण्यात येईल, असे आश्वासन विखे यांनी दिले. ग्रामीण भागातील इंग्रजी शाळांची तुलना सरकारने मोठ्या शहरात चालणाऱ्या शाळांशी करू नये. ग्रामीण भागातील शाळा संकटात आहेत़ त्यामुळे या शळांवर अन्याय होऊ देणार नाही, अशी ग्वाही त्यांनी दिली. तायडे यांनी संस्थाचालकांच्या अडचणींचा पाढाच वाचला. मुख्यमंत्र्यांसोबत नागपूर येथे ८ हजार संस्थाचालकांच्या उपस्थितीत मेळावा घेतला. त्यावेळी तुमच्या समस्या सोडविण्यासाठी लवकरच बैठक आयोजित करण्याचे आश्वासन देऊन ४ महिने उलटले तरी मुख्यमंत्र्यांचा साधा निरोपही नाही. म्हणूनच आता विरोधी पक्ष नेते विखे यांच्याबरोबर राहण्याचा निर्णय मेस्टाने घेतल्याचे तायडे यांनी स्पष्ट केले. यावेळी संघटनेचे मुंबई विभागप्रमुख विनोद कुलकर्णी, कोषाध्यक्ष मनिष हांडे, राज्य संघटक अनिल असलकर, गजानन वाळके, सचिन जाधव, डॉ. माणिक शेळके, डॉ. धनंजय धनवटे, सचिन मलिक आदी उपस्थित होते. सूत्रसंचालन शहराध्यक्ष आनंद कटारिया यांनी केले तर आभार सतीश शिंदे यांनी मानले.