नेवासा : कोविड-१९ च्या संकटाच्या काळात पोषणमूल्ययुक्त आहार घेणे अत्यंत गरजेचे असल्याने विद्यार्थ्यांमध्ये त्याविषयी जागृती व्हावी, तसेच ते स्वावलंबी होऊन व्यवसायिक शिक्षण मिळावे, या उद्देशाने ‘मी होणार लिटिल मास्टर शेफ’ स्पर्धेचे नेवासा खुर्द जिल्हा परिषद प्राथमिक सेमी इंग्रजी शाळा (मुले) येथील चौथीच्या विद्यार्थ्यांसाठी पालकांच्या सहकार्याने ऑनलाइन स्पर्धा उत्साहात पार पडली.
ऑनलाइन व ऑफलाइन अध्यापनातून विविध विषयांचा समन्वय साधत या नाविन्यपूर्ण उपक्रमाचे आयोजन वर्गशिक्षक राहुल आठरे यांनी केले. स्पर्धेमध्ये सोळा विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला. स्पर्धेचे परीक्षण शिक्षण विस्तार अधिकारी विद्यादेवी सुम्बे व आहार तज्ज्ञ शिक्षिका प्रतिमा राठोड यांनी केले. या स्पर्धेमध्ये प्रज्वल कापसे या विद्यार्थ्यानी मी होणार लिटिल मास्टर शेफ बहुमान पटकावला. द्वितीय क्रमांक समर्थ पाटील, तृतीय क्रमांक तन्मय शिंदे याने पटकाविला. वीर चव्हाण, प्रांशु मापारी, अर्णव डौले यांनी उत्तेजनार्थ बक्षीस मिळविले. विस्तार अधिकारी शिवाजी कराड, शालेय पोषण आहार अधीक्षक हेमलता गलांडे व मुख्याध्यापक अरविंद घोडके यांच्या हस्ते बक्षिसे देऊन गौरविण्यात आले.
100921\1310img-20210909-wa0035.jpg
नेवासा खुर्द मुले शाळेत ऑनलाईन ''मी होणार लिटिल मास्टर शेफ..." स्पर्धा उत्साहात संपन्न