शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलचा इराणवर मोठा हल्ला, ५० हून अधिक लढाऊ विमानांचा कहर; महत्त्वाच्या लष्करी तळांवर तुफान बॉम्बिंग
2
"२०२२ मध्ये केवळ वादळ होतं, २०२७ मध्ये....", पोटनिवडणुकीच्या निकालानं केजरीवाल खूश, केली मोठी भविष्यवाणी
3
खामेनेई पळून जाण्याच्या तयारीत! इराणच्या माजी युवराजांचा दावा, 'सुप्रीम लीडर'बद्दल काय म्हणाले?
4
रिषभ पंतला तोड नाय! सेंच्युरीसह रचला इतिहास; स्टेडियम स्टँडमधून गावसकरांचा 'कोलांटी उडी' मार असा इशारा
5
राजाच्या पैशानेच बनली त्याच्या मृत्यूची योजना! लग्नाआधीच सुरू केलेलं नवं खातं, सोनमनं तेच पैसे वापरले अन्... 
6
इराणने अशी कोणती मिसाईल डागली? इस्रायलमध्ये ना अलर्ट आला ना सायरन वाजला; हायफावर कोसळली...
7
२८ जुलैचा दावा खरा होणार? तिसरे महायुद्ध अटळ? बाबा वेंगा-नास्त्रेदमस यांची मोठी भविष्यवाणी
8
"वाटलं भारताने अण्वस्त्र हल्लाच केला, पाकिस्तानकडे फक्त...', नेमकं काय म्हणाले बिलावल भुट्टो
9
KL राहुलनं शतकी खेळीसह साधला विक्रमी डाव! लिटल मास्टर गावसकरांसह द्रविडलाही टाकले मागे
10
'मी राज्यसभेवर जाणार नाही...', स्वतः अरविंद केजरीवालांनी लावला चर्चांना पूर्णविराम
11
इराण-इस्त्रायल युद्ध पेटले! ४० मिनिटे इस्रायलवर क्षेपणास्त्रांचा मारा, थरकाप उडवणारे व्हिडिओ व्हायरल!
12
७६ लाख रहस्यमय मतांबाबतच्या याचिकेवर हायकोर्टात सुनावणी पूर्ण; प्रकाश आंबेडकरांनी मांडली बाजू
13
आषाढी वारीत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ सहभागी होणार; दिवसभर दिंडीसोबत चालणार
14
“विकासासाठीचा प्रत्येक रुपया सर्वसामान्यांपर्यंत पोहोचला पाहिजे”: DCM एकनाथ शिंदे
15
तिसऱ्या महायुद्धाला तोंड फुटण्याची भीती...! इराण इस्रायल युद्धात आणखी एका देशाची उडी; कुणाला देणार साथ?
16
“भास्कर जाधव नौटंकी, जनताच संन्यास देणार, तो काही एवढा मोठा माणूस नाही”; कुणी केली टीका?
17
गोव्याला जायचा प्लान करताय? ‘मुंबई-गोवा वंदे भारत’ट्रेनच्या शेकडो फेऱ्या रद्द; कारण आले समोर
18
क्रूरतेच कळस! हुंड्यात कार न मिळाल्याने पती झाला हैवान; पत्नीला मारलं, मणक्याचं हाड तोडलं अन्... 
19
रणथंबोरची राणी, मगरींच्या शिकारीसाठी प्रसिद्ध; 'अ‍ॅरोहेड'ने घेतला अखेरचा श्वास...
20
Maharashtra Election : महापालिका, जिल्हा परिषदांच्या निवडणुका कधी होणार? समोर आली मोठी अपडेट

मानहानी, दबावामुळे विष घेतले

By admin | Updated: June 11, 2014 00:17 IST

अहमदनगर : नाशिक येथे जात वैधता प्रमाणपत्र मिळालेले असताना काही गावगुंडांनी तहसील कार्यालयात येऊन उमेदवार माया जगताप, सहकारी सुरेश भोसले यांना धमक्या दिल्या.

अहमदनगर : नाशिक येथे जात वैधता प्रमाणपत्र मिळालेले असताना काही गावगुंडांनी तहसील कार्यालयात येऊन उमेदवार माया जगताप, सहकारी सुरेश भोसले यांना धमक्या दिल्या. तसेच जातीवाचक व मानहानी होईल, असे वर्तन केले. या प्रकरणी पंधरा जणांवर कारवाई करावी, अशी मागणी पारगाव भातोडीचे माजी सरपंच संजय मारुती जगताप यांनी जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे केली आहे.याबाबत माया जगताप यांचे पती संजय मारुती जगताप यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, माया जगताप या ग्रामपंचायतीच्या प्रभाग क्रमांक ३ मधून अनुसूचित जातीसाठी राखीव असलेल्या प्रभागातून निवडणूक लढवित आहेत. छाननी प्रक्रियेदरम्यान जात वैधता प्रमाणपत्र मिळविण्यासाठी नाशिकला गेलो होतो. नाशिकला २.१५ वाजता प्रमाणपत्र मिळाले. ते इमेलद्वारे पाठवित असून ते प्रमाणपत्र मेलमधून काढून सादर करण्याबाबत सुरेश अप्पासाहेब भोसले यांना सांगितले. त्यावेळी पत्नीने मोबाईलवर झालेला प्रकार सांगितला. तहसील कार्यालयामध्ये अमोल भाऊसाहेब जाधव, दत्तात्रय तनपुरे, अशोक शिंदे, ईश्वर विठ्ठल शिंदे, विशाल हिरामन शिंदे, महेश ज्ञानेश्वर शिंदे, सचिन संभाजी शिंदे यांच्यासह सात-आठ जणांनी मनाला वेदना होतील, असे शब्दप्रयोग करून, तसेच जातीवाचक शब्दप्रयोग करून अपमान केला. यामुळे विष घेण्याशिवाय दुसरा पर्याय राहिला नाही. पत्नी गंभीर असल्याने याबाबत कारवाई करण्यासाठी पोलिसांकडे गेलो असता, तेथेही गुंडांनी हाकलून लावले. याबाबत चौकशी करून संबंधितांवर कारवाई कारण्याची मागणी निवेदनात करण्यात आली आहे. दरम्यान विष घेतलेल्या माया जगताप आणि सुरेश भोसले यांच्या प्रकृतीमध्ये सुधारणा झाली असून त्यांच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. (प्रतिनिधी)