ख्रिस्त जयंतीनिमित्त बुधवारी (दि.२४) मध्यरात्री चर्चमध्ये आयोजीत धार्मिक कार्यक्रमात ते बोलत होते. महाराष्ट्र अल्पसंख्यांक ख्रिस्ती विकास परिषदेचे संस्थापक अध्यक्ष अनिल भोसले. प्रा. बाबा खरात, रंगकर्मी नाट्य संस्थेचे अध्यक्ष बाळासाहेब घोडके, जिल्हाध्यक्ष दीपक कदम, राजेंद्र गायकवाड, अरविंद सांगळे, प्रशांत यादव, सचिन मूनतोडे, सुहास गायकवाड, ॲड. अरविंद राठोड, ॲड.सुहास दुशिंग, विजय आढाव, ॲड. विजय पगारे, कैलास भोसले, सत्यानंद कसाब, सनी गायकवाड, अजित पाटोळे, मायकल कोपरे, बाळासाहेब भोसले, प्रभाकर जगताप, सिमोन रूपटक्के, सुखदेव शेळके, जयंत जाधव, बाळू वैराट आदी यावेळी उपस्थित होते.
नाताळ सण हा समजून घेतला तर कोणत्याच वाईट प्रथांचे अतिक्रमण होणार नाही. प्रेम, दया, शांतीचा संदेश देणाऱ्या या ख्रिस्त जन्मदिनी राष्ट्रीय एकात्मता जोपासण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावेत. असेही आवाहन फादर शिनगारे यांनी केले. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सेंट मेरी चर्च, मॅथोडिस्ट चर्च बरोबरच तालुक्यातील सर्व पंथीय चर्चेस मध्ये शासनाने दिलेल्या नियमांचे पालन करून ख्रिस्त जयंती सोहळा अतिशय साध्या पद्धतीने साजरा करण्यात आला. ढासळलेली आर्थिक घडी, विस्कळीत झालेले सर्वसामान्यांचे जीवन पुन्हा सुरळीत व्हावे, यासाठी फादर सायमन शिनगारे, फादर पीटर खंडागळे, फादर ऑल्विन, जोशी, रेव्ह. विकास संगमे, पा. शिवाजी लांडगे, शरद शेळके, दीपक शेळके, अमोल साळवे, विजय दारोळे आदींनी चर्चमध्ये प्रार्थना केली.
--------
फोटो - २५शिनगारे
सेंट मेरी धर्मग्रामप्रमुख फादर सायमन शिनगारे यांनी केले.सेंट मेरी धर्मग्रामप्रमुख फादर सायमन शिनगारे यांनी केले.
------ : ख्रिस्त जयंतीनिमित्त सेंट मेरी चर्चमध्ये धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.